नाही साहेब तुमचा मला राग नाही
तुमच्यावर डरकायला मी काही वाघ नाही ! !
बारा महीने कष्ट करून मी जे पिकवीतो शेत
त्याच्यातल कोरभरही माझ्या हाती नाही येत !
सरकार दया मया करून जे अनुदान देत
ते तर सार तुमच्या खिशातच जात !
माजलेला वळू तुम्ही आमच थोड ऐकणार
विचारल कुणी तुम्हा, आमच्या नावानेच बोंबलणार!
तरीही तुमच्या चरित्र्यास थोडाही डाग नाही
तुमच्यावर डरकायला मी काही वाघ नाही ! !
लाखों करोडोचे अनुदान डोक्यात काही बसत नाही
खात्यात येते तेंव्हा काय कराव सुचत नाही !
त्या पेक्षा जास्त ते येण्यासाठीच खर्च केलेले असतात
ते काढण्यासाठी जेवढे खर्च केले, तेवढेही ते नसतात !
बोलू तर कुणाला बोलू आम्हाला कुणाची साथ नाही
तुमच्यावर डरकायला मी काही वाघ नाही ! !
संजय बनसोडे

No comments:
Post a Comment