छंद तुला आठवण्याचा, असा जडला रे मनाला...!
तुझ्या आठवणींशी लपंडाव घडतो प्रत्येक क्षणाला...!
का रे मन हे बावरे,
असे होई वेडे पिसे,
हाती माझ्या असूनी नसे,
तुझ्या भासांचे कवडसे,
सांग समजावू तरी कसे, माझ्या रे मनाला...!

अपराध हा मनाचा,
नाही दोष नयनांचा,
का रे वाहे मग असा,
हा झरा आसवांचा,
बघ मेघ तो बरसण्या, पुन्हा कुठूनसा रे आला...!

माझ्या सुन्या या मैफिलीत,
गीत झंकारले तुझे,
शब्द तूच जाहलास,
सूर होते रे फक्त माझे,
आज पुन्हा रे प्रेमाचा, मनी नाद ऐकू आला...!

वाटे जागवावी रात,
तुझ्या आठवांसवेत,
नीज यावी न तुलाही,
आज माझ्या आठवणीत,
का रे चंद्र तो आकाशी, आज उगा नादावला..!

वेड्या या मनाचे,
उमजेना वागणे रे,
वेड तुझे रे फक्त त्याला,
भय ऊरे न जगाचे,
मन मनाशी असे जुळले, ऋतु प्रेमाचा बहरला...!

हा छंद आठवणींचा,
जडावा तुझ्याही मनाला,
क्षण तुझाही फुलावा,
कधी मला आठवताना,
व्हावे येणे एकदाच, बघ रे जीव आसावला...!

अर्चना...!

No comments:
Post a Comment