तुझ्या साठी जग होतं, पण माझं जगच तुझ्यात होतं
दुनीयेच्या या गर्दीत नेमकं तुझ्यात अस काय खास होतं?
अवती भोवती सगळ्यांशी
हितगुज तुझी व्हायची
मी मात्र कोपर्यातून
लपूनच तुला पाहायची.
तुझ्याशी बोलायचा विचार होता, पण ते धैर्य कधीच माझ्यात नव्हतं
दुनीयेच्या या गर्दीत नेमकं तुझ्यात काय खास होतं??
मैत्री तुझी सगळ्यांशी
सहजासहजी व्हायची
पण माझ्याकडे चुकूनसुद्धा
नजर तुझी नाही वळायची.
मग मुद्दाम की न जाणून, हे गुपित तुझं तुझ्यात होतं
दुनीयेच्या या गर्दीत नेमकं तुझ्यात असं काय खास होतं??
हसतांना तुला बघून
मी तुझ्यात मला विसरायची
एकांतात बसून
सतत तुला आठवायची.
तुझ्यात जीतकं प्रेम होतं, तीतकं माझच माझ्यात नव्हतं

- अनामिका

No comments:
Post a Comment