Friday, November 21, 2014

सोबत सोडली तू | Breakup Marathi Kavita Blog | Breakup Kavita For GirlFriend/BoyFriend | Sad Break Ip Poems in Marathi Kavita

वाटेवरी तू सोबत सोडून गेल्यावर,
या शब्दानेच मला साथ दिली होती...
एका अनोळख्या विश्वात नेवून मला,
या कविताशी नाती जुळून दिली होती...

तुझ्या विरहाचा हूदंका गिळून मी,
ती विखूरलेली स्वप्न गोळा करत होतो...
तुटक्या मुटक्या शब्दात का होईना,
पण अबोल भावनेला कवितेत गूफंवत होतो...

माझ्या जीवनातील प्रत्येक पहाट ही,
त्या ओसर साजंवेळी सारखी होती...
शेवटी कितीही उगवलं तरीही ,
पून्हा ती मावळण्याची वेळ होती...

आता नकोशी वाटतात ती माणसं,
ती नाती जे पहिले हवेहवेसे होते...
कारण ह्या अनोळख्या जगातून मला,
आपल्याच माणसांनी हाकालून दिले होते ....!!

Special Thanks:-
हर्षवर्धन घोडके

© स्वप्नील चटगे.
(अबोल मी)
दि.02.11.2014

No comments: