पावासालाही वाटल असेल मस्त
तुला भिजवताना
तू भिजत असता
तुला लपून छपून पाहताना
पावसालाही वाटल असेल मस्त
तुझ्यावर बरसताना
खुप खुप बरसून
तुला चिम्ब करताना
पावसालाही वाटल असेल मस्त
तुझ्यावरून ओघळताना
ओघळता ओघळता हळूच
तुला स्पर्श करताना
पवसालाही वाटल असेल मस्त
तुला कुडकुडत ठेवताना
हळूच तुला सरिंच्या कवेत घेताना
पवसालाही वाटल असेल मस्त
तुला ओली चिम्ब पहाताना
कधी तुझ्या गालावरून
कधी ओठान्वरुन विरघळताना
पवसालाही वाटल असेल मस्त
तुला शाहरत पहाताना
तुझ्या ओठांवरचे हसू
डोळ्यांत खोल साठवताना
पवसालाही वाटल असेल मस्त
तुझा हात हातात घेताना
कधी हळूच नकळत
तुला मिठीत घेताना
पावसालाही वाटल असेल मस्त
तुझ्यात चिम्ब भिजताना
तुझ्यात स्वताला हरवताना
आणि मलाही वाटतेय खुप मस्त
हे सर्व लिहिताना
आणि लिहिता लिहिता
तुला अनुभवताना....
तुला अनुभवताना....
-तुझाच अंकुश
02/07/2014
6.00pm
No comments:
Post a Comment