Friday, May 30, 2014

बाकि........ मी मस्त आहे | मराठी प्रेम विरह कविता | Marathi Breakup Kavita | Prem Bhang Kavita | Lonely Without You Marathi | Marathi Virah Kavita

हो, तू नाहीस म्हणुन
मन जरा अस्वस्थ आहे
होऊ दे त्याला काहीतरी
मी माझ्या कामात व्यस्त आहे
बाकि........ मी मस्त आहे ........
हो, श्वासही कोंडतो कधी कधी
त्याच्यावारही एकतेपनाचा ताण आहे
होइल कधीतरी सरळ,
त्यालाही वस्तुस्थितिचे भान आहे
बाकि, मी एकदम छान आहे .........
तू आठवण करून द्यायचिस
की मला झोप येत आहे
आता नाही येत, नकोच ती!
भलत्या स्वप्नांवर ही मात आहे
बाकि, मी मजेत आहे ................
गालांवर, डोळ्यांच्या खालि,
ओलावा आहे, फार बोचरा आहे
पण असू दे, कारण त्याच्या प्रत्येक थेम्बात
तुझाच हसरा चेहरा आहे
म्हणुन मी तसा बरा आहे .............
.
मी कसा का असेना,
बोलुन चालून एक विझलेली राख आहे
तू कशी आहेस ग??
बस्स, तेवढीच एक रुखरुख आहे

1 comment:

b said...

kharch sir khup apratim kavita ahe...janu ka tumhi majhach manatlch bolale