Friday, November 7, 2014

आपलीच मानसं अशी का वागतात | Marathi Kavita on Selfish People | Marathi Sad Life Poems | Mean People Marathi Sad Kavita

आपलीच मानसं आपल्याशी अशी का वागतात,
सारं काही कळणारच असतं, तरी का लपवतात.
त्यापेक्षा परकेपणा असलेला बरा............,
लपवलेल्याच दुख त्यांच्याकडना  होतं नाही,... आपल्यानकडनाच होतं.
त्यांनी परक्यासारखंच  वागायचं नेहमी वेळ आल्यावर,
आपणच आपलं जपायचं नातं.

रोज समोर भेटतात तेव्हा उगाच हसत राहतात,
काय माहित लपवतात किती काय मनात,
इतरानकडून एक दिवस उलगडतात गुपितं,
आणि मग वाटायला लागतं आपणच का जपायचं नातं.

आपल्याकडचा साधा अंकुरही साऱ्यांना कळतो,
पण त्यांना कसा काय त्यांचा बहरही लपवता येतो ?,
तेव्हा कळते  केवळ तोडता येत नाही म्हणून जपातायेत ते नातं.

नात्यात सुद्धा त्यांना परतफेडीची आस असते,
पण याला खरंतर व्यवहार असं म्हणतात,
या व्यवहारामुळेच नाती कमकुवत बनतात,
आणि आपलेपण हि तसंच कमी होत जातं.
मग कठीण असतं टिकवणं नातं.

नात्यात खरंतर मोकळीक हवी मनाची,
पण आपल्याच माणसांकडना  वाटते भीती तरी कशाची ?
याच भीतीपोटी बऱ्याच गोष्टी लपवल्या जातात,
"वेळ येईल तेव्हा कळेल सारं" हि पळवाट असते.....
खरंतर त्यांना सारं काही लपवायचं असतं,
समजून घ्यावं तेव्हा, त्यांना जड झालंय नातं.

समोरच्याच्या आनंदात आपलाही आनंद असतोच कि,
पण कधी कधी त्यांनाच आनंद वाटायचा नसतो,
दुख कधी त्यांच्या आनंदच होतं नाही,
दुख होतं खरं लपवल्याच.............आणि,
वाईट वाटतं आपल्याच माणसांच्या गोष्टी इतरांकडून कळल्याच,
.
.
.
असो आनंद आहे त्यांच्या आनंदात,
आणि त्यांनी जरी परकं केलं तरी जपणार मी नातं,
पण कळत नाही हेच कि माझं काही चुकलं नसतांना,
आपलीच मानसं अशी का वागतात.

...अमोल

No comments: