Friday, December 12, 2014

व्हाटसअपवर ब्लॉक होता | Marathi Funny Vinodi Kavita | Marathi Gamtidar Kavita | Funny Poems in Marathi Font

जेव्हा तिने मला फेसबुकवर अन्फ्रेंड केले
अचानक व्हाटसअपवर ब्लॉक करुन टाकले
साऱ्या माझ्या कवितेंचे भांडवल बुडाले
दिवाळखोर मी मला जाहीर करून टाकले

कळेना आता इथे मी गाणी लिहू कुणासाठी
एका फुलासाठी सारी दुनिया सजली होती
मित्र म्हणत होते रे तुझी प्रतिभा बहरली    
कशी काय तुला ही छान कविता सुचली

अंदरकी बात सारी अंदरच आता राहिली
बहुदा या कवितेंनीच विकेट माझी घेतली
काही म्हणा पण ही अगदीच टिपिकली
या कवीची ठरीव काव्यकहाणी संपली

बहुदा तिचे कुठेतरी लग्न ठरले असावे
घरच्यांनी मित्रांनी कान फुकले असावे
घाबरून मग तिने असेल पाठ फिरवली
बेहतर सुंदर ऑफर किंवा दुसरी आली

ज्यांनी केले पाप तो ते जरूर भरेल
कावळ्याच्या शापाने बगळा जरूर मरेल
तोवर बिचारा कावळा शब्दाविना रडेल
कुहूकुहू सारे जगता काव काव गमेल
..........
नुकतीच कपाटात वर ठेवून दिलेली
ब्रह्मसूत्रे मी पुन्हा शोधून काढली
शंकरभाष्यावरील धूळ अन झटकली
अथतोची ..टकळी पुन्हा सुरु झाली

सगळीच माया ही सगळीच छाया असे
वाचीत ओळ आता ती मी पुन्हा बसे
तिचेच चित्र पण ते पानोपानी फडफडे
हसणे रुसणे बोलणे अन कानावरी पडे


विक्रांत प्रभाकर

No comments: