Monday, December 2, 2013

प्रेम आयुष्यात आल्यावर :: Marathi Kavita - मराठी कविता Prem Kavita | प्रेम कविता

====================
जशी कणीक चांगली मळल्यावर
चपाती फुगून वर येते
पाटावरच्या वाटलेल्या मसाल्याची
चव भारीच वेगळी असते

तसचं प्रेमही आयुष्यात आल्यावर
ते एकजीव व्हावे लागते
अपेक्षा अन स्वार्थ दूर सारून
प्रेमाचे होऊन जगावे लागते

तेव्हाच एक घट्ट नाते
मनात तयार होत जाते
दोन जीव एक झाले की
प्रेम फुलत बहरत जाते

मग कितीही येवोत वादळे
त्यास हसत हसत सामोरे जाते
जरी आला कधी दुरावा
मन धुंदीतच जगत रहाते

पण असे प्रेम करणे
खूपच कठीण असते
पण एकदा असे प्रेम झाल्यावर
जगणे सुंदर होत असते .
=======================
संजय एम निकुंभ , वसई
दि. ३० .  १ १ . १३  वेळ : ६ . ४५  स.   

No comments: