Saturday, August 7, 2010

आज चुकुन

आज चुकुन माझ्या वाटेवर सर्व सर्व सर्व आलेय
सोबतीला आज माझ्या आनंदाचे दूत आलेत
मीलनाचे वारे आज चहूकडे वाहू लागलेत
धुमकेतूच्या धुलिकणांना आज पावसाचे वेध लागलेत...

आकाशातील सर्व तारका आज मुळी हसतच होत्या
पावसाच्या तुषारथेंबाना आज त्या चिडवित होत्या
पाने फुले आणि आसवे सारी आज खुशीतच आहेत
फक्त तुझ्या असण्याने आज रविकिरणेही मंद आहेत
रात्रीच्या ह्या अंधारातही आज लख्ख प्रकाश आहे
मला हसत ठेवण्यासाठी चंद्र रांगेत उभे आहेत

पण,

शेवटी सारे माझे प्रश्न उत्तराच्या पाया पडले
तारकांच्या हसूमधले रहस्य मला आज कळले
अजूनही त्या तारका सर्व पाहून हसतच होत्या
गालावरच्या तुषारांना पावसात मिसळीत होत्या
अंधारातील तो प्रकाश आता मात्र तिथे नव्हता
कडाडून तो विजेसारखा हात हलवित गेला होता
जाउदे म्हटलं तरी तेच परत समोर येत
एका तिच्या आठवणीने डोळ्यात मात्र रडू येतं
हिरव्यागार लाकडात आग लावून कसं होत
धगधगणारया आगीचं त्याला मुळी भयच नसतं
धुराच्या त्या लोणाने ते मात्र तडफडत असतं
मन मात्र त्याचं तेव्हा प्रत्येक क्षणी मरत असतं
प्रत्येक क्षणी मरत असतं

No comments: