कुणालाही कसं कळेल
प्रेमातलं जगणं
ग्रीष्मातही पावसांत
चिंब ओलं भिजणं
ती जवळ नसतांना
तिला घेऊन फिरणं
प्रत्येक क्षण प्रेमासाठी
झुरत झुरत मरणं
जगास कळू नये म्हणून
तिला पापण्यात ठेवणं
ती समोर असतांनाही
भलतीकडेच बघणं
तिच्या एका कटाक्षानं
घायाळ होऊन जाणं
आठवणींच्या डोहांत बुडून
रात्र रात्र जागणं
फक्त प्रेमाचा विचार
जगास साऱ्या विसरणं
प्रेम समोर येताच
अस्तित्व हरवून जाणं
प्रेमाच्या विश्वात राहून
बेधुंद जगत रहाणं
रात्रंदिन तोच ध्यास
प्रेमाचं होऊन जाणं
स्वर्ग सुखात प्रेमाच्या
मनापासून हरपून जाणं
तिच्या थोड्याश्या वेदनेनही
आपलं मन विव्हळून जाणं
प्रेम भावना तेव्हाच कळते
जेव्हा स्वतः ती अनुभवणं
कुणालाही कसं कळेल
प्रेमातलं सुंदर जगणं
संजय एम निकुंभ , वसई
प्रेमातलं जगणं
ग्रीष्मातही पावसांत
चिंब ओलं भिजणं
ती जवळ नसतांना
तिला घेऊन फिरणं
प्रत्येक क्षण प्रेमासाठी
झुरत झुरत मरणं
जगास कळू नये म्हणून
तिला पापण्यात ठेवणं
ती समोर असतांनाही
भलतीकडेच बघणं
तिच्या एका कटाक्षानं
घायाळ होऊन जाणं
आठवणींच्या डोहांत बुडून
रात्र रात्र जागणं
फक्त प्रेमाचा विचार
जगास साऱ्या विसरणं
प्रेम समोर येताच
अस्तित्व हरवून जाणं
प्रेमाच्या विश्वात राहून
बेधुंद जगत रहाणं
रात्रंदिन तोच ध्यास
प्रेमाचं होऊन जाणं
स्वर्ग सुखात प्रेमाच्या
मनापासून हरपून जाणं
तिच्या थोड्याश्या वेदनेनही
आपलं मन विव्हळून जाणं
प्रेम भावना तेव्हाच कळते
जेव्हा स्वतः ती अनुभवणं
कुणालाही कसं कळेल
प्रेमातलं सुंदर जगणं
संजय एम निकुंभ , वसई
3 comments:
coolest marathi prem kavita are on this site..cool...
Excellent
Khup chan ahe tumachi kavita
Post a Comment