Saturday, July 18, 2015

पाऊस | Marathi Kavita On Rain | Paus Marathi Kavita | Rainy Poems in Marathi

आज तीची आठवण आली
बरसनार्या सरींना पाहून
बरसली होती अशीच एकदा
मला घट्ट मिठीत घेऊन

त्या आठवांचा पाऊस
आज माझ्यावरती बरसत आहे
चिंब भिजवलं सरींनी तरीही
मन माञ सुनं आहे

वाटलं  उठावं
आणि तिला भेटावं
मिठी तिला घट्ट मारुन
सार्या जगाला विसरून जावं

कडाडणारी विज ऐकून
भानावर मी आलो
ती आता या जगात नाही
हकीकत मी विसरलो

बरसनार्या पावसाने
आता विसावा घेतला होता
सुन्या मनात माञ माझ्या तो
आता बरसू लागला होता...

-महेश रा. केसरकर

No comments: