Wednesday, January 28, 2015

विसरता न आले | Virah Marathi Sad Kavita | Cant Forgot You Poems In Marathi

फूल गुलाबाचे कधीचे ते गळाले
तूझे शब्द मजला विसरता न आले
गहिवरून गेलो तूझ्या आठवणींनी
माझेच मजला सावरता न आले
कशी भेट झाली अन् जुळले नाते
नात्यात जुंपलेले क्षण बांधता न आले
आलीस तू घेण्या ऊत्तुंग भरारी
पंखांनी पण मजला ऊडता न आले
तू मधुराणी तू सुगंध घेऊन आली
पण सुगंधात मजला बहरता न आले
शब्दात बांधीले जरी तू मजला परी शब्दाविण मजला ऊमगता न आले
सहजच तू हे ह्रदय जिंकुन गेली
ती हार पण मजला हारता न आली...

कधी येशील तू ., सांग ना ?? | Marathi Miss You Kavita | Please Come Back Marathi Poems | Sad Miss You Kavita in Marathi

कधी येशील तू ., सांग ना ??
तू कुक्कुल्ल बाळ माझं ., दिसशील कोणासारख ?
मन मिळाऊ असशील ., कि शांत पप्पा सारख ...
शब्द बोलण्याआधी एकदा ., " आई " म्हणशील ना …
कधी येशील तू  ., सांग ना ??

चाहूल तुझ्या येण्याने ., मनी फुललाय पिसारा .,
तुझ स्वागत करण्या ., मोहल्ला जमा झालाय सारा .,
कान अतुरलेत आमचे ., तुझे रडणे ऐकण्या .,
कधी येशील तू  ., सांग ना ??

उंच उंच आभाळी ., तुज झोका मी देईन .,
अलगद उचलुनी तुजला ., कवेत मी घेईन .,
आतुरलेत डोही माझे ., तुझे रूप भरण्या .,
कधी येशील तू  ., सांग ना ??

कसा सावरेल मी संसार ., अन कशी पेटवेल चूल ;
एकीकडे माझे सर्वस्व ., एकीकडे मुल .,
झालीच धावपळ थोडी ., पण तू समजून घे ना .,
कधी येशील तू  ., सांग ना ??


मनात घालमेल प्रश्नांची ., अन काळजी तुझ्या भविष्याची .,
अजूनही स्वप्नातच असल्या सारख ., ती जाणिव तुझ्या स्पर्शाची .,
या चारबाहू सज्ज आहेत ., कवेत तुला घेण्या  .,
कधी येशील तू  ., सांग ना ??

कधी येशील तू  ., सांग ना ??

अक्षय भळगट
२१.०१.२०१५

तुझ्या माझ्या प्रेमाचा शेवट का झाला ? | Marathi Break Up Kavita | Marathi Heart Break Kavita | Sad Poems For Whatsapp

सुखाचा गोड धागा
कडवट का झाला
तुझ्या माझ्या प्रेमाचा
शेवट का झाला ! !


आपुलकीच्या नात्यात
कमी कोण पडले
दोघांच्या प्रेमात
तिसऱ्याचे काय अड़ले
सात जन्माच्या सोबतीचा
एकाच जन्मी अंत का झाला
तुझ्या माझ्या प्रेमाचा
शेवट का झाला ! !


दुसऱ्याच्या सांगण्यावरून
मज दिले तू सोडून
होती तुझी अर्धांगनी
अर्ध्यातच सोडिले डाव मोडून
खंबीरपणे उभा राहणारा तू
असा अर्धवट का झाला !
तुझ्या माझ्या प्रेमाचा
शेवट का झाला ! !


नाही मोडिलें मी
तुझ्या इभ्रतीचे तत्व
दिले आहे तुलाच
मी माझे सर्वत्व
गात होता प्रेमाचा गोडवा
आता तुला वीट का आला !
तुझ्या माझ्या प्रेमाचा
शेवट का झाला ! !


लावीले तुझेच कुंकू
जपून पत्नीचे सूत्र
घातले मी गळ्यात
तुझ्याच नावाचे मंगळसूत्र
होता आधी प्रेम वेडा
आता जळफळाट का झाला
तुझ्या माझ्या प्रेमाचा
शेवट का झाला ! !


संजय बनसोडे

Sunday, January 25, 2015

प्रत्येकाची एक कहाणी असते | Marathi Kavita on Athavani | Miss you Marathi Kavita

सुखः दुखः ने विणलेली प्रत्येकाची एक कहाणी असते.
कधी गोड तर कधी कडू आठवणींची शिदोरी असते.
सुखः हसण्याच्या रुपात तर दुखः अश्रूंच्या रुपात वाहते.
पहिल्यांदा केलेल्या गोष्टींचे स्पुरण असते.
दुसर्यांचे पाहून केलेले अनुकरण असते.
आठवण्यासारखे बरेच असते आणि विसरण्यासारखे काहीच नसते.
आयुष्याच्या लघुपटावर आपणच जिंकलेलो असतो.
कारण छान जगण्या  इतपत तरी आपण  शिकलेलो असतो.

Friday, January 23, 2015

कशी आहेस,कोण आहेस ठाव नाही मला | Marathi Love Prem Kavita for Facebook

कशी आहेस,कोण आहेस ठाव नाही मला !
पण तुझ्या hi चा दीवाना आहे ठाव आहे
तुला ! !
बघीतल्या सिवाय तुझा, Facebook वर
हाय !
दिवसभर मला करमत नाय ! !
तुझ्या सोबत chatting करण्याचा नांद मज
जमू लागला !
तुझ्या profile वरच, जीव रमू लागला ! !
तू online येण्याची वाट बघतो, हातात घेऊन
फोन !
तू माझी का दुसऱ्याची
या वेड्या जीवास सांगेल कोण ! !
तुझा अनोळखी चेहरा, माझ्या ह्रुदयी साठू
लागला !
जीव माझा वेडा बावरा, तुला मनी गुंतू
लागला ! !
Facebook वरच अवलंबुन,
कहानी माझी तुझी !
सोडून internet ची दुनिया
होशील का तू माझी !

आपला रस्ता नि आपलेच पाय | Marathi Kavita on Life |

पुन्हा कोसळलो 
आदळलो खाली 
खरचटलेली
जखम कण्हली

पुन्हा उसळलो
जरी होत लाही 
कुठे जायचे ते   
कळलेच नाही 

स्वप्न सजविले 
हिम पांघरले   
परंतु मातीत 
मन अडकले 

असे कुणाचे 
भाग्य थोरले 
पावसात जे 
वाहून गेले 

आणि शेवटी  
उरले ते काय 
आपला रस्ता नि 
आपलेच पाय 

विक्रांत प्रभाकर 

Tuesday, January 20, 2015

आम्ही प्रेम असच करावं | Prem Kavita Marathi | Love Crush Marathi Poems

लपून लपून तिला पहावं
तिला पाहण्यासाठी झुरावं
तिच्या एका नजरेसाठी मरावं
अन् तिन पाहताच स्वतःला लपवावं

आम्ही प्रेम असच करावं

तिच्याशी बोलण्यासाठी तडफडावं
बोलायला गेल्यावर शब्द ही न सुचाव
आम्ही नेहमी मूक होवून जावं
मुक्यानेच तिच्यावर प्रेम कराव

 आम्ही प्रेम असच कराव

ती जात असलेल्या वाटेवरून  जावं तिच्या पाठमो-या आकृतीला पहावं
तिने मागे वळता आम्ही वळावं
काही न बोलताच निघून जावं


दुसर कोणीतरी तिला पटवावं
तरी आम्ही मूक रहावं
त्यान अन् तिन बागेत फिरावं
आम्ही पुतळ्यासारख नुसत पहावं


ती निघून गेल्यावर तडफडत रहावं
तिच्याच आठवणीतगढून जावं
तिच अन् त्याच लग्न ठरावं
तिच्या लग्नात आम्ही अक्षदा वाटावं

तिन आणि मी एकदा भेटाव ं
सोबत तिच्या तिच बाळ असावं
त्याने आम्हास मामा म्हणावं
हजार कमानी घुसल्या सारख वाटावं


खूप दिवस असच तडफडावं
एक दिवस दुसर पाखरू  दिसावं
त्याच्यावर माझ आमच प्रेम जडावं
पुन्हा आम्ही प्रेमात पडावं 

सुटला हाथ तुटले बंध | Marathi Heart Touching Break Up Kavita | Virah Kavita Marathi Sad Poems

काळाची चाहूल आली
माझी सुखाची बाग़ करपुन गेली
अस कस विपरित झाल
होता माझा सोन्याचा संसार
राणीचा संसार झाला तुझ्या विना सूना
एक्टीच आता घरात भिंतीही
बोलत नाही
प्रेम अस का रे आटल
नात अस का रे तूटल
माझ पाखरु ही घेऊन गेला
संगति तू
तिची चिमूकली पाउल
पायी छुनछुन पैंजन
तिची बोबड़ी ती बोली
जिव घेते आज
मन सुनसान झाल
बेरंग ही स्वप्न सारी
माझ्या पाखराची चाहूल
घेते मानाचा ठाव
तिची प्रेमळ मीठी
तू हिरावून नेलिस
दे तिला मायेची साऊली
दे ममतेचे पांघरन
गा अंगाई तिच्या साठी
लाड पुरवीन्या नाही
तिथ तिची माय

            दुर्गा वाड़ीकर

फक्त तूच | Prem Kavita For GirlFriend | Marathi Poems For Her / Girlfriend

तूच सत्य तू स्वप्न,
तूच सागर तू किनारा.....

तूच मन तू भावना,
तूच लहर तू सहारा.....

तूच आस तू आभास,
तूच कारण तू बहाणा.....

तूच श्वास तू खास,
तूच नदी तू धारा.....

तूच गाथा तू कथा,
तूच जीवन तू मरण.....

तूच ह्रदय तू धडधड,
तूच कर्म तू धर्म.....

तूच प्राण तू ध्यास,
तूच सार्थ तू अर्थ.....

फक्त आणि फक्त,
तूच माझं सर्वस्व.....

स्वलिखित -
दिनांक १२/०१/२०१५...
रात्री १०:१७...
©सुरेश अं सोनावणे.....

का तू मला आवडायचास | Prem Kavita Marathi Font | Poems in Marathi Font | Love Poems For Whatsapp Facebook

का तू मला आवडायचास….
जर तू माझा नव्हतास………
का माझ्यावर हक्क गाजवायाचास
का माझ्या डोळ्यातील भावना टिपायचास
मी दुखी असताना मला हसवायाचास
मला  सुखद स्वप्नांत रंगवायचास
जर तू माझा नव्हतास………
का मला रोज भेटायाचास
का माझ्या इतका जवळ यायचास
माझ्यात पूर्ण रंगून जायचास
माझ्या शब्दाने वेडा  व्हायचास
जर तू माझा नव्हतास………
हो एक दिवस साऱ्या जगाला पटेल कि तू माझा नव्हतास
एके  दिवशी मीही म्हणेल कि तू माझा नव्हतास
पण खर सांग  तुझ्या मनाला तू कसं पटवशील
कि खरंच तू माझा नव्हतास………
                                             राधा 

आयुष्य | Busy Life Marathi Poems | Marathi Kavita on Life Ayushaa | Busy Wroking Life Kavita in Marathi

आयुष्य

रोज रोज त्याच गोष्टी, 
नवीन काही घडत नाही. 
घर ते ऑफिस, ऑफिस ते घर, 
याच्या शिवाय पाऊल कुठे वळत नाही. 

आयुष्य झालय धावपळीचं,
स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही.
घरचे सुखी रहावे म्हणून, 
मार्ग शोधत फिरतो दिशा दाही. 

स्वतःसाठी काय करावं, 
हे ही मी विसरून जातो. 
कुटूंब सुखी राहीलं पाहिजे, 
याच विचारात वाहून जातो.

घड्याळ्याच्या काट्यासोबत,
मी देखील धावतो आहे.
ते वेळा वेळाने एकत्र तरी भेटतात,
पण घरच्यांसोबत वेळ घालवायला क्षणासाठी मी तरसतो आहे.

हे जीवन म्हणावे कि संघर्ष,
श्वास माझा कोंडतो आहे. 
जिवंत मी असुनही, 
मेल्यासारखे जगतो आहे.

या वळणावर सुखी असलो तरी,
पुढच्या वळणावर दुःख हे भेटत असतं.
सुख दुःखाच हे चक्र, 
न थांबता फिरतच असत.

आयुष्यावर लिहायला मला,
"आयुष्य" ही कमी पडणार आहे.
काय कमावलं नी काय गमावलं,
हे विचार करत आयुष्य माझे जाणार आहे.

यल्लप्पा कोकणे
15/01/2015

Thursday, January 15, 2015

नाही साहेब तुमचा मला राग नाही | Virah Prem Kavita | Marathi Lekh In Marathi Font

नाही साहेब तुमचा मला राग नाही
तुमच्यावर डरकायला मी काही वाघ नाही ! !

बारा महीने कष्ट करून मी जे पिकवीतो शेत
त्याच्यातल कोरभरही माझ्या हाती नाही येत !

सरकार दया मया करून जे अनुदान देत
ते तर सार तुमच्या खिशातच जात !

माजलेला वळू तुम्ही आमच  थोड ऐकणार
विचारल कुणी तुम्हा,  आमच्या नावानेच बोंबलणार!

तरीही तुमच्या चरित्र्यास थोडाही डाग नाही
तुमच्यावर डरकायला मी काही वाघ नाही ! !

लाखों करोडोचे अनुदान डोक्यात काही बसत नाही
खात्यात येते तेंव्हा काय कराव सुचत नाही !

त्या पेक्षा जास्त ते येण्यासाठीच खर्च केलेले असतात
ते काढण्यासाठी जेवढे खर्च केले, तेवढेही ते नसतात !

बोलू तर कुणाला बोलू आम्हाला कुणाची साथ नाही
तुमच्यावर डरकायला मी काही वाघ नाही ! !

संजय बनसोडे

आठवण | Marathi Athavan Prem Kavita | Prem Kavita For GirlFriend | Prem Kavita For Her

आठवण
तुझ्या प्रेमाची

आठवण
तुझ्या हसण्याची

आठवण
तुझ्या रूसण्याची

आठवण
तुझ्या रागवण्याची

आठवण
त्या प्रत्येक क्षणाची
तुझ्या सोबत घातलेल्या त्या प्रत्येक गोष्टीची

आहे आता फ़क्त ती आठवण :
  ~प्रेम जोशी❤

जमेल का पुन्हा तुला | Sad Love Poems in Marathi | Virah Sad Nirash Kavita in Marathi | Heart Break Marathi Kavita

जमेल का पुन्हा तुला,
माझ्यावर प्रेम करायला,
घरच्यांची नजर चुकवून,
मला चोरुन भेटायला.....

जमेल का पुन्हा तुला,
माझ्या स्वप्नात रमायला,
गोड आठवणी आठवून,
मला मिठीत घ्यायला.....

जमेल का पुन्हा तुला,
माझ्या पाऊलखुणा शोधायला,
अनोळखी वाटेत चालताना,
माझा हात हक्काने धरायला.....

जमेल का पुन्हा तुला,
माझ्या डोळ्यात बुडायला,
माझी शोना शोना म्हणत,
I Love You बोलायला.....

जमेल का पुन्हा तुला,
माझ्या ह्रदयात रहायला,
जूने वाद-विवाद विसरुन,
तुला माझं व्हायला.....
--
स्वलिखित -
दिनांक ११/०१/२०१५...
सांयकाळी ०७:१७...
सुरेश अं सोनावणे.....

आयुष्याची बेरिज वजाबाकी | Sad Life Poems in Marathi | Kavita on Aauysha in Marathi Font

का मला आज असं होतंय
का खुप एकटं एकटं वाटतंय
लागलेले डोळे माझे आशेकडे
मन मात्र मोकळच माझ्याकडे...

सुरु झालीय अचानक मनात
आयुष्याची बेरिज वजाबाकी
काय मिळवलं काय गमवलं
पडताळा जुळतोय कि काही बाकी...

डोळ्यांदेखत निसटल्या गोष्टी
आठवण मात्र अजूनही येते सारखी
घबाडाच्या नादात गमवलं खुप काही
खंत गमवल्याची डसते हृदया सारखी...

का ठेवले नाही स्वत:साठी क्षण काही
मर्जी संभाळताना प्रत्येकाची भानच राहीले नाही
झेलली दु:खे बरिच अजुनी उरी बाकी काही
कसरतीत तारेवरच्या झाली जिवाची लाही लाही...

माझ्या जिवनाची लांबी रुंदी मी
का नसेल स्वत:साठी मोजून घेतली
सर्वांना सुखे देऊन ज्यांची त्यांची
दु:खे मात्र मज पदरात पाडून घेतली...

विचार येतो खरंच शेवटच्या क्षणी
फार उशिर झालाय कि मलाच नव्हती घाई
लांबी रुंदी अन् झाली बेरिज वजाबाकी
यावा नकळत तो अन् जिवनाची सांगता व्हावी ...

ऐश्वर्या सोनवणे  मुंबई 

Monday, January 5, 2015

किती सोप्प असत … कोणाला टाळण | Ignoring Marathi Kavita | Marathi Kavita ignore by her | Read Marathi Poems Online free

किती सोप्प असत , कोणाला टाळण ।

कितीही सांगितलं या मनाला तरीही ., ऐकत नाही ,

आज परत एक गैर समज दूर झाला ………….

"एक"-मेकांना समजून घेताना , कधीच वाटल नाही कि ,
शेवटी तो "एक" मीच आहे … जो समजून घेतो…

वाटायचं कि , आपल्याला कोणीतरी ऐकेल , अस मिळालं ।
समजून घेईन ,
चुकत असेल तर सांगेन ,

पण हसायला येत असत , स्वतःवरच … आणि नंतर , सगळ झाल्यावर ….

किती सोप्प असत , कोणाला टाळण । १)

मन मानत नाहीये …, कि अजूनही "ती" जातीये …
एका अशा ठिकाणी कि , परत कधीच , चुकूनही या वाटेकडे बघताना ….
तिला " हि वाट" मोकळी नजर असावी , अस वाटेल … !

आणि एक वेळ अशी हि होती कि ,
एकट रस्त्याने चालताना सुद्धा , तिला …
मी सोबत असल्यासारख वाटायचं … खरंच ….!

किती सोप्प असत , कोणाला टाळण । २)

आजही बोलताना वाटत तिला सांगाव,
कि …. चांगल आहे विसरलीस ते  ;

कि परत त्याच  FEELINGS  , ज्या आधीही
या समाजाकडून मिळत राहिल्या , त्या तुझ्यामुळे सतत या जिवाला
हेच आठवण करून देतात कि , खरंच …. !

किती सोप्प असत , कोणाला टाळण । ३)

पण एक वेळ अशीही येईल कि ,
तुला हेच वाटावे …,

खरच ; आज मी असतो अजुनहि ,

तर तुला समजावू शकलो असतो ,
ऐकू शकलो असतो ,

पण , …. पण "ती वेळ" शेवटची असेल ।

कारण , या शरीरातून , या मनातून ….
तेच भाव … तुझ्या पर्यंत पोहोचायला , त्या FEELINGS ,
त्या भावना , माझ्यात  उरल्या नसतील … !

आणि त्या वेळी , तुही हेच म्हणशील कि….

" अक्षय "   खरंच …,

किती सोप्प असत , कोणाला टाळण । ४)


अक्षय भळगट

पदरात दु:ख माझ्या | Sad Alone Marathi KAvita in Marathi Font | Marathi Kavita on Life | Sad Life Marathi Poem

पदरात दु:ख माझ्या देवाने इतक दिलय
जित तिथ मला त्याने हानून पाडलय

ना कुणाचा हात हाती सोबतीला माझ्या
ना कुणाच्या शब्दांचा आधार मनास माझ्या

ह्रुदयाला माझ्या इतक्या खोल आहेत इजा
कि मलमपट्टी करूनही होणार नाहीत त्या वजा

समुद्राच्या मधोमध अडकलीय जीवनाची नाव
ना कीनारा सापडेना ना कुठले गाव

खोलवर अंधारात जिवन जाउन थबकलय
साधी प्रकाशाची ना चाहुल अनं जिवन हातुन निसटलय..

®ऎश्वर्या सोनवणे. मुंबई

झालो जर श्वास तुझा | Prem Kavita For Her | Marathi Prem Kavita For Girl-Friend

झालो जर श्वास तुझा...
ठाव मनाचा घेईन मी,
आवडले मज मन तुझे जर...
तिथेच नेहमी राहीन मी !

घे सामाऊन श्वासामध्ये…
अंत:करणात जाऊ दे,
कोण दडलंय हृदयात तुझ्या…
निरखून जरा पाहू दे !

असीम तुझे सौंदर्य जसे…
मनही सुंदर असेल का ?
तीच माझ्या कल्पनेतील...
छबी मला दिसेल का !

अबोल अशी प्रीत सखे…
सांग तुला कळेल ना ?
भाव दिसतील नयनांतुनी,
ज्योत प्रेमाची जळेल ना !

कवी- दिपक यशवंते "मैत्रेय"

आशा + Marathi Kavita On Hope | Poems in Marathi | Hope Aasha Kavita in Marathi

जीवनाच्या वाटेवर चालताना
कितीतरी वळणे येतात….

पुढे आल्यावर त्या वळणांतून
तीही किती साधी वाटतात….

समोर आलेले कुठलेही संकट
वेळेबरोबर  आपच  सुटून  जातात ….

घाबरून गेलो या वळणांना
तर माघे खेचणारे बरेच असतात….
म्हणून प्रश्न प्रश्न नसते करत राहायचे निव्वळ,

ते उलगडविण्यासाठी लागणारी  कौशल्ये
आत्मसात करायची असतात ….

नव्या आशा ठेवायच्या असतात,
आणि नवी स्वप्ने बघायची असतात….

संधींना ओळखून,
सदा पुढे नि पुढेच चालत रहायचं असतं,
आणि आयुष्य हसत हसत जगायचं असतं….

वेदांती आगळे 

नवीन वर्षाच्या वाटेवर | Marathi New Year Poem | Navin Varsh Marathi Kavita Online

जुन्या वर्षाचे दुःख सारे घेउन कडेवर
जात आहे मी नवीन वर्षाच्या वाटेवर ! !

नवीन वर्षात असती नवीन आशा
पदरात पड़ते मात्र दरवर्षी निराशा !
फास्टच फास्ट धावे ही महागाईची ट्रेन
उपाय नसे काही म्हणून  सळसळे माझ ब्रेन !
तरंगत असतो दरवर्षी दुखाच्या लाटेवर !
जात आहे मी नवीन वर्षाच्या वाटेवर ! !

थर्टी फर्स्ट च्या पार्टीसाठी ना देत कुणी होकार
माझ्या सारखेच असती सारे ना पूरे कुणा पगार !
नवीन वर्षात असे नवीन काय दिसणार
तिच माणसे,तिच बायको,तेच काम असणार !
जुनीच खाट मात्र झोपनार नवीन वर्षाच्या खाटेवर !
जात आहे मी नवीन वर्षाच्या वाटेवर ! !

वाढत्या महागाईने होई दरवर्षी मी वाकडा
नवीन ना बदले काही बदले फक्त शेवटचा आकडा !
या वर्षीही काही नाही होणार,सांगतो ऐक माकडा
कारण! आहे माझ्याकडे 2014 चा दाखला !
नको बसू पून्हा नवीन वर्षाच्या आशेवर !
तरीही जात आहे मी नवीन वर्षाच्या वाटेवर ! !

मनापासून प्रार्थना माझी
व्हावी 2015 ला पूर्ण तुमची ईच्छा !
नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वा
मनापासून हार्दिक शुभेच्छा ! !

संजय बनसोडे