Friday, November 21, 2014

ती पण माणसच ना? | Marathi Kavita On Life | Kavita in Marathi Fonts | Sad Life Kavita Marathi

नशिबाच्या गुलामगिरीत पडुन कुडामध्ये राहणारी,
नाही दिली साथ समाजाने म्हणून
गावाच्या दुर राहणारी,
गरिबीशी झगडत पुन्हा उभा राहणारी,
नाही म्हटल तरी
निवडणुकांत संपत्ती समजली जाणारी,
झाली विकसित शहरे
तरी खेड्यात अधतपड असणारी
पोटासाठी दिवस-राञ शेतात राबणारी,
अन् त्यांच्यासोबत बालपण विसरुनकाम करणारी लेकरं
शेवटी माणसचं ना?

No comments: