एक तारीख आली
पगार माझी झाली
बायका पोरांची पुन्हां
मने प्रसन्न झाली !
ठुमके लावत बायको
मच्छी मार्केटला गेली
क्षणात माझी बायको
इंग्लिश कूक झाली !
आना पप्पा आणा
खेळणी आम्हां आणा
चॉकलेटसाठी पुन्हां
दहा रुपए द्याना !
खेळणी साठी मुलं
मॉलमधे गेली
खेळणी घेता घेता
बायकोनेही शॉपिंग केली !
शेजारीन पेक्षा भारी
घेतली तिनं साडी
पोरासाठी भारी
घेतली रिमोटची गाडी !
हारवाला, दूधवाला
राशनवाला पण आला
क्षणात त्यांनी माझा
खिसा खाली केला !
बारा तेरा दिवस घरी
फ्राय फ्राय खाल्ले
नंतर बायकोला जाग आली
आता तेलाचेही वांदे झाले !
रूबाबदार माणूस पुन्हां
झाला आता बेजार
मित्रांना विनवत होता
देना थोडे उधार !
अर्ध्या महिन्या नंतर
संपत नाही कॅलेंडर
घरापासून ऑफीसचे
काटतो पाई पाई अंतर !
ईच्छा शक्ति सारी
मी संसारात जुंपली
बायको,पोरं पोचता पोचता
ईच्छा माझी संपली !
संजय बनसोडे
पगार माझी झाली
बायका पोरांची पुन्हां
मने प्रसन्न झाली !
ठुमके लावत बायको
मच्छी मार्केटला गेली
क्षणात माझी बायको
इंग्लिश कूक झाली !
आना पप्पा आणा
खेळणी आम्हां आणा
चॉकलेटसाठी पुन्हां
दहा रुपए द्याना !
खेळणी साठी मुलं
मॉलमधे गेली
खेळणी घेता घेता
बायकोनेही शॉपिंग केली !
शेजारीन पेक्षा भारी
घेतली तिनं साडी
पोरासाठी भारी
घेतली रिमोटची गाडी !
हारवाला, दूधवाला
राशनवाला पण आला
क्षणात त्यांनी माझा
खिसा खाली केला !
बारा तेरा दिवस घरी
फ्राय फ्राय खाल्ले
नंतर बायकोला जाग आली
आता तेलाचेही वांदे झाले !
रूबाबदार माणूस पुन्हां
झाला आता बेजार
मित्रांना विनवत होता
देना थोडे उधार !
अर्ध्या महिन्या नंतर
संपत नाही कॅलेंडर
घरापासून ऑफीसचे
काटतो पाई पाई अंतर !
ईच्छा शक्ति सारी
मी संसारात जुंपली
बायको,पोरं पोचता पोचता
ईच्छा माझी संपली !
संजय बनसोडे
No comments:
Post a Comment