Monday, December 29, 2014

कामावरून संध्याकाळी घरी आल्यावर | Marathi Heart Touching Kavita on Life | Marathi Poems on Life in Marathi Language

कामावरून संध्याकाळी घरी आल्यावर,
पाण्याचा ग्लास घेऊन बायको येते.
थांबा कपभर चहा ठेवते म्हणत,
कंबर कसून स्वयंपाक घरात जाते.

आल्या आल्या लगेच माझी दोन मुलं.
पप्पा खाऊ काय आणले म्हणत गळ्याला पडतात,
नेहमी प्रमाणे चॉकलेट घेत,
ते खेळायला निघून जातात.

कामाच्या कचाट्यातून सुटून घरी आल्यावर,
अशी माया रोज पाहतो.
दिवसभराचा सर्व थकवा,
मी क्षणातच विसरून जातो.

@ यल्लप्पा कोकणे
२७/१२/२०१४

Sunday, December 21, 2014

जरा ही करमत नाही | Miss You Poem for BoyFriend/GirlFriend | Thinking of you Marathi Poem| Short (Small) Miss You Poem for Her

कित्येकदा भेटलो तरी,
भेटीची ओढ,
काही कमी होत नाही.....

तुला भेटल्या शिवाय,
मला क्षण भर ही,
राहवत नाही.....

मनात आस आहे,
एका भेटीची,
दूरावा सहन होत नाही.....

ये ना गं लवकर सखे,
तुझ्याविना मला,
जरा ही करमत नाही.....

जरा ही करमत नाही.....
.♥.  :' (  .♥.  :' (  .♥.

स्वलिखित -
दिनांक १२/१२/२०१४...
सांयकाळी ०६:०८...
©सुरेश अं सोनावणे.....

का बदलतात | Sad Poems On Life | Marathi Virah Kavita on Life | Virah Dukhi Kavita

लहान असताना खूप ऐकले
होते कि माणसं बदलतात ,
तेव्हा ते काही कळायचे
नाही,
पण आत्ता मात्र त्या
शब्दांचा अर्थ कळू लागलाय ,
नाती किती चिरकालीन असतात
हे अत्ता समजुन चुकलय,
आयुष्यात हे असंच घडत असतं,
हे ह्या नात्यांमधूनच शिकायला भेटलयं,
कधी कुणी तरी परकं
आपल्या मनात त्याचं
घर करून जातं ,
तर कधी कुणी आपल्या
खूप जवळचं आपल्याला
गरजेनूसार परकं करुन जातं
.
.
.
.
.
.
.
.
मग मनात एकच प्रश्न
येतो कि का येतात आयुष्यात
ही अशी माणसं ???
-अनामिक

मला सारखं वाटत कि तू जवळ असावंस | Love Poem for Girlfriend From the Heart in Marathi | Heart Touching Prem Kavita Marathi

मला सारखं वाटत कि तू जवळ असावंस
या ना त्या बहाण्याने मला बोलत बसावंस...

उगीच काहीतरी निमित्त करून रुसावंस
मलाही राग आल्यावर वेड्यासारखं हसावंस
चुकलं माझ काही तर "मुर्खा कळतं का तुला" म्हणावंस
मी बरोबर होतो कळताच जीभ दातात अन् "चुकले" म्हणावंस...

इतर जोडप्यांना बघून तुही मला चिकटावंस
कमरेभोवती हात आवळून डोक खांद्यावर ठेवावंस
केस तुझे मी कुरवाळताना तु मुग्ध व्हावंस
बंद डोळ्यांनी एकेक श्वास मोजत शांत व्हावंस...

जाणार नाहिस ना सोडून मला पुन:पुन्हा विचारावंस
मी नाही म्हटल्यावरही तू माझ्या डोळ्यात पहावंस
मला सारखं वाटत कि तू जवळ असावंस
सोडताना हे नश्वर जग तू उशाला असावंस...

सुमित

का तुझी ओढ इतकी राणी कळत नाही | Love You Poems for her in Marathi | Short Prem Kavita | Marathi Prem Love Poem Kavita Real Love

का तुझी ओढ इतकी राणी कळत नाही
का तुझ्या आठवणीनेही मन भरत नाही ...

तुझा मंजुळ आवाज हृदयापलीकडे जातो
तरी ऐकण्याची तृष्णा मात्र भागत नाही ...

प्रत्येक श्वासागणिक तू जवळ येत आहेस
तरी मन माझ विचारण्यास धजत नाही ...

मनचक्षूंनी तुला नखशिखांत पाहिलंय
तरी डोळ्यांनी बघण्याची इच्छा जात नाही ...

नेईन म्हणतो तुला क्षितीजापलीकडे
पण अंतर आपल्या दोघातलं सरत नाही ...

सुमित

नाही प्रेम केलेस तरी चालेल | Marathi PRem Kaivta For Boyfriend | Prem Kavita in Marathi Language | Love Poems in Marathi Font Language

नाही प्रेम केलेस तरी चालेल
पण तिरस्कार मात्र करू नकोस……….
          नाही आठवण काढलीस तरी चालेल
          पण विसरून मात्र जाऊ नकोस…………
नाही बघितलं तरी चालेल
पण बघून न बघितल्यासारख करू नकोस...........
           सोडून दिलीस साथ तरी चालेल
           पण  एकटा मात्र राहू नकोस...............
सहन करीन मी सार
पण सहनशीलतेचा अंत करू नकोस..........
          निराश केले तरी चालेल
          पण खोट्या आशा दाखवू नकोस.............
फक्त एवढं बघ
भलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाही
तरी तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही...
                                                   -राधा

खेळ प्रेमाचा | Sad Poems on Love | Viraha Kavita in Marathi Language | Dukhi Kavita in Marathi

झालाय खेळ प्रेमाचा
मांडलाय त्याचा बाजार
ख-या प्रेमाच्या नावाखाली
होते वासनेची शिकार

मन होते घायाळ
पाहुन असले प्रकार
पश्चातापाच्या आगीत रोज
जळुन करती पुकार

कसे काय चुकले
झेलुन काळजावर वार
उठतो मनात आता
एकच प्रश्न वारंवार...!
कवी-गणेश साळुंखे...!

Saturday, December 13, 2014

एका मारवाडी मुलाला | Marathi Funny Kavita Blog | Gamtidar Poems in Marathi Font | Vinodi Kavita

एका मारवाडी मुलाला
त्याची gf - खूप भूक लागलीये रे, काही तरी खायला घाल ना..
.
मुलगा (खूप विचार करून)- ठीक आहे..कुठे जायचं?
.
मुलगी- barbecue nations चालेल..

मुलगा -बर.मग त्याचा अर्थ सांग..

मुलगी-नको मग McDonalds ला जाऊ..

मुलगा- ओके..त्याचं स्पेलिंग सांग..

मुलगी- KFC चालेल?

मुलगा- हो...त्याचा आधी full -form सांग..

मुलगी-नकोच मग...सरळ दुर्गा मिसळ खाऊ..

मुलगा-ये हुई ना बात..! मग पटकन तुझी गाडी काढ आणि कॅश पण घे कारण तिथे माझा क्रेडीट कार्ड चालत नाही ना....!!

तुझ्या मैत्रीवर कितीही लिहिलं | Marathi Friendship Poems | Marathi Maitri Kavita Blog | Poems on Friendship in Marathi

तुझ्या मैत्रीवर कितीही लिहिलं.....
तरी उणं वाटतं
सारं आहे माझ्याकडे आज
तरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतं

तुझ्या मैत्रीचे क्षण
पुन्हा हवेहवेसे वाटू लागतात
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटू लागतात

तुझ्या मैत्रीची गर्द सावली
अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती.

Friday, December 12, 2014

व्हाटसअपवर ब्लॉक होता | Marathi Funny Vinodi Kavita | Marathi Gamtidar Kavita | Funny Poems in Marathi Font

जेव्हा तिने मला फेसबुकवर अन्फ्रेंड केले
अचानक व्हाटसअपवर ब्लॉक करुन टाकले
साऱ्या माझ्या कवितेंचे भांडवल बुडाले
दिवाळखोर मी मला जाहीर करून टाकले

कळेना आता इथे मी गाणी लिहू कुणासाठी
एका फुलासाठी सारी दुनिया सजली होती
मित्र म्हणत होते रे तुझी प्रतिभा बहरली    
कशी काय तुला ही छान कविता सुचली

अंदरकी बात सारी अंदरच आता राहिली
बहुदा या कवितेंनीच विकेट माझी घेतली
काही म्हणा पण ही अगदीच टिपिकली
या कवीची ठरीव काव्यकहाणी संपली

बहुदा तिचे कुठेतरी लग्न ठरले असावे
घरच्यांनी मित्रांनी कान फुकले असावे
घाबरून मग तिने असेल पाठ फिरवली
बेहतर सुंदर ऑफर किंवा दुसरी आली

ज्यांनी केले पाप तो ते जरूर भरेल
कावळ्याच्या शापाने बगळा जरूर मरेल
तोवर बिचारा कावळा शब्दाविना रडेल
कुहूकुहू सारे जगता काव काव गमेल
..........
नुकतीच कपाटात वर ठेवून दिलेली
ब्रह्मसूत्रे मी पुन्हा शोधून काढली
शंकरभाष्यावरील धूळ अन झटकली
अथतोची ..टकळी पुन्हा सुरु झाली

सगळीच माया ही सगळीच छाया असे
वाचीत ओळ आता ती मी पुन्हा बसे
तिचेच चित्र पण ते पानोपानी फडफडे
हसणे रुसणे बोलणे अन कानावरी पडे


विक्रांत प्रभाकर

Thursday, December 4, 2014

सोडून जातांना एकदा तू मागे वळायचं होतं | Marathi Virah Kavita | Break up Kavita in Marathi Font | Sad Kavita Blog

सोडून जातांना एकदा तू मागे
वळायचं होतं.....
तुझं माझं नातं थोडं जपायचं
होतं.....

पाठ फिरवली मी, तु हाक
मारायचं होतं....
लपवलेल्या अश्रुंना माझ्या थोडं
न्याहाळायचं होतं.....

काय हरवलं आहे आपल्यात ?
एकदा विचारायचं होतं....
अबोला धरला मी, तु कारण
ताडायचं होतं. ...

हसतांना मला बघुन ,
तु जरा गोंधळायचं होतं
एक हुंदका मी जपला,
तु ओळखायचं होतं....

स्वार्था पुरतीचं प्रेम माझं,
हे ही खरंच होतं....
पण स्वार्थातल्या या प्रेमात एक
"प्रेम" तेवढंच मुद्याचं होतं....

मार्ग आपले वेगळे, हे तर
शेवटी होणारच होतं...
स्वीकारायचं कसं.... हेच फक्त
कळत नव्हतं...

काळीज मी आणि ठोका तु एवढच
मला म्हणायचं होतं....
तुझं माझं नशीब, त्याने असच
का लीहायचं होतं.... ?????

अपयश | SAd Virah Kavita Bog | Kavita on Life | Read Sad Poems Online Free

दुनियेचे ओझे ओढत होतो जेव्हा
रडायचं तर होतं, पण हसतच गेलो.

ईतिहास झडवायची जिद्द होती जेव्हा
भविष्याच्या भीतीने घाबरतच गेलो.

पंखात भरारी घेण्याचे धाडस होते जेव्हा
पिंजर्यात जे अडकलो, अडकतच गेलो.

हरलेली स्वप्ने मज कुरतडायची जेव्हा
त्यांना पुरवण्यास खड्डे खणतच गेलो.

मरण्याआधी तेरवीची वाट बघणारे होते जेव्हा
जगत असा आलो, की मरतच गेलो.

- अनामिका

कुठे तू आहेस सांग ग | Marathi Prem Kavita Blog | Read Poems in Marathi Font | Marathi Cute Kavita for Girlfriend

कुठे तू आहेस सांग ग त्याला
शोधतोय होऊन सैरा वैरा ग तो तुला

भूतकाळ त्याला विसरवेना
फक्त आठवणी तूझ्या त्याला सावरवेना

सहजरित्या गेलीस त्याला तू सोडून
प्रेमाच्या त्या साठवणीत एकट्याला पाडून

आठवतो ग रोज तुला तो रडून
आईचे ही ग त्याच्या येते ढग दाटून

आईला पाहवेना लेकराची अशी दशा
परत येशील का तू नानासाठी आशा

दुःख होता फार मारितो आईस मिठी
सांगतो की तुच देवी आहेस त्याची त्याच्यासाठी

ना करीतो तो कुठचे व्यसन
करीतो तो फक्त कवितेचे व्यसन(लेखन आणि वाचन),

जिथे कुठे असशील तू आशा
वाचून लक्षात येईल त्याचि ही परीभाषा

तु जिथे कुठे असशील
नक्कीच त्याला विसरली नसशील

नाना हे त्याचे नाव ग..............
उरलेय फक्त आशा हे एकच त्याचे गाव ग........

.......ऐश्वर्या सोनवणे...

असेन मी | Marathi Prem Kavita in Marathi Font | Read Marathi Poems Online | Marathi Blog

असेन मी...

असेन मी, नसेन मी
कुणाचे काय जाणार आहे?
कुणाचे काय राहणार आहे?

असेन मी, नसेन मी
कोण कशास येणार आहे?
उगीच कोण रडणार आहे?

असेन मी, नसेन मी
जगणे उधारीवर जगलो आहे,
चुकवून उधारी जाणार आहे!

असेन मी, नसेन मी
गोठलेल्या स्मृती सैलावणार आहे,
सोडून आठवणी जाणार आहे!

@शिवाजी सांगळे