Sunday, December 21, 2014

मला सारखं वाटत कि तू जवळ असावंस | Love Poem for Girlfriend From the Heart in Marathi | Heart Touching Prem Kavita Marathi

मला सारखं वाटत कि तू जवळ असावंस
या ना त्या बहाण्याने मला बोलत बसावंस...

उगीच काहीतरी निमित्त करून रुसावंस
मलाही राग आल्यावर वेड्यासारखं हसावंस
चुकलं माझ काही तर "मुर्खा कळतं का तुला" म्हणावंस
मी बरोबर होतो कळताच जीभ दातात अन् "चुकले" म्हणावंस...

इतर जोडप्यांना बघून तुही मला चिकटावंस
कमरेभोवती हात आवळून डोक खांद्यावर ठेवावंस
केस तुझे मी कुरवाळताना तु मुग्ध व्हावंस
बंद डोळ्यांनी एकेक श्वास मोजत शांत व्हावंस...

जाणार नाहिस ना सोडून मला पुन:पुन्हा विचारावंस
मी नाही म्हटल्यावरही तू माझ्या डोळ्यात पहावंस
मला सारखं वाटत कि तू जवळ असावंस
सोडताना हे नश्वर जग तू उशाला असावंस...

सुमित