Saturday, August 7, 2010

कश्या कश्या वर म्हणुन रडायचं?

कशा-कशा वर म्हणुन रडायचं?
कुणा-कुणा वर म्हणुन चिडायचं?
काहीही सुचन्याच्या पलिकडे आहे हे सारं,
मनात इतका राग भरलाय, एकेकाला झोड्पू वाटतं
ओरडू वाटतं, ढसा ढसा रडू वाटतं..


कित्तेकदा लढू वाटतं! पण कुणाशी, कशानी आणि किती लढणार?
पुन्हा तोंडघशी आपणच पडणार, नाही तर लढता लढता मारणार..
गावभर फोटो आणि नावा आधी शहीद लागणार,
पण शहीद होण खर्च आहे का इतका सोपं?
नुसत्या विचारांनीच अंगावर काटा येतो!
वीर मरण भेदाडांना येत नसतं!
नाही तर आम्ही इथे लिहित बसलो नसतो!

आम्हाला फक्त बोटं दाखवायला येतात एकमेकांवर.
वेळ आपल्यावर आली की हाथ वर करुण रिकामे..
निव्वळ घरात बसून येणा-यां जाना-यांवर केकाटणारे आम्ही..
त्या गल्लीतल्या कुत्र्या सारखे...
पिसाळलाच एखादा तर आहेच मुंसीपाल्टी!
हिम्मतच पाहिजे ... पण साले सगलेच भेदरट..
सिंहाच्या जीगराचे तर गेलेच लढता लढता.
आम्ही उरलोय त्यांच आयतं शौर्य मिरवायला..

......................................... चक्रवर्ती

No comments: