Sunday, July 20, 2014

प्रेमाची पाठशाळा | Marathi Kavita On School Life | Marathi Romantic School Life Poems | School Life Romantic Poems | Shalaa

कुठल्याच पाठशाळेत
प्रेम शिकवता येत नाही
शिकल्यावरच प्रेम कळतं
असही काही असत नाही

निरक्षर वा साक्षर
असा भेद असत नाही
प्रेम म्हणजे भावनांचा खेळ
तो शिकवता येत नाही

यालाच प्रेम म्हणतात
असं काही शास्त्र नाही
प्रेमात पडल्यावरही कां प्रेम करतो
सांगता येत नाही

कधी फक्त एका नजरेत
प्रेम कळून जातं
कधी कुणाच्या सहवासात
प्रेम भेटून जातं

प्रेम आयुष्यात आल्यावर
जगणं मात्र बदलून जातं
सारं काही तेच असूनही
वेगळ्या विश्वात घेऊन जातं

सर्वस्व ओवाळून टाकावं
इतकं कुणी आवडून जातं
दोन आत्म्यांच मिलन
प्रेम भेटता होऊन जातं

ज्याला भेटतो प्रेमाचा अनुभव
त्यालाच प्रेम कळून जातं
बाकीच्यांच्या लेखी प्रेम म्हणजे
वेड्यांच जग होऊन जातं

संजय एम निकुंभ , वसई 

No comments: