Saturday, August 7, 2010

स्वप्न

पानीदार डोळ्यांची सखी
पुन्हा आज भेटली, स्वप्नातच रे
मोजक्याच क्षणांची सोबत
माझ्याशी बोलली, हलकीच रे

तिखट गोडवा, पुन्हा चुकला
तिथेच..... स्वप्न संपले
मुठितली वाळु झरताना मात्र
काही व्याकुलसे रंध्र लिम्पले

माझी प्रीत तर निमिषात फूलते
त्यास स्पर्श कशाला हवेत
नात्यांच्या पल्याड, वास्तावानंतर
असे स्वर्ग, माझ्याच कवेत.

- प्रशांत

No comments: