Sunday, December 15, 2013

उत्साह | Motivational Kavita | प्रेरणादायी कविता | Marathi Kavita - मराठी कविता |

उत्साह वयात नसतो , असतो तो मनात
मनाने रहा उत्साही , येईल सारे हातात !
..
इंद्रधनुची कमान, रंग त्यात सात
उधळुनिया रंग , करू सर्वांवर मात
..
रंग भंगले कां ? उत्साह संपतात !
हात सुटला कां ? घेतला जो हातात
..
रंगात रंगताना, तुझी असो साथ
मार्ग क्रमणे आहे, घेउन हाती हात
..
मार्गी कोण आले, गुंतले की कोणात ?
खुलली न असता, कलिका सुकतात ?
..
मार्गात थांबणे नाही, होई जरी रात
माघार नाही जराही, जरी होय आकांत
..
माहीत नाही सारे, उगा झुंजतात
या मिळून सारे, करूयात रुजुवात
..
घेऊ शपथ, ना बाहेर काही आंत
निर्धास्त होऊद्या आजची सांजवात
..
आजच्या दिवशी करूया एक बात
प्रेम देऊ, प्रेम घेऊ करू बरसात
..
सुरेश पेठे
१४फेब्रु०९

No comments: