Sunday, July 20, 2014

ढग दाटलेले | Marathi Lekh | Marathi Short Sad Kavita | Small Marathi Prem Kavita

काय राहिले
तूझ्या मनात?
नाही दिसले
मला काही
गहिवरल्या
त्या डोळ्यात !
आले आभाळ,
भरून गेले !
भिजून चिंब
धरणीने व्हावे
नेत्रात तरळून
स्वप्न गेले !
नाते भावनेचे
मनी जोडलेले !
बंध स्नेह
हळुवार इतके
वितळून पुन्हा
ढग दाटलेले !

© शिवाजी सांगळे

No comments: