Wednesday, November 26, 2014

भलेही दुनीयेच्या नजरेत आपल्यात काही खास नाय | Marathi Kavita | Blog | Marathi Poems On Life | Motivational Life Poems in Marathi

भलेही दुनीयेच्या नजरेत आपल्यात काही खास नाय.
म्हणून कोणी वाट्टेल तसं बोलेल, इतका आपण third clas नाय.

जरी सलमान, शाहरूख, बच्चन सारखी आपल्यात काही गम्मत नाय
पण आपल्या item कडं कोणी बघेल, ईतकी कोणात हीम्मत नाय.

जरी मवाली अन गुंडा सारखा आपल्या वस्तीत आपला राज नाय
पण माय, बहीनींकडे वाईट नजर टाकू, ईतका आपल्यात माज नाय.

जरी Dr, Engg, वकील सारखी आपल्या कडे degree नाय
आपल्या कष्टांवर मी विश्वास ठेवतो, रस्त्यावरचा भिकारी नाय.

जरी राजनीती चे डावपेच खेळून या समाजाचे मी रक्षण करत नाय
एक साधासुधा माणूस मी,
कमीतकमी रक्षणाच्या नावाखाली भक्षण करत नाय.

- अनामिका

छान वाटेल मला | Motivational Prem Kavita In Marathi | Motivational Inspirational Marathi Kavita

छान वाटेल तेव्हा मला,
जेव्हा तु मला विसरुन आनंदी राहशील.
थोड माझ्यातुन बाहेर पडून स्वत:च अस्तित्व तयार करशील.

मलाही आनंदच होईल,
जेव्हा माझ्याशी तुझी तुलना करुन सत्य स्विकारशील.
तेव्हा आवडेल मला, जेव्हा तु माझा विचार करणं सोडून देऊन तुझ्या मनात घुसशील.

तेव्हा राग नाहीच येणार ग,
जेव्हा माझ्या ह्रदयातुन बाहेर पडून स्वत:ला बळकट करशील.

तेव्हा खुप असेल ग मी,
जेव्हा तु ही भयानक स्वप्ने विसरुन
तुझ्या सुंदर आयुष्यात जाशील.

तु खरच कोण आहेस गं? | Prem Kavita For GirlFriend | Share Prem Kavita On Whatsapp Facebook Hike.

माझा पत्ता नसताना या ह्रदयात घुसलीस,

घुसुन बेकायदेशीरपणे या ह्रदयात कायमचचं बसलीस,

येऊन माझ्यात माझ जगणचं बनलीस,

तु माझ्या जीवनात येऊन माझ जीवन बनलीस.,..

कधी नको एवढी तु माझ्यात मिसळलीस,

तु माझ्यात येऊन सखे माझीच बनलीस...

तूला तर माहीत ही होते | Marathi Dukhi Prem Kavita | Sad Virah Miss You Kavita Blog | Please Come back Marathi Kavita | Don't Leave Me Marathi Kavita

तूला तर माहीत ही होते
अनं तूला कळले देखील होते
कितींदा ही मी चिडले अोरडले
तरीही माझ्या मनात मात्र खूप प्रेम होते

हो रागात म्हणाले ही होते
जा तू बोलू नकोस मला
ही झाली माझी चुक मान्य होती मला

नंतर मी ही बोलण्याचा फार प्रयत्न केला तूला
परंतू माझ्याशी बोलणे मनात नह्वते तेव्हा तूला
का काहीच कळले नाही मला
इतका अबोला धरून सोडून गेलास तू मला

ऐश्वर्या सोनवणे मुंबई।

एक क्षण तुझ्या माझ्या प्रेमाचा | Marathi Prem Kavita For BoyFriend | Prem Kavita Blog in Marathi

आयुष्यात सगळे क्षण आठवणीत
राहतात अस नाही पण काही
विसरता पण येत नाहीत
            त्यातलाच  एक क्षण
            तुझ्या माझ्या प्रेमाचा
            आपल्या स्वप्नांचा …………
 एक स्वप्न ……
चांदण्याच्या गावी राहण्याचं
जादूच्या नगरीतील परी राजकुमाराच
दारात बांधलेल्या इंद्रधनुच...
न प्राजक्ताच्या सड्याच ....
      स्वप्न तुझं न माझं …………………
       कधीही न संपणाऱ्या प्रेमाचं ……………
                 प्रत्येकाच्या आयुष्यात असंच
                 एक स्वप्न असतं
                   जे तुमच्याही आयुष्यात  असेल ...........
       स्वप्न तुमचं  न तिचं…….
                                         - राधा

Friday, November 21, 2014

काय यालाच म्हणतात miss करणे | Marathi Missing you Kavita | Miss You Prem Kavita Blog

आठवत तुझ ते मिश्कील हसणे, काळजाआड लपणे
हळूच डोकावून बघणे , अन लांब केसाशी खेळणे
सरळ नाक असूनही वाकडे करणे मग चिडवणे
सगळे आहे आजूबाजूला तरी काहीतरी बोचणे
काय यालाच म्हणतात miss करणे


तू नसूनही तू आहे असे वाटणे
मग सतत मागे वळून बघणे
हळूच मनाला समजावणे
अन जुन्या आठवणींत गुरफटणे
काय यालाच म्हणतात miss करणे

झाली ती परकी | Marathi Alone Lonely Sad Kavita | Feeling Lonely Alone ekta Marathi Break up sad Kavita

राहिले दूर घर माझे,जिथे मला जायचे होते
गेले सोडुन ते ह्रदय,जिथे मला रहायचे होते!

सरावले ह्रदय तिच्या सहवासाला बेमालुम
आता कुणाला त्याने आपले मानायचे होते!

प्रेमाची शीव लग्नाच्या शीवेला लागुन असते
लुटून मला,सीमोलंघन तिला करायचे होते!

बुडत गेलो आकंठ प्रेमात तिच्या मी वेडा असा
तिला तिच्या ह्रदयाच्या खोलीला मोजायचे होते!

का खेळली ती हा खेळ माझ्याशी कळले आता
कसे असते प्रेम गुलाबी,तिला शिकायचे होते!

अनुभवाची बांधून शिदोरी झाली ती परकी
रिता मी अन् रंग स्वप्नात तिला भरायचे होते!

--अनिल सा.राऊत

ती पण माणसच ना? | Marathi Kavita On Life | Kavita in Marathi Fonts | Sad Life Kavita Marathi

नशिबाच्या गुलामगिरीत पडुन कुडामध्ये राहणारी,
नाही दिली साथ समाजाने म्हणून
गावाच्या दुर राहणारी,
गरिबीशी झगडत पुन्हा उभा राहणारी,
नाही म्हटल तरी
निवडणुकांत संपत्ती समजली जाणारी,
झाली विकसित शहरे
तरी खेड्यात अधतपड असणारी
पोटासाठी दिवस-राञ शेतात राबणारी,
अन् त्यांच्यासोबत बालपण विसरुनकाम करणारी लेकरं
शेवटी माणसचं ना?

छळतोय एकातं मला | Sad Virah Prem Kavita in Marathi | Sad Poems for Whatsapp | Sad Virah Marathi Kavita Blog

छळतोय छळतोय एकातं माझा,
पून्हा का असा मला सागंना...

बालपणाचे कवडसे आठवण दूख:चा आरसा,
कधी कुठे पाहिला फूलणारा गोधंळ मित्राचा...
मग मनात उठतो पूनहा एकदा तरंग मौजेचा,
पण एकातातं ना कुणी सखा ना सोबतीचा...

छळतोय छळतोय एकातं मला,
पून्हा का असा मला सागंना...

तारुण्याच्या वाटेवरती हा दूखाचा पसारा,
कधी कूठे भेटले नातेवाईक सोबत नसताना...
मन टूटते पून्हा एकदा नात्याना जोपासताना,
पण एकातातं नसतोत कूणी आपले हात घेताना...

छळतोय छळतोय एकातं माझा,
पून्हा का असा मला सागंना...

कधी कुठे पाहिले दोन फूल फूलताना,
मनात उमलते नवेसे प्रेमभावना...
पण एकातातं माझ्या ना कूणी सखा,
ना कूणी सावरणारा असतो परखा...

© हर्षाला देसाई
             ठाणे.
दि.04.11.2014

तू माझी का दुसर्याची | Marathi Prem Virah Sad Kavita in Marathi Font | Share Marathi Kavita on Whatsapp and Facebook | Marathi Poems For Collage Life

कशी आहेस,कोण आहेस
ठाव नाही मला !
पण तुझ्या hi चा दीवाना आहे
ठाव आहे तुला ! !

बघीतल्या सिवाय तुझा
Whatsapp वर हाय !
दिवसभर मला करमत नाय ! !

तुझ्या सोबत chatting करण्याचा
नांद मज जमू लागला !
तुझ्या profile वरच
जीव रमू लागला ! !

तू online येण्याची वाट बघतो
हातात घेऊन फोन !
तू माझी का दुसऱ्याची
या वेड्या जीवास सांगेल कोण ! !

तुझा अनोळखी चेहरा
माझ्या ह्रुदयी साठू लागला !
जीव माझा वेडा बावरा
तुला मनी गुंतू लागला ! !

whatsapp वरच अवलंबुन
कहानी माझी तुझी !
सोडून internet ची दुनिया
होशील का तू माझी ! !

संजय बनसोडे

सोबत सोडली तू | Breakup Marathi Kavita Blog | Breakup Kavita For GirlFriend/BoyFriend | Sad Break Ip Poems in Marathi Kavita

वाटेवरी तू सोबत सोडून गेल्यावर,
या शब्दानेच मला साथ दिली होती...
एका अनोळख्या विश्वात नेवून मला,
या कविताशी नाती जुळून दिली होती...

तुझ्या विरहाचा हूदंका गिळून मी,
ती विखूरलेली स्वप्न गोळा करत होतो...
तुटक्या मुटक्या शब्दात का होईना,
पण अबोल भावनेला कवितेत गूफंवत होतो...

माझ्या जीवनातील प्रत्येक पहाट ही,
त्या ओसर साजंवेळी सारखी होती...
शेवटी कितीही उगवलं तरीही ,
पून्हा ती मावळण्याची वेळ होती...

आता नकोशी वाटतात ती माणसं,
ती नाती जे पहिले हवेहवेसे होते...
कारण ह्या अनोळख्या जगातून मला,
आपल्याच माणसांनी हाकालून दिले होते ....!!

Special Thanks:-
हर्षवर्धन घोडके

© स्वप्नील चटगे.
(अबोल मी)
दि.02.11.2014

दान नशिबाचं | Marathi Kavita On Nasib | Sad Kavita on Life in Marathi Fonts | Kavita on Aayusha

हातातुन सांडलं सारं
 सुखानं भरलेलं दान नशिबाचं
डोळ्यांनी चक्क बदलत गेलं

नात्यांनीही दारातच रोखलं आभाळात तेव्हा काळोख दाटला
 अन पावसालाही माझे हसु आलं

ना अंगाणात जागा ना
 त्या भिंतीआड आपले कुणी
 माझं आयुष्यं जसे त्या फुटक्या काचा....

वेचुन घेतल्या जरी त्या कुरुपच आता
 जवळ कुणी घेणार नाही म्हणे
 काढतील रगात ह्या

डोळ्यांत आला प्राण
 अन तो ही उगीच भांडतो आहे

जगुही द्यायचे नाही तुला
 मरणही द्यायचे नाही
त्या देवाचा निरोप आलाय
 पैसे हातात नसतील जवळ
 तोवर तुझ्यावरचं एक लाकुडही जळायचं नाही......
 -
 ©प्रशांत डी शिंदे....
 दि.२६/०८/२०१४ ...

तुझ्या साठी जग होतं, पण माझं जगच तुझ्यात होतं | Marathi Prem Kavita On Life | Kavita in Marathi Fonts | Marathi Poems on Life For Whatsapp Facebook Share.

तुझ्या साठी जग होतं, पण माझं जगच तुझ्यात होतं
दुनीयेच्या या गर्दीत नेमकं तुझ्यात अस काय खास होतं?

अवती भोवती सगळ्यांशी
हितगुज तुझी व्हायची
मी मात्र कोपर्यातून
लपूनच तुला पाहायची.

तुझ्याशी बोलायचा विचार होता, पण ते धैर्य कधीच माझ्यात नव्हतं
दुनीयेच्या या गर्दीत नेमकं तुझ्यात काय खास होतं??

मैत्री तुझी सगळ्यांशी
सहजासहजी व्हायची
पण माझ्याकडे चुकूनसुद्धा
नजर तुझी नाही वळायची.

मग मुद्दाम की न जाणून, हे गुपित तुझं तुझ्यात होतं
दुनीयेच्या या गर्दीत नेमकं तुझ्यात असं काय खास होतं??

हसतांना तुला बघून
मी तुझ्यात मला विसरायची
एकांतात बसून
सतत तुला आठवायची.

तुझ्यात जीतकं प्रेम होतं, तीतकं माझच माझ्यात नव्हतं
दुनीयेच्या या गर्दीत नेमकं तुझ्यात असं काय खास होतं??

- अनामिका

Wednesday, November 12, 2014

नि समोरी दिसावी तू | Marathi Prem Kavita Blog | Love Poems in Marathi Font | Poems For Lover

स्वप्ने सारी दुरावली
तू दुरावू नकोस ना
जगण्याचा आधार हा
तू हिरावू नकोस ना

हास्य तुझे पाहतो मी
फार काही मागतो ना
चांदण्यात नाहतो मी
चांद हाती ओढतो ना

सुख नको काही पण
दूर लोटू नकोस ना
मिसळतो मातीत मी
पाय देवू नकोस ना

विझावेत श्वास माझे
तू समोर असतांना
नि समोरी दिसावी तू
पोटी तुझ्या जन्मतांना

विक्रांत प्रभाकर

समजून बसलो | Marathi Lekh in Marathi Font | Sad Virah Kavita in Marathi Font | Alone Marathi Poems Blog

दगडात भावना नसतानाही
त्याला देव समजून बसलो !
स्मशानात नव्हते काही
तेथे भूत समजून बसलो !
दारी आले जनावर
त्याच्यात सॄष्टी समजून बसलो !
कान फुंकुणी मारी मंतर
त्याला डॉक्टर समजून बसलो !
केस सोडून झूले बाई
तिला देवी समजून बसलो !
देव कोपेल माझ्यावर मनुण
बाभनाच्या हातून पूजा शांती करून बसलो !
होते नव्हते सारे काही
त्याच्या चरणी ठेऊन बसलो !
होते सारे काही तरीही
देवार्यात आणखी मागित बसलो !
या अंधश्रध्दा मुळे असे मी फसलो
जातीची गाडी सोडून दुसऱ्याच गाडीत बसलो !

- संजय बनसोडे

Friday, November 7, 2014

आपलीच मानसं अशी का वागतात | Marathi Kavita on Selfish People | Marathi Sad Life Poems | Mean People Marathi Sad Kavita

आपलीच मानसं आपल्याशी अशी का वागतात,
सारं काही कळणारच असतं, तरी का लपवतात.
त्यापेक्षा परकेपणा असलेला बरा............,
लपवलेल्याच दुख त्यांच्याकडना  होतं नाही,... आपल्यानकडनाच होतं.
त्यांनी परक्यासारखंच  वागायचं नेहमी वेळ आल्यावर,
आपणच आपलं जपायचं नातं.

रोज समोर भेटतात तेव्हा उगाच हसत राहतात,
काय माहित लपवतात किती काय मनात,
इतरानकडून एक दिवस उलगडतात गुपितं,
आणि मग वाटायला लागतं आपणच का जपायचं नातं.

आपल्याकडचा साधा अंकुरही साऱ्यांना कळतो,
पण त्यांना कसा काय त्यांचा बहरही लपवता येतो ?,
तेव्हा कळते  केवळ तोडता येत नाही म्हणून जपातायेत ते नातं.

नात्यात सुद्धा त्यांना परतफेडीची आस असते,
पण याला खरंतर व्यवहार असं म्हणतात,
या व्यवहारामुळेच नाती कमकुवत बनतात,
आणि आपलेपण हि तसंच कमी होत जातं.
मग कठीण असतं टिकवणं नातं.

नात्यात खरंतर मोकळीक हवी मनाची,
पण आपल्याच माणसांकडना  वाटते भीती तरी कशाची ?
याच भीतीपोटी बऱ्याच गोष्टी लपवल्या जातात,
"वेळ येईल तेव्हा कळेल सारं" हि पळवाट असते.....
खरंतर त्यांना सारं काही लपवायचं असतं,
समजून घ्यावं तेव्हा, त्यांना जड झालंय नातं.

समोरच्याच्या आनंदात आपलाही आनंद असतोच कि,
पण कधी कधी त्यांनाच आनंद वाटायचा नसतो,
दुख कधी त्यांच्या आनंदच होतं नाही,
दुख होतं खरं लपवल्याच.............आणि,
वाईट वाटतं आपल्याच माणसांच्या गोष्टी इतरांकडून कळल्याच,
.
.
.
असो आनंद आहे त्यांच्या आनंदात,
आणि त्यांनी जरी परकं केलं तरी जपणार मी नातं,
पण कळत नाही हेच कि माझं काही चुकलं नसतांना,
आपलीच मानसं अशी का वागतात.

...अमोल

मरणे सोपे होते, जगण्याने छळले | Marathi Emotional Kavita | Sad Virah Kvita on Life | Marathi Short Smal Kavita

मरणे सोपे होते, जगण्याने छळले
निरंतर जपलेल्या एकांताला हेच माझे उत्तर आहे.....

मग ढोंगी या जगापुढे हे ढोंग तरी कसले?
माझ्या या प्रश्नाला मीच निरुत्तर आहे.....

त्यांच्या साठी जो झटला त्याला लाथांनी तुडवले
हा सडलेला राजकारणी आज समाजासाठी अत्तर आहे....

लाख पैसा कमवून त्याला गमावण्याचीच भीती असते
फाटक्या झोळीत समाधानी, हा भिकारी तरी बेहेत्तर आहे......