गेली आहेस दूर आता येऊ
नकोस परत,
आता तुझी वाट पाहण्याची वाटत नाही गरज..
अशीचं दूर दूर जा घेऊन त्या
हिरव्या आठवणी,
कोमेजुन गेल्यावर त्याना आता घालू नकोस पाणी..
आता तू चालली आहेस
एकांत प्रवासाला,
किती अलगद तडे दिलेसना गं
माझ्या विश्वासाला..
थांबू नकोस आता वेळ गेली टळून,
अशी समजू नकोस की माझे
ह्रदय येईल भरून..
तुझ्यासारखाचं मी ही झालो
आता निष्ठुर,
जसा शांत आगीतून निघतो
फक्त धुर..
No comments:
Post a Comment