Saturday, August 7, 2010

तर..!

वाटणारी प्रत्येक गोष्ट
शब्दांत मांडता आली तर...
मनातली प्रत्येक भावना
बोलुन दाखवता आली तर...
तुझ्यावर प्रेम आहे,
हे सहज सांगता आलं तर..

तुझ्याशिवाय जगुच शकत नाही,
हे पटवुन देता आलं तर...
तुझी खुप आठवण येते
हे विसरुन जाता अलं तर....

तुझ्या पलिकडे सुध्दा आहे
हे जाणुन घेता आलं तर...
माझं सुध्दा अस्तित्व आहे,
हे समजुन घेता आलं तर...

तु फक्त माझीच आहेस,
हे तुला न सांगता कळलं तर..
तु अशिच जवळ रहा,
हे स्पर्शानं सांगता आलं तर...
तु जवळ नसतेस तेंव्हा,
तुझा स्पर्श जाणता आला तर..
किती बरं होईल,
जर मन वाचता अलं तर...

शब्दांपलिकडलं काहीतरी
नजरेनच जाणता आलं तर...
हे सगळेच "तर" नाहीसे होतील
एकदाच म्हणालीस जर...
"मी सुखी होईन,
जर तु माझाच झालास तर..!"

1 comment:

Sandesh Kesarkar said...

छान👌👌👌 भावनिक आणि वास्तववादी सुद्धा.👏👏👏