Wednesday, July 30, 2014

विरह | Marathi Sad Virah Kavita | Marathi Sad Lonely Poems in Marathi Font | Marathi Kavita in Marathi Font

असेच सोडूनी गेली चांदणी
नभातल्या त्या चंद्राला
सगळे झाले सूने सूने
चंद्र एकटा राहीला
बघत राहीला एकटाच
वाहून जात्या चांदणीला
स्वभाव आपला शांत शितल
काही करू न शकला
रडू लागला आकाश सारा
दोष चेहर्यास देऊ लागला
आपले न काही या जगती
अस्तित्व संपऊ लागला

अभागी पाऊस हा... | Marathi Kavita On Rain Paus | Marathi Prem Kavita on Rain | Marathi Facbook Posts

अभागी पाऊस हा..

त्या भयान काळोख्या रात्री,
खुप पाऊस पडला होता,
तू सोडून जाण्याच्या भितीने,
माझा कंठ दाटला होता.....

माझ्या मनातले दुःख तुला,
जाणवू दिले नाही मी,
डोळ्यातून अश्रूंचा,
सागर बरसला होता.....

बेभान सरीत नहालो मी,
चेहरा माझा उदासला होता,
ओठावर खोटं हसू ठेवून,
मनाचा किनारा ओलावला होता.....

जाता जाता का नाही ?
थांबवले मी तुला,
ह्रदयाने धडकताना मजला,
प्रश्न विचारला होता.....

शब्दही अडकले होते ओठात,
मुखाने अबोला धरला होता,
असा कसा अभागी पाऊस हा,
तुझ सवे मजसाठी रडला होता.....


स्वलिखित -
दिनांक १५/०७/२०१४...
सांयकाळी ०६:३३...
©सुरेश सोनावणे.....

प्रेमातलं जगणं | Marathi Prem Kavita on Life | Marathi Kavita in Marathi Font | Share On Whatsapp Facebok Hike

कुणालाही कसं कळेल
प्रेमातलं जगणं
ग्रीष्मातही पावसांत
चिंब ओलं भिजणं

ती जवळ नसतांना
तिला घेऊन फिरणं
प्रत्येक क्षण प्रेमासाठी
झुरत झुरत मरणं

जगास कळू नये म्हणून
तिला पापण्यात ठेवणं
ती समोर असतांनाही
भलतीकडेच बघणं

तिच्या एका कटाक्षानं
घायाळ होऊन जाणं
आठवणींच्या डोहांत बुडून
रात्र रात्र जागणं

फक्त प्रेमाचा विचार
जगास साऱ्या विसरणं
प्रेम समोर येताच
अस्तित्व हरवून जाणं

प्रेमाच्या विश्वात राहून
बेधुंद जगत रहाणं
रात्रंदिन तोच ध्यास
प्रेमाचं होऊन जाणं

स्वर्ग सुखात प्रेमाच्या
मनापासून हरपून जाणं
तिच्या थोड्याश्या वेदनेनही
आपलं मन विव्हळून जाणं

प्रेम भावना तेव्हाच कळते
जेव्हा स्वतः ती अनुभवणं
कुणालाही कसं कळेल
प्रेमातलं सुंदर जगणं

संजय एम निकुंभ , वसई 

Tuesday, July 22, 2014

खूप प्रेम करतो तुझ्यावर | Marathi Prem Kavita in Marathi Font | Marathi Poems in Marathi Font | Marathi Poems For Share

खूप प्रेम करतो तुझ्यावर,
सत्य हे जाणून बघ,
एकदा तरी मला तू,
आपले मानून बघ. वाट्टेल ते करेन तुझ्यासाठी, तू फक्त
सांगून
बघ,
आयुष्भर साथ देईन तुझी,
एकदा आपले करून बघ.
तुझ्यासाठीच जगत आहे,
तुझ्यावरच मरत आहे,
असला जरी नकार तुझा, तरी तुझ्या होकाराची वाट
बघत
आहे. वाटलेच कधी तुला तर,
बघ प्रेम माझे तपासून,
पण मी खरंच खूप प्रेम करतो,
तुझ्यावर अगदी मनापासून.....!!
घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन
जरा जगून बघ माझ्यासाठी, माझे प्रेम हे नेहमी असेच
राहीन,
मनापासून..... फक्त तुझ्यासाठी....!!!!

तुझ्या पासुन दुर राहुन मी जास्त दिवस जगणार नाही | Marathi Sad Prem Kavita | Small Sad Marathi Poems

तु सुखी होणार असशील
तर मरण ही माझा नकार नाही.

पण तरी ही मनात
कुठे तरी वाटतयं,

तुला कधी तरी माझी
आठवण नक्की येईल,

मला एकदा बघण्यासाठी
तुझं मन अतुर होईल…

पण तेंव्हा,

तुला सावरायला,

मी तुला दिसणार नाही,

कारण तुझ्या पासुन दुर
राहुन मी जास्त दिवस
जगणार नाही...

ते प्रेम असत | Marathi Kavita Share On Whatsapp | Small Prem Kavita on Whatsapp

जेव्हा एक मुलगी
मुलाची काळजी घेते..

तेव्हा मुलाला वाटत
ते प्रेम आहे..

पण..?

ती मैत्री असते..

परंतु..?

जेव्हा मुलगा मुलीची काळजी
घेतो तेव्हा मुलीला वाटते..

ती मैत्री आहे

पण

ते प्रेम असत..

खास मुलीच्या मनातलं...| Marathi Poems For Girls | Marathi Kavita Girlfriend | Marathi Kavita For Whatsapp

खास मुलीच्या मनातलं...!!

तुझीच ओढ लागली वेड्या मनाला,

यदा कदाचित असे कसे घडले...

प्रेम म्हणजे काय माहीत नसताना,

नकळत तुझ्या प्रेमात मी पडले...

कधी तुझ्यासवे खुप हसले,

तू सोबत नसताना एकांतात रडले...

कधी तुझ्या आठवणीत हरवले,

कधी गोड क्षणात गुरफटले...

कधी तू धडपडताना मला सावरले,

कधी मी जाणून बूजून अडखळले...

कळलेच नाही रे कधी मला,

तुझे माझे कसे प्रेम जुळले...

Sunday, July 20, 2014

तुझे नाव | Marathi Romantic Kavita | Romantic Prem Kavita in Marathi | Love You Marathi Kavita | Fall in Love Kavita in Marathi

दिनरात मनात मी
प्रिया तुलाच पाहते
येता जाता नाव तुझे
मीच मला ऐकवते

लपवूनी मेंदीमध्ये
आद्याक्षर रेखाटते
नक्षीदार बेलबुट्टी
सभोवती सजवते

पानावर कधी तर
कधी ओल्या वाळूवर
तुझे नाव सदोदित
जपते या ओठावर

संगणकी परवली
तूच असतो लपुनी
अन कवितेत माझ्या
सदैव नावावाचुनी

रे सुखानी मज या
आज असे भारावले
तुझे नाव रोमरोमी
मी तूच रे तूच झाले

विक्रांत प्रभाकर 

तो गेला तरी पण | Marathi Virah Prem Kavita | Lost Love Marathi Poems | Motivational Marathi Kavita | Be Strong Marathi Poems

एक हात सुटला
म्हणून काय झालं
एक डाव मोडला
म्हणून काय झालं
तू प्रेम केलं होतं
प्रेमाचच भाग्य होतं
कुणीतरी तोडून गेलं
त्याचं नशीब खोटं होतं
कुणावरी प्रेम जडतं
वेड स्वप्न जागं होतं
तन मन मोहरून
कोसळणारं आकाश होतं
कुठेतरी काहीतरी पण
नकळे काय चुकत
वाऱ्यावर बांधलेलं
स्वप्न विरून जातं
तो गेला तरी पण
प्रेम मागंच उरतं
कारण काही झाल तरी
ते प्रेम आपलच असतं
आपलं प्रेम आपणच
सांभाळायचं असतं
तुटलं फुटलं वाटलं तरी
सदैव अभंग असतं
प्रत्येक प्रेमाला लायक
कुणी तरी असतो
कधी लवकर कळतो
कधी उशिरा कळतो
जे हृदय प्रेम शोधतं
त्याला ते नक्की मिळत
तुझं प्रेम फक्त तू
कोंडून ठेवू नकोस
येईल कुणी तुझ्यासाठी
विश्वास हरवू नको

विक्रांत प्रभाकर 

प्रेमाची पाठशाळा | Marathi Kavita On School Life | Marathi Romantic School Life Poems | School Life Romantic Poems | Shalaa

कुठल्याच पाठशाळेत
प्रेम शिकवता येत नाही
शिकल्यावरच प्रेम कळतं
असही काही असत नाही

निरक्षर वा साक्षर
असा भेद असत नाही
प्रेम म्हणजे भावनांचा खेळ
तो शिकवता येत नाही

यालाच प्रेम म्हणतात
असं काही शास्त्र नाही
प्रेमात पडल्यावरही कां प्रेम करतो
सांगता येत नाही

कधी फक्त एका नजरेत
प्रेम कळून जातं
कधी कुणाच्या सहवासात
प्रेम भेटून जातं

प्रेम आयुष्यात आल्यावर
जगणं मात्र बदलून जातं
सारं काही तेच असूनही
वेगळ्या विश्वात घेऊन जातं

सर्वस्व ओवाळून टाकावं
इतकं कुणी आवडून जातं
दोन आत्म्यांच मिलन
प्रेम भेटता होऊन जातं

ज्याला भेटतो प्रेमाचा अनुभव
त्यालाच प्रेम कळून जातं
बाकीच्यांच्या लेखी प्रेम म्हणजे
वेड्यांच जग होऊन जातं

संजय एम निकुंभ , वसई 

नको नको रे पावसा | Paus Marathi Kavita | Marathi Poems On Rain | Marathi Poems

नको नको रे पावसा
पुन्हा बोलावूस मला
देही तळमळे माझ्या
तुझा डंख ओला ओला

ऐन यौवनाच्या देही
तुझं पिसात वागणं
धसमुसळ्या हट्टी
नको नकोसं करणं

दाही दिशातून येत
मज करशी पाचोळा
लाख ओठांनी जहरी
जीव बेजार कोवळा

वस्त्र राहते नावाला
असा देहात भिनतो
माझ्या मनातील नाव
दूर देशांतरा नेतो

मज खेचते तुझीच
धुंद गारुडी नजर
नको नको म्हणुनी मी
धाव घेते छतावर

विक्रांत प्रभाकर 

पावसालाही वाटल असेल मस्त | Marathi Kavita On Rain | Marathi Kavita On Paus | Marathi Happy Poems

पावासालाही वाटल असेल मस्त
तुला भिजवताना
तू भिजत असता
तुला लपून छपून पाहताना
पावसालाही वाटल असेल मस्त
तुझ्यावर बरसताना
खुप खुप बरसून 
तुला चिम्ब करताना
पावसालाही वाटल असेल मस्त
तुझ्यावरून ओघळताना
ओघळता ओघळता हळूच
तुला स्पर्श करताना
पवसालाही वाटल असेल मस्त
तुला कुडकुडत ठेवताना
हळूच तुला सरिंच्या कवेत घेताना
पवसालाही वाटल असेल मस्त
तुला ओली चिम्ब पहाताना
कधी तुझ्या गालावरून 
कधी ओठान्वरुन विरघळताना
पवसालाही वाटल असेल मस्त
तुला शाहरत पहाताना
तुझ्या ओठांवरचे हसू
डोळ्यांत खोल साठवताना
पवसालाही वाटल असेल मस्त
तुझा हात हातात घेताना
कधी हळूच नकळत
तुला मिठीत घेताना
पावसालाही वाटल असेल मस्त
तुझ्यात चिम्ब भिजताना
तुझ्यात स्वताला हरवताना
आणि मलाही वाटतेय खुप मस्त
हे सर्व लिहिताना
आणि लिहिता लिहिता 
तुला अनुभवताना....
तुला अनुभवताना....
-तुझाच अंकुश 
02/07/2014
6.00pm

ढग दाटलेले | Marathi Lekh | Marathi Short Sad Kavita | Small Marathi Prem Kavita

काय राहिले
तूझ्या मनात?
नाही दिसले
मला काही
गहिवरल्या
त्या डोळ्यात !
आले आभाळ,
भरून गेले !
भिजून चिंब
धरणीने व्हावे
नेत्रात तरळून
स्वप्न गेले !
नाते भावनेचे
मनी जोडलेले !
बंध स्नेह
हळुवार इतके
वितळून पुन्हा
ढग दाटलेले !

© शिवाजी सांगळे

Saturday, July 12, 2014

जे मनापासुन केले तरी भेटत नाही | Marathi Poems Facebook Page | Prem Kavita On FB | One Side Marathi Love Poems

जे मनापासुन केले तरी भेटत नाही,
कदाचित ते खरे प्रेम
असते.....
मनात असुन पण जे व्यक्त करता येतनाही,
कदाचित ते खरे प्रेम
असते.....
लांब जाऊन पण जे नेहमी आठवत ते ,
बोलताना पण नकळत जे डोळ्यातुन
आश्रु आणत .....
कदाचित ते खरे प्रेम
असते.....
आपल्या सोबत भांडताना,
पण ?????
आपल्यावर हक्क सांगते,
भांडण झाल्यावर आपल्याला प्रमाणे
मिठीत घेते .....
कदाचित ते खरे प्रेम असते.....
जे मनातुन रडुन पण
आपल्याला हसवते,
डोळे बंद केले तरी,
मनात दिसते .....
कदाचित ते खरे प्रेम
असते.....
जे मनापासुन हव असताना कधीचं
मिळत नाही,
आणि ज्याना मिळत त्याना ते
टिकवता येत नाही .....
कदाचित ते खरे प्रेम
असते.....!!

Monday, July 7, 2014

प्रेमाला मी भीत आहे | Marathi Prem Virah Kavita | Marathi Sad Prem Kavita | Missing Love Poems

कलंकित देह माझा
कलंकित मन आहे
पदी तुझ्या वाहू कसं
मलीन जीवन आहे

फसलेल्या जन्मातील
एक रानभूल आहे
लुटलेल्या बागेतील
फेकलेलं फुल आहे

नाव तुझे घेवू कसं
उरामध्ये खंत आहे
अपमान वंचनेत
अजुनी जळत आहे

तुझे हात आश्वासक
मज धीर देत आहे
डोळ्यातून कृपा प्रेम
बरसात होत आहे

वदलास कधी कुठ
प्रेम देहातीत आहे
मागील ते तुझं सारं
भूतकाळ फक्त आहे

येशील तू कधी तरी
सदैव स्वागत आहे
नात्या पलीकडचं हे
तुझं माझं नात आहे

सुखावते ऐकुनी मी
माझं कुणी इथं आहे
जळलेलं मन पुन्हा
उमलून येत आहे

तुझी प्रीत तुझं गीत
सुख पालवीत आहे
अजूनही माझ्या पण
प्रेमाला मी भीत आहे

विक्रांत प्रभाकर 

आठवणीने तुझ्या.. | Marathi Athavan Kavita | Missing You Marathi Kavita | Marathi Kavita On Athavan Missing You

आठवणीत तुझ्या नाही आवरता
आले अश्रूंना माझ्या ,

एक आला हुंदका अन झापडं मिटली तरी
नाही सावरता आल्या आठवणी तुझ्या ,

अजून किती वाट पहावी तुझी हे विचारता मनाला
तेही गहिवरले आठवणीने तुझ्या ,

काळजाने एक साद घातली तुला अन त्याचाही
आवाज अनावर झाला आठवणीने तुझ्या ,

ऐकू येईल कधीतरी तुला आवाज या भावनांचा अन मग
तूही यडूले भान हरपशील आठवणीने माझ्या ,

विश्वास आहे मला की तूही कधीच विसरणार नाहीस मला पण
थांबव आता वेडं झालय हे मन टपोरी आठवणींनी तुझ्या .    

मयुर जाधव ,
कुडाळ ( सातारा )

मरणाशिवाय ना कोणी सोबती माझे... | Marathi Sad Emotional Poems | Lonely Marathi Poems | New Latest Marathi Poems

तू सोडलस अन्,
तुटले नाते दोन जिवांचे,
तू नाकारलेस संपले तेव्हाच,
श्वास माझ्या आयुष्याचे.....

खुप सतावलेस तू मजला,
वचनेही विसरलीस न दुरवण्याचे,
उरलेत फक्त धडकणारे,
ठोके तुटलेल्या ह्रदयाचे.....

बंदिस्त झाले ते मनात,
आभास तुझ्या सुंदर रुपाचे,
सांग कसे गं विसरु मी तुला,
तू दाखलेले जग खोट्या स्वप्नांचे.....

अर्थाचा अनर्थ केलास तू,
भूललीस क्षण सुखाचे,
मर्यादेची सिमा ओलांडलीस,
साधलेस ना डाव मतलबीपणाचे.....

अखेर माझ्या नश्वर देहानेही,
मध्येच माझी साथ सोडली,
ना दिसली माझी आंसवे तुजला,
ना जाणले कधी तू माझ्या मनाचे.....

सांग कुणाला आपले म्हणू मी,
कुणाला ऐकवू ग-हाणे दुःखाचे,
शेवटी कोणीच राहीले नाही ईथे,
मरणाशिवाय ना कोणी सोबती माझे.....

स्वलिखित -
दिनांक १६/०६/२०१४...
सांयकाळी ०६:११...
©सुरेश सोनावणे.....

मागणे न माझे | Marathi Emotional Kavita | Sad Marathi Short Poems

मागणे न माझे
तुज देणे घेणे
मरे एक मुंगी
इथे आणखी ही

भीतीची सावली
उन्हात जळावी
अशी इथली ही
रीत मुळी नाही

दु:ख दाटलेले
मनी खोचलेले
कधी कुणी दिले
ही तक्रार नाही

सुखांची उधारी
नवसांच्या दारी
कृती मज ऐसी
जमणार नाही

तुझे बरे चालो
इथे नि तिथे ही
असू देत मला  
माझे जगणे ही

विक्रांत प्रभाकर