Thursday, December 4, 2014

सोडून जातांना एकदा तू मागे वळायचं होतं | Marathi Virah Kavita | Break up Kavita in Marathi Font | Sad Kavita Blog

सोडून जातांना एकदा तू मागे
वळायचं होतं.....
तुझं माझं नातं थोडं जपायचं
होतं.....

पाठ फिरवली मी, तु हाक
मारायचं होतं....
लपवलेल्या अश्रुंना माझ्या थोडं
न्याहाळायचं होतं.....

काय हरवलं आहे आपल्यात ?
एकदा विचारायचं होतं....
अबोला धरला मी, तु कारण
ताडायचं होतं. ...

हसतांना मला बघुन ,
तु जरा गोंधळायचं होतं
एक हुंदका मी जपला,
तु ओळखायचं होतं....

स्वार्था पुरतीचं प्रेम माझं,
हे ही खरंच होतं....
पण स्वार्थातल्या या प्रेमात एक
"प्रेम" तेवढंच मुद्याचं होतं....

मार्ग आपले वेगळे, हे तर
शेवटी होणारच होतं...
स्वीकारायचं कसं.... हेच फक्त
कळत नव्हतं...

काळीज मी आणि ठोका तु एवढच
मला म्हणायचं होतं....
तुझं माझं नशीब, त्याने असच
का लीहायचं होतं.... ?????

No comments: