Saturday, July 18, 2015

आठवण आली की काय करायचे? | Miss You Marathi Kavita | Love Sad Poems in Marathi

नाते तुझे हळुवार जपायचे,
आठवण आली की अलगद उमलायचे,
नको करूस अट्टाहास,
सांग कधी भेटायचे,
दरवेळी मात्र मीच वीचारायचे,
तु फक्त हो म्हणायचे,
सांग आठवण आली की काय करायचे?
मन मात्र तुझ्याभोवती घुटमळायाचे,
या वेडयामनाला कोण समजावयाचे?
सांग आठवण आली की काय करायचे?
तुझ्या जवळ बसले असता मनं कधी गप्पा मारायचे.
मनातले हे बोल सांग कधी कळायचे?
सांग आठवण आली की काय करायचे?
नाही भेटले की डोळे अलगद ओले करायचे,
सैर वैर झालेल्या मनाला गप्प मात्र मीच करायचे,
येऊन घेशील मिठीत असे मीच म्हणायचे,
सांग आठवण आली की काय करायचे?
फोन मात्र मीच करायचं,
How.....R... U मात्र तू बोलायचे,
तु दिसलास की डोळे भरून पहायचे,
ऊघडले डोळे की ते मात्र स्वप्नच ठरायचे,
सांग आठवण आली की काय करायचे?

सोम मडिवाल
पुणे अप्पर

तू नाही म्हणाली त्याला | Marathi Kavita Read Online Free | Marathi Poems in Marathi Language Marathi Font

वीस वर्ष झाली
तू नाही म्हणाली त्याला
पण कालच घडल्यागत
तो प्रसंग
उंचावरून दरीत पडल्याचा
तो अनुभव
शब्द सुचत नव्हते तेव्हा
भावना झाल्या होत्या दग्ध
आणि तो स्पोर्टली घेतल्याचा
माझा सपशेल नाटकी अभिनय

आता मला तुझी स्वप्न पडत नाही
(झोपही नीट लागत नाही
वाटत वय झालय)
तुझे सुख दिसते दुरून
अन माझेही बरे चाललेय
पण हा दिवस
अन ही तारीख
हटकून आठवण आणते
साऱ्या जगाचे वाढदिवस
विसरणारा मी
आत स्मृतीची घंटी वाजते

जर तरचा हिशोब
आता मनात उमटत नाही
डोळ्यात पाणी मन हळवे
काही काही होत नाही
पण या तारखेचे अन
या आठवणीचे काय करायचे
मला खरच कळत नाही

विक्रांत प्रभाकर 

सांग ना रे सख्या येशील ना परत | Prem Virah Kavita | Sad Love Poems | Lonely Alone Marathi Kavita

आज पुन्हा त्याला पहिले, पुन्हा एकदा मनाला खूप छान वाटले....
   जुन्या स्वप्नांना एक नवी पालवी फुटली,
आपली नसलेली स्वप्ने परत एकदा आपली वाटली.....
   त्याच्या डोळ्यात तोच निरागसपणा जाणवला,
माझा नाही तो पण जणू माझाच भासला......
    कधीतरी एकत्र बोलायचो, गप्पा मारायचो,
पण आता मात्र एकांताचा चटका मनाला लागला.....
   काय होते? आपले वेगळे होण्याचे कारण, अजूनही मी जाणले नाही त्याचे उत्तर....
त्याला विचारून हि पहिले, पण तो नेहमीसारखा मुग्ध आणि शांत राहतो,
  या सगळ्या आठवणींचा वणवा मला मात्र जाळतो......
अजूनही मी त्याच वळणावर उभी आहे, सांगेल तो कारण वेगळे होण्याचे,
  ह्याच एका आशेत जगत आहे.....
तो दूर होऊन सारी स्वप्ने मिटवून गेला,
    पण त्याच स्वप्नांना मी माझ्या हृदयात आसरा दिला....
सोडून गेला तो मला, तरीही मी त्याची वाट पाहत आहे,
  कधीतरी मागे वळून बघ, मी अजून तिथेच उभी आहे....
आस आहे या वेड्या मनाला येशील तू परत,
   सांग ना रे सख्या येशील ना परत, तो पर्यंत आहे मी तील तील मरत....!!!!
@ कविता @ 

प्रिये तु माझ्या आयुष्यात आलीस | Prem Love Poems in Marathi | Read Marathi Prem KAvita online

प्रिये तु माझ्या आयुष्यात
आलीस प्रत्येक क्षणाला
महत्व आलय ...

स्वासा गणिक साठवलेली
आठवण आणि अपुरूपाचे
सारे क्षण तुझ्या  पुढ्यात
घातले …

त्याच मोल शब्दात मांडण्या
सारख नाहीं …
एवढ मात्र नक्की तुझ्याविना
मी अपुर्ण आहे ...

तुझी जन्मो जन्मीची साथ हवी
एवढच  मांगण आहे ...
तुला वजा केल्यावर बाकी काही
उरत नाहीं ...
तुझ्या शिवाय आयुष्य मि
आयुष्यच  धरत नाही ...

तु गेल्यावर वाटत खुपस सांगाच
होत तु खुपस दिल तरी
आणखी मांगायच
होत…

मुक मुक राहुण  तुझ पाहत
राहण जस गोठलेल्या
नदीच बरफा खालुन
वाहण …

तु माझी असण किती छान
आहे नाहीतर  हे जग
म्हणजे नुसत
माणसांच रान आहे …

तुझ्यावर  रागावण हा एक
आठवण्याचा बहाणा
आहे ...
तु आलीस की तो जातो
तसा माझा राग शहाणा आहे …

तुझी आठवण नित्ये  नवा
अनुभव आहे .
कधी उसळणार वादळ…
पाकळी वरच दव आहे …

तु सोबत असलीस की माझाही
मला आधार लागत नाहीं
तु फक्त राहा मी आणखी
काही मांगत नाही …

तुझ हे नेहमीचच झालय
आल्या  आल्या निघण
आणि तु निघतांना
मी थांबवतो का
ते बघण …

कुणीतरी हव असत आपल्याला
वेडू म्हणणार ....
वेडू म्हणताना आपल्यातलं
शहाणपण जाणणार....! े

स्वलिखित - Prem Mandale

असं काही सांगता येत नाही | Prem Virah Kavita | Love Poems in Marathi | Marathi Sad Kavita Online

प्रेमाला मिळेल प्रेमानेच उत्तर
असं काही सांगता येत नाही
तुमच्या विरहाला समजेल हरएक
असं काही सांगता येत नाही

तुमच्या भावना ओळखेल प्रत्येक
असं काही सांगता येत नाही
मनाची संवेदना जाणेलच कुणी
असं काही सांगता येत नाही

दुःखाचा दाह अनुभवेल कुणी
असं काही सांगता येत नाही
तुमच्या श्वासात जगेल प्रत्येक
असं काही सांगता येत नाही

तुम्ही आणि तुमचे विश्व एक
तुमच्यासाठी जरी अलौकिक
या विश्वात रमेलच कुणी
असं काही सांगता येत नाही
--- राजेश खाकरे

छंद तुझ्या आठवणींचा | Athavani Marathi Kavita | Prem Kavita in Marathi

छंद तुला आठवण्याचा, असा जडला रे मनाला...!
तुझ्या आठवणींशी लपंडाव घडतो प्रत्येक क्षणाला...!
               का रे मन हे बावरे,
               असे होई वेडे पिसे,
               हाती माझ्या असूनी नसे,
               तुझ्या भासांचे कवडसे,
सांग समजावू तरी कसे, माझ्या रे मनाला...!
तुझ्या आठवणींशी लपंडाव घडतो प्रत्येक क्षणाला...!
               अपराध हा मनाचा,
               नाही दोष नयनांचा,
               का रे वाहे मग असा,
               हा झरा आसवांचा,
बघ मेघ तो बरसण्या, पुन्हा कुठूनसा रे आला...!
तुझ्या आठवणींशी लपंडाव घडतो प्रत्येक क्षणाला...!
               माझ्या सुन्या या मैफिलीत,
               गीत झंकारले तुझे,
               शब्द तूच जाहलास,
               सूर होते रे फक्त माझे,
आज पुन्हा रे प्रेमाचा, मनी नाद ऐकू आला...!
तुझ्या आठवणींशी लपंडाव घडतो प्रत्येक क्षणाला...!
                वाटे जागवावी रात,
                तुझ्या आठवांसवेत,
                नीज यावी न तुलाही,
                आज माझ्या आठवणीत,
का रे चंद्र तो आकाशी, आज उगा नादावला..!
तुझ्या आठवणींशी लपंडाव घडतो प्रत्येक क्षणाला...!
                वेड्या या मनाचे,
                उमजेना वागणे रे,
                वेड तुझे रे फक्त त्याला,
                भय ऊरे न जगाचे,
मन मनाशी असे जुळले, ऋतु प्रेमाचा बहरला...!
तुझ्या आठवणींशी लपंडाव घडतो प्रत्येक क्षणाला...!
                 हा छंद आठवणींचा,
                 जडावा तुझ्याही मनाला,
                 क्षण तुझाही फुलावा,
                 कधी मला आठवताना,
व्हावे येणे एकदाच, बघ रे जीव आसावला...!
तुझ्या आठवणींशी लपंडाव घडतो प्रत्येक क्षणाला...!


अर्चना...!

हळू हळू श्वास माझे मिटत आहे | Virah Prem Kavita | Sad Love Poems in Marathi

कळत नाही आज का,
मन माझे भरून येत आहे,
सारे सोबत असूनही का,
एकटेपणाची जाणीव होत आहे.....

खर्च मी इतका वाईट आहे का,
जे माझे आपलेच मला दु:ख देत आहे,
आपलेपणाचा खोत आव आणून,
विरहाच्या दरीत ढकलत आहे.....

असा काय गुन्हा झाला माझा,
कि पावलोपावली दुखच वाटेला येत आहे,
खर्च मी इतका कठोर आहे का,
कि सगळेच दगडासारखे ओरबाडत आहे.....

कुणा कुणा कडून ठेऊ मी अपेक्षा,
कि अपेक्षा पूर्ण न होताच भंग पावत आहे.....
कुणावर ठेऊ मी विश्वास कुणाला म्हणू मी आपले,
सगळेच वेळे नुसार बदलत आहे.....

कसा जगू मी या निष्ठुर जगात,
कि न केलेल्या पापाचीच शिक्षा मला मिळत आहे,
अजून किती सोसू हृदयावर घाव मी,
कि एक जखम मिटताच नवीन जखम मिळत आहे......

अजून किती रे परीक्षा घेशील रे देव माझी,
कि सारीच स्वप्ने माझी अधुरी राहत आहे,
थोडी तरी कर रे कदर माझी,
हळू हळू श्वास माझे मिटत आहे......

हळू हळू श्वास माझे मिटत आहे......


स्वलिखित -
दिनांक १४-८-२०१३...
रात्री ११,३४...
© सुरेश सोनावणे.....            

पाऊस | Marathi Kavita On Rain | Paus Marathi Kavita | Rainy Poems in Marathi

आज तीची आठवण आली
बरसनार्या सरींना पाहून
बरसली होती अशीच एकदा
मला घट्ट मिठीत घेऊन

त्या आठवांचा पाऊस
आज माझ्यावरती बरसत आहे
चिंब भिजवलं सरींनी तरीही
मन माञ सुनं आहे

वाटलं  उठावं
आणि तिला भेटावं
मिठी तिला घट्ट मारुन
सार्या जगाला विसरून जावं

कडाडणारी विज ऐकून
भानावर मी आलो
ती आता या जगात नाही
हकीकत मी विसरलो

बरसनार्या पावसाने
आता विसावा घेतला होता
सुन्या मनात माञ माझ्या तो
आता बरसू लागला होता...

-महेश रा. केसरकर

आठवणीत तुझ्या | Virah Sad Kavita in Marathi | Miss You Kavita | Lost in You | Marathi Kavita

तु नसते तेथे मी असाच फिरुन येतो
आठवणीत तुझ्या असाच झुरुन येतो

तु असायची तेथे वाट पाहत बसलेली
उशीर झाला मला तर थोडीसी रागावलेली
त्या जागेवरुन एकदा नजर फिरवून येतो
आठवणीत तुझ्या असाच झुरुन येतो

तु नसल्याच्या जाणीवेणे डोळे ओले होतात
तुझ्या सहवासाचे क्षण न क्षण आठवतात
तुझे शब्द मग मी मनी आठवत राहतो
आठवणीत तुझ्या असाच झुरुन येतो

चांदणे टपोर पडलेले लक्ष त्याकडे नसते
माझे आभाळ तुझ्याविन रिते मला भासते
तुझ्या स्पर्शाचा वारा अंगा झोंबून जातो
आठवणीत तुझ्या असाच झुरुन येतो
---राजेश खाकरे

पगार अन् मी | Marathi Poems on busy Life | Marathi Poems in Marathi Font

एक तारीख आली
पगार माझी झाली
बायका पोरांची पुन्हां
मने प्रसन्न झाली !

ठुमके लावत बायको
मच्छी मार्केटला गेली
क्षणात माझी बायको
इंग्लिश कूक झाली !


आना पप्पा आणा
खेळणी आम्हां आणा
चॉकलेटसाठी पुन्हां
दहा रुपए द्याना !

खेळणी साठी मुलं
मॉलमधे गेली
खेळणी घेता घेता
बायकोनेही शॉपिंग केली !

शेजारीन पेक्षा भारी
घेतली तिनं साडी
पोरासाठी भारी
घेतली रिमोटची गाडी !

हारवाला, दूधवाला
राशनवाला पण आला
क्षणात त्यांनी माझा
खिसा खाली केला !

बारा तेरा दिवस घरी
फ्राय फ्राय खाल्ले
नंतर बायकोला जाग आली
आता तेलाचेही वांदे झाले !

रूबाबदार माणूस पुन्हां
झाला आता बेजार
मित्रांना विनवत होता
देना थोडे उधार !

अर्ध्या महिन्या नंतर
संपत नाही कॅलेंडर
घरापासून ऑफीसचे
काटतो पाई पाई अंतर !

ईच्छा शक्ति सारी
मी संसारात जुंपली
बायको,पोरं पोचता पोचता
ईच्छा माझी संपली !


संजय बनसोडे 

Wednesday, July 8, 2015

फक्त त्याच्याच आठवणींत | Prem Kavita in Marathi | Miss You Very Much Heart Touching Marathi Poems in Marathi Font

आज परत एकदा त्याला पहावस वाटतय,

त्या प्रेमाच्या आठवणीना, परत जगवावस वाटतय,

त्याचा हात परत माझ्या हातात घेऊन,थोडा चालावस वाटतय,

अन परत एकदा त्याला बघावस वाटतय...

आज मला खूप खूप रडावस वाटतय,
स्वतःशी परत खूप भांडावस वाटतय,
भरलेल्या डोळ्याने, आरश्या समोरबसावास वाटतय,
अन आपलं कोणीच नाही,
म्हणून,
आरश्या समोर बसून,
स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतय...

आज मला परत भूतकाळात जावस वाटतय....
परत एकदा,
त्याच्याच आठवणींत जगावस वाटतय......

फक्त त्याच्याच आठवणींत जगावस वाटतय........

Tu sodun gelis...Kalat nakalat mala ayushyabharasathi ekta karun gelis

Tu sodun gelis...Kalat nakalat mala ayushyabharasathi ekta karun gelis.... Tuch mala mhanaychis 'tu mla sodun tr nh na janar...?' ani tuch sodun gelis...
Kalat nakalat mla ayushyabharasathi ekta karun gelis.... Fakt n fakt tuzech shabd kanawr astat.... Mhnaychis....Kaskay re mla evdha jiv lavtos, evdha prem kartos, evdha samjun ghetos tu...??
Me shantpane fakt tuzya dolyat pahaycho n tula apoaap uttar milayche....
pn ata te dolech jawal nahit....Khup ekta padloy g me.... tuzyashivay jawalcha koni nahi....
Dolyatle ashru pusayla ithe konalach vel nahi....
Me apla ektach pawasat chalat asto... Tyamagcha karan ekach,dolyatle ashru konala disnar nahi... Aajubajula khup mansa astat.... Pn me matra ektach...
Halli dhad n jevnat laksh ast n ajun kashat... Kahich kahich nakosa vatat...
Tula maz prem kadhi umaglach nahi...
ata shappath, me konawr prem karnar nahi....Karan tu mla sodun gelis...
Kalat nakalat mla ayushyabharasathi khup khup ekta karun gelis...