Friday, May 16, 2014

काय अर्थ याचा ? | Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता | Ek Tarfi Prem Kavita

तिरपा कटाक्ष तुझा अंन
हलकेच तू हसावे,
हलकाच स्पर्श तू मजला करावा,
            काय अर्थ याचा मजला कळावा!
दिसताच मी, तू सैर भैर व्हावे
हलकेच पापण्यांचे जणू पंख व्हावे,
हात ठेउनी वक्षावर मनी भाव हा वसावा,
            काय अर्थ याचा मजला कळावा!
जाता समोरुनी मी
तू आरश्यात पाही,
हात वारे करुनी मज खुणवावा
            काय अर्थ याचा मजला कळावा!
कधी नावासमोर तुझ्या,
कधी माझेच नाव यावे,
अर्थ तुझ्या मनीचा कोणा कसा कळावा,
            काय अर्थ याचा मजला कळावा!
का असेल का हि " प्रीत "
तुझिया मनीची,
काय संदेश तुझिया मनीचा मजला कळावा
            काय अर्थ याचा मजला कळावा!

कवी प्रकाश साळवी दि. १८ मार्च २०१४ दु. ३.०० वा

No comments: