Thursday, May 1, 2014

तिचं भांडण | Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता

छोट्या  छोट्या
कारणावरून
तिला  भांडल्याशिवाय
करमत  नाही

भांङून  पुन्हा
परत  तिला
बोलल्याशिवाय
करमत  नाही

दोन  चार  दिवसाला
तिचं  भांडण
ठरलेलं  असतं

रुसून  पुन्हा
तिचं  हसणं
ठरलेलं  असतं

भांडल्यावर  कोण
पहिल्यांदा  बोलतो
असा  यक्षप्रश्न
आमच्यापुढे   आसतो

ताटाखालचं   मांजर
होणार   नाही
गुलामगिरी   तिची
सहन  करणार  नाही

म्हणते  ती  स्वतःला
पाणी  लावणार   नाही
मीच  का  बोलावं
आता  जमणार  नाही

बाळ   आमचं  पडतं
अचानक च    रडतं
विसरतो  भांडण
मन  आमचं  जुळतं............


                । कवि-डी ।
                 स्वलिखीत
                  दि. 17.03.2014
                वेळ. रात्री 09.24

No comments: