कळत नकळत सगळ घडत होते,
आणि मी तुझ्यात गुंतत होते
चेहर्यावरचे हसू सुद्धा तूच,
आणि डोळ्यातले अश्रू सुद्धा तूच
जीवनाचे गाणे सुद्धा तूच,
आणि मनातले तरंग सुद्धा तूच
माझा श्वासही आहेस तूच,
आणि माझी रासही आहेस तूच
जीवनाला अर्थही आहेस तूच,
आणि जीवनातला पार्थही आहेस तूच
माझ्या जीवनाची दिशा ही तूच,
आणि माझ्या जगण्याची आशाही तूच
मी सुद्धा तुझीच आहे,
आणि फक्त तुझीच आहे...................
.
.
.
-उज्वला राउत
No comments:
Post a Comment