आज तु मनात विचार करशील कोण मी
अर्थातच निदान आज तरी कोणी नाही
मन म्हणेल हा उगाच त्रास देतोय मेला
आज मी स्वर्गात आहे, इथं जिवंत कोणी नाही
आज तु म्हणशील कधी भेटली मी याला
तुला आठवेल न आठवेल पण आठवतय मला
तु म्हणशील असं का म्हणुन सतवतोस तु मला
खरंच मला माहित नाही कोण जबाबदार याला
ओठांवर थोडसं हसु तरी आलं असेल कवितेसाठी
खरंच नसेल आवडत तर तसं सांग तु माझ्यासाठी
तुल त्रास होत असेल तर सोडेन मी लिहिणं कविता
रात्र जागुन लिहितोय ह्या कविता अखेर तुझ्यासाठी ....
No comments:
Post a Comment