Thursday, December 4, 2014

अपयश | SAd Virah Kavita Bog | Kavita on Life | Read Sad Poems Online Free

दुनियेचे ओझे ओढत होतो जेव्हा
रडायचं तर होतं, पण हसतच गेलो.

ईतिहास झडवायची जिद्द होती जेव्हा
भविष्याच्या भीतीने घाबरतच गेलो.

पंखात भरारी घेण्याचे धाडस होते जेव्हा
पिंजर्यात जे अडकलो, अडकतच गेलो.

हरलेली स्वप्ने मज कुरतडायची जेव्हा
त्यांना पुरवण्यास खड्डे खणतच गेलो.

मरण्याआधी तेरवीची वाट बघणारे होते जेव्हा
जगत असा आलो, की मरतच गेलो.

- अनामिका