Wednesday, July 30, 2014

अभागी पाऊस हा... | Marathi Kavita On Rain Paus | Marathi Prem Kavita on Rain | Marathi Facbook Posts

अभागी पाऊस हा..

त्या भयान काळोख्या रात्री,
खुप पाऊस पडला होता,
तू सोडून जाण्याच्या भितीने,
माझा कंठ दाटला होता.....

माझ्या मनातले दुःख तुला,
जाणवू दिले नाही मी,
डोळ्यातून अश्रूंचा,
सागर बरसला होता.....

बेभान सरीत नहालो मी,
चेहरा माझा उदासला होता,
ओठावर खोटं हसू ठेवून,
मनाचा किनारा ओलावला होता.....

जाता जाता का नाही ?
थांबवले मी तुला,
ह्रदयाने धडकताना मजला,
प्रश्न विचारला होता.....

शब्दही अडकले होते ओठात,
मुखाने अबोला धरला होता,
असा कसा अभागी पाऊस हा,
तुझ सवे मजसाठी रडला होता.....


स्वलिखित -
दिनांक १५/०७/२०१४...
सांयकाळी ०६:३३...
©सुरेश सोनावणे.....

No comments: