Sunday, December 15, 2013

जीवघेणा छंद मैत्रीचा | Friendship Kavita | मैत्री कविता | Marathi Kavita - मराठी कविता

कुणी म्हटलं आहे "जीवघेणा छंद मैत्रीचा"
बाळगावा आज कुणी आनंद मैत्रीचा?

सुखाचे सारे सोबती
दुखा:त साथ देईल, तोच मित्र
पण इतकं कळलं नाही,
दुख:ही देईल तोच मित्र
मानही कधी आवळेल हा फंद मैत्रीचा!!

माझे सारे तेच आहे
तुझे वेगळे जग झाले
होतो कधी जिवलग
भले आज रस्ते अलग झाले
आता मलाच नको, तुझा बंध मैत्रीचा!!

--जय

मैत्री करण्यासाठी नसावं | Friendship Kavita | मैत्री कविता | Marathi Kavita - मराठी कविता

श्री. सचिन गुजराथी यांनी मला पाठवलेली कविता
 आपल्या सर्वांसमक्ष प्रस्तुत करीत आहे..

मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर

काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी
मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते
निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ
केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द
ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो
दूर गेल्यावर कळला

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या
मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं

माझी Best Friend तिला म्हणायचो | Friendship Kavita | मैत्री कविता | Marathi Kavita - मराठी कविता

मला ती आवडायची
तिला न मी आवडायचो
माझी बेस्ट friend तिला म्हणायचो
तिच्यासाठी मी
दूनियेशी लढायचो
ती माझी बेस्ट होती
डोळयांतले तिच्या पाणीते
माझे डोळे ही भिजवायचे
मग तिला हसवून
मलाच मी सूखवायचो
तिला माझी Best Friend मी म्हणायचो
आता ती मला भेटत नाही
पण....
माझ्या मैत्रीचा गंध तसाच आहे
असे काय चूकले मला
सोडून तू गेलीस
मैत्रीची ती वेल जिला मी
जपले
ती कळी विश्वासाची
तोडून
विरह रोग देऊन तू गेलीस
विरह रोग माझ्या मैत्रीलाच
का लागावा...??
उपाय ही कदाचीत तूझ्याकडेच असावा
तूला मी आवडत नाही
मात्र मला तू आवडतेस
कधी तरी असो
पण....
मित्राला तू आठवतेस....
आहेस जेथे कूठे
तू आनंदीच रहावी
मी नाही तेथे
पण....
पाखरांनी भेट तूज द्यावी
पाखरांनी पाहून उंच उंच उडावे
नाते आपले पाखरांनी त्या
आकाशास ही सांगावे
आज मी वाट तसाच पाहतो
तू पून्हा येशील याची
आस मी धरतो
खरंच माझी Best Friend तिला म्हणायचो..............

-
©प्रशांत शिंदे

अजुन नाही शिकलो..| Motivational Kavita | प्रेरणादायी कविता | Marathi Kavita - मराठी कविता |

अजुन नाही शिकलो............

आजपर्यंतच्या प्रवासात
अनेक गोष्टी शिकलो

विचार करायला शिकलो

भर दिवसा स्वप्नं बघायला शिकलो

अनेकदा अडखळूनहि पुन्हा
स्वत:ला सावरायला शिकलो

स्वत:साठी जगता जगता
दुसऱ्यांसाठी जगायला शिकलो

शब्दांचे अर्थं समजुन घेऊन
कविता लिहायला शिकलो

छोट्या छोट्या गोष्टींमध्ये
आनंदीत व्हायला शिकलो

स्वत:ला समजुन घेता नाही आले तरी
दुसऱ्यांना ओळखायला शिकलो

एवढे शिकुनही अत्तापर्यंत
"प्रेम" करायला नाही शिकलो............

मला नव्हतं जगायचे | Motivational Kavita | प्रेरणादायी कविता | Marathi Kavita - मराठी कविता |

मला नव्हतं जगायचे


डोळ्यात अश्रूंची गंगा आटवूनी

मला नव्हतं जगायच

या  जगाला दुखवून मला नव्हतं जगायचं


मला  जगायचे होत ताट मानेने 

काही  तरी  नाव गाजवून दाखवायचे  होते

मला  नव्हतं जगायचे

जगायचे होते दुखाचे  डोंगर  उभारून 

जगाला हवी  हवीशी  वाटावी  म्हणून

मला  नव्हतं जगायचे

असं  वाटते  एकदा तरी  चमत्कार  घडावा 

माझ्या  स्वप्नाचा  पुर्ततेच पाऊल पुढे  पडाव

कुणास  ठाऊक  कसे  पुढच आयुष्य  काढायचे 

पुढे  हि असं मना विरुद्ध जगायचं

मला नव्हतं  जगायचे 

-सौ  संजीवनी  संजय  भाटकर

काहितरी वेगळ करायचय.| Motivational Kavita | प्रेरणादायी कविता | Marathi Kavita - मराठी कविता |

काहितरी वेगळ करायचय........
ढगातुन थेंबाच्या सोबत बरसायचय
पाणवठा जरी गढुळ असला तरी
पुन्हा पाणवठयात येवून नहायचय.

काहितरी वेगळ करायचय........
आसमंतात वा-यासारख झाडांना झोंबायचाय
पानांच्या जाळीवर बसुन उडायचय
मिटलेल्या श्वासांना आता
अस्तित्वातात आणायचय.

काहितरी वेगळ करायचय........
स्वप्नांच्या देशात भटकायचय
प्रयोगानिशी शोधायचय
भवनेच्या पंखात बळ घेऊन
पुन्हा मायदेशी परतायचय.

काहितरी वेगळ करायचय........
चिखलातल्या कमळाला फुलवायचय
सुकलेल्या फुलांना जगवायचय
माती रुक्ष असलि तरी
मातीतल्या माणसांसाठी जगायचय.

काहितरी वेगळ करायचय........
एक स्वप्न उराशी बाळगायचय
काहि वेगळ करता नाहि आलं तरि
माणसातल्या माणूसकीला मात्र जपायचय.

आता तरी हसून घे | Motivational Kavita | प्रेरणादायी कविता | Marathi Kavita - मराठी कविता |

आता तरी हसून घे
आजचा दिवस मिळालाय तुला
आज तरी जगून घे
कश्याला उद्याची काळजी करतेस
आता तरी हसून घे
माहीत आसते सर्वाना फुलणारे
फूल हे सुकनारेच असते
किती ही ते जपले तरी
कोमेजनारच असते
आज फूललय ते सुगंधात न्हाऊन घे
आजचा दिवस मिळालाय तुला
आज तरी जगून घे
कश्याला उद्याची काळजी करतेस
आता तरी हसून घे
काही बरोबर आणलेल नसत
काही बरोबर नेता येत नाही
इतकी दुर्दैवी नको बानूस की कोणाला
क्षणभर सुख ही देता येत नाही
देण्यात ही सुख आसते
ईतके तरी समजावून घे
कश्याला उद्याची काळजी करतेस
आता तरी हसून घे
आजचा दिवस मिळालाय तुला
आज तरी जगून घे
कश्याला उद्याची काळजी करतेस
आता तरी हसून घे
काहीच आपल्या हातात नसत
काहीच आपण करत नाही
किती ही योजना आखल्या
तरी तसे काही घडत नाही
कश्याला विचार करतेस होईल तसे करून घे
कोणावर तरी प्रेम कर
आपला त्याला मानून घे
आजचा दिवस मिळालाय तुला
आज तरी जगून घे
कश्याला उद्याची काळजी करतेस
आता तरी हसून घे
तुला काय वाट ते तूच
सारे करत आसतेस
नशिबात जे आसते तसेच
सारे घडत असते
मीळतय जे आत्ता तुला
ते तर उपभोगून घे
काळजी सोड नशिबवर स्वतावर हसून घे
शहाणपण ठेव बाजूला
मनप्रमाणे जगून घे
आजचा दिवस मिळालाय तुला
आज तरी जगून घे
कश्याला उद्याची काळजी करतेस
आता तरी हसून घे
==============================
ღ ღसुगंधღ ღ

उत्साह | Motivational Kavita | प्रेरणादायी कविता | Marathi Kavita - मराठी कविता |

उत्साह वयात नसतो , असतो तो मनात
मनाने रहा उत्साही , येईल सारे हातात !
..
इंद्रधनुची कमान, रंग त्यात सात
उधळुनिया रंग , करू सर्वांवर मात
..
रंग भंगले कां ? उत्साह संपतात !
हात सुटला कां ? घेतला जो हातात
..
रंगात रंगताना, तुझी असो साथ
मार्ग क्रमणे आहे, घेउन हाती हात
..
मार्गी कोण आले, गुंतले की कोणात ?
खुलली न असता, कलिका सुकतात ?
..
मार्गात थांबणे नाही, होई जरी रात
माघार नाही जराही, जरी होय आकांत
..
माहीत नाही सारे, उगा झुंजतात
या मिळून सारे, करूयात रुजुवात
..
घेऊ शपथ, ना बाहेर काही आंत
निर्धास्त होऊद्या आजची सांजवात
..
आजच्या दिवशी करूया एक बात
प्रेम देऊ, प्रेम घेऊ करू बरसात
..
सुरेश पेठे
१४फेब्रु०९

तुझ्या जगाचा तुच सिकंदर...| Motivational Kavita | प्रेरणादायी कविता | Marathi Kavita - मराठी कविता |

दु:खाला घे प्रित मानुन
गा एक अबोध अश्रुगान
बिनशर्त प्रेम कर
ह्या जगण्यावर अनंत
जग जिंकुन घे तु सारे
असे कर्म कर कर्मठ होऊन
बनुन दाखव स्वत:ला
तुझ्या जगाचा तुच सिकंदर...

होऊ दे आज आकाशी अशी
तुझ्या किर्तीची एक गर्जना
सुखाच्या ओल्या वाळुवरती
नाव तर सगळेच लिहतात स्वत:चे
पण दु:खाच्या काळ्या धोंड्यावरती
रुप दे तु तुझ्या मुर्तीचे
हरवु नकोस तु कधी स्वत:ला
तुझ्या जगाचा तुच सिकंदर...

मागे वळुनी कधी बघणे नाही
बघितलेच तर कुठे थांबणे नाही
एक दु:ख जिथं शंभर सुख
मग फायदा कशात तुच जाण
म्हणुन दु:खाची साथ कधी सोडणे नाही
आयुष्य हे श्रापित वरदान आहे
श्राप समजुन दे वरदान स्वत:ला
बन... तुझ्या जगाचा तुच सिकंदर...

-- सतिश चौधरी

प्रयत्न | Motivational Kavita | प्रेरणादायी कविता | Marathi Kavita - मराठी कविता |

हार झाली आहे तुझी म्हणून तू रडू नकोस
प्रयत्न करायचे मात्र तू कधी सोडू नकोस
पडून पडूनच मूल शिकत उभे रहायला
चुकुन चुकुंनच शिकायचे आसते जीवन जगायला
कोणी किती ही हिणवले तरी ध्येय तू सोडू नकोस
हार झाली आहे तुझी म्हणून तू रडू नकोस
पडायचे प्रसंग तर येणारच चालताना
किटक ठोकरी लागणार मार्ग नवा शोधताना
कोणी किती ही फसवले तरी तू काही थांबू नकोस
हार झाली आहे तुझी म्हणून तू रडू नकोस
चुकणार तर आहे स च नवीन मार्ग शोधताना
ध्यानात ठेव प्रत्येक खूण मात्र तू चुकताना
विचार कर पुन्हा पुन्हा मार्ग तू चालताना
अडकलास जरी कोठे तरी शांत तू बसू नकोस
हार झाली आहे तुझी म्हणून तू रडू नकोस
- सुगंध

कुणासाठी? कुणासाठी? | Motivational Kavita | प्रेरणादायी कविता | Marathi Kavita - मराठी कविता |

कुणासाठी? कुणासाठी?

चिमणी टिपते दाणा
भर उन्हात जाऊन
भरारी घेई आकाशात
चित्त घराशी ठेऊन
         कुणासाठी? कुणासाठी?
सांचवेळ होता
गोठ्याकडे धाव घेई जनावर
भिरभिर मन होई
गरागरा फिरे नजरकुणासाठी? कुणासाठी?
माय दिस रात राबी
बाप फिरी देशो-देशी
पोटात असून भडका
स्वत: राही उपाशी
        कुणासाठी? कुणासाठी?
नवी नवी घेवून येई
बाजारातून कापड
तरी माय बाप घाली
ठिगळ लावून कापड
        कुणासाठी? कुणासाठी?

पण ... नाही रडलो ! | Motivational Kavita | प्रेरणादायी कविता | Marathi Kavita - मराठी कविता |

श्वास चुकला, ध्यास हुकला
साथ सुटला, जीव तुटला
डगमगलो कित्येक वेळा पण ... नाही पडलो
पापण्या होत्या भिजलेल्या पण ... नाही रडलो


बंधन तुटले, हात सुटले
शब्द हुकले, अंदाज चुकले
हरायच्या होत्या कित्येक बाज्या पण ... नाही हरलो
पापण्या होत्या भिजलेल्या पण ... नाही रडलो

संधी हुकली, दिशा चुकली
आशा तुटली, नाती सुटली
जगायचे होते कित्येक क्षण पण ... नाही जगलो
पापण्या होत्या भिजलेल्या पण ... नाही रडलो

मीच सुटलो, पूर्णपणे तुटलो
रोजच चुकलो, नेहमीच हुक्लो
लिहायचं होता खूप कित्येक वेळा पण ... नाही लिहू शकलो
पापण्या होत्या भिजलेल्या पण ... नाही रडलो !!!


विजेंद्र

मी कि माझ्यातील दुसरे कुणी ? | Motivational Kavita | प्रेरणादायी कविता | Marathi Kavita - मराठी कविता |

मी कि माझ्यातील दुसरे कुणी ?

असे का होते
आपण श्वास घेतो
पण जगत असतो दुसर्यांसाठी

असे का होते
मन आपले असते
पण त्यात येणारे विचार नेहमी दुसर्याचे असतात

असे का होते
आपल्या इच्छा वेगळ्या असतात
पण दुसर्यांच्या इच्छेसाठी आपल्या इच्छा माराव्या लागतात

असे का होते
सर्व काही आपल्या जवळ असते
पण तरीही आपण दुसर्याच्या मागे धावत असतो

तेव्हा माज्या मनात विचार आला
मी `मी' आहे कि माज्यामधले दुसरे कुणी

                        कवियत्री  -  अश्विनी  दाभोळकर
                        ''निशब्द प्रेम" पेज अद्मीन इन फेसबुक

आयुष्याची मजा यावी | Motivational Kavita | प्रेरणादायी कविता | Marathi Kavita - मराठी कविता |

असे जगावे आयुष्य कि,
आयुष्याची मजा यावी .
आयुष्यातून कंटाळ्याने,
आयुष्यभराची रजा घ्यावी .

आजंच  आता जगू,
उद्याचं काय ते उद्या बघु.
चिंता जावी अशी काही विसरून,
जसे फुल नकळत गळावे देठापासुन.
हि अवस्था मनाची  इतक्या सहजा व्हावी.

मनात उल्हासाचे इंद्रधनू,
पसरत राहावे क्षणोक्षणी.
आपला उत्साह पाहून,
आनंद व्हावा फुलाच्या मनी.
चैतन्याच्या बेरजेतून उदासीनता वजा व्हावी.

.....अमोल

जीवनांतील अनेक रात्री : Motivational Kavita | प्रेरणादायी कविता | Marathi Kavita - मराठी कविता |

जीवनांतील अनेक रात्री
  जागेपणांत सरून जातात
गत आठवणींचे डोंगर
  नजरेसमोर उभे रहातात ।

सुखद आठवणी मनामध्यें
  लिमलेट परि चघळल्या जातात
त्याची एक अवीट गोडी
  दीर्घकाळ मागे ठेवून जातात ।

सुख असते जवाएवढे
  दुःख पर्वता एवढे म्हणतात
गत जीवनांचा विचार करता
  हें बोल साफ खोटे ठरतात ।

जीवनांतील सुखद आठवणी
  मनीं अतृप्ति निर्माण करतात
म्हणूनच अनेक रात्री जागून
  लोक त्यात रंगून जातात ।। रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...

शब्द येतात तेव्हां | Motivational Kavita | प्रेरणादायी कविता | Marathi Kavita - मराठी कविता |

जागे झालेत शब्द
जागवू लागले कवी
शब्द्प्रकाश घेऊन उगवू लागला
शब्दांचाच तो रवी

मग शब्दांचीच ती सुर्यकिरणे
शब्दच शब्द सारे
अंगालाही स्पर्शुनी जाते
शब्दांचे वारे

आकाशातुनी कोसळती रे
शब्दांच्याच धारा
शब्दच सर्व सांगतो मजला
निसर्ग तो हि सारा

त्या चांदणीच्या लुकलुकीतुनी
शब्दफुले सांडतात
मजसमोर शब्दांच्या ते
ओळी ओळी मांडतात

शब्दांचाच घेतला निवारा
बसलो त्याच्या छायेखाली
शब्दांचे हे घेऊनी दान
सरस्वती मज देण्या आली

शब्दांच्याच त्या जोरावर
लिहित हे माझं मनं
शब्द हेच आहेत माझे
अनमोल ते धन .................

शब्द हेच आहेत माझे
अनमोल ते धन .................

                          -दि.मा.चांदणे
                           (९९७५२०२९३३)
              (chandanedipak06@gmail.com)

Monday, December 2, 2013

केवळ नशिबाने :: Marathi Kavita - मराठी कविता Gambhir Kavita | गंभीर कविता

केवळ नशिबाने
सत्तेच्या माडीवर बसलेले
चार चाळींचे सरदार
ऐट मारू लागतात
आपल्या पदाचा
आणि
आव आणू लागतात
सर्वज्ञतेचा
तेव्हा उच्च शिक्षित
समाजातील
सर्वात बुद्धिमान वर्ग
मान घालून गर्क असतो
त्यांच्या प्रश्नांची
उत्तरे शोधण्यात
साऱ्याच ज्ञान सूर्यांना
लागते ग्रहण एकाच वेळी
अन काजवे तळपू लागतात
झुंडीझुंडीनी ...

हे मिंधेपण आले कश्याने
ग्रहण लागले कश्याने
म्हणून पाहू जाता
दिसतात ..
आपल्या एका हाताने
त्यांनी झाकलेले आपुले चेहरे
अन दुसरा हात
बांधलेला आपल्याच पोटाला..
त्यांचे बुड असते
अडकलेले
नोकरी नावाच्या हुकात
जे देत जरी असते
त्यांना मिंधेपणाच्या
दु:खाच्या वेदना
अन आश्वासनही
रिटायरमेंटपर्यंत
मिळणाऱ्या नियमित
पगाराचे
दाखवते स्वप्न
कधीहि न संपणाऱ्या
पेन्शनचे
त्या टीचभर पोटासाठी
अन वितभर सुखासाठी
ते करीत असतात
तीच ती खर्डेघाशी
स्वत: चे सूर्यपण विसरून

विक्रांत प्रभाकर

खुप प्रेम करतो गं तुझ्यावर :: Marathi Kavita - मराठी कविता Prem Kavita | प्रेम कविता

खुप प्रेम करतो गं तुझ्यावर,
जवळ तु नसली तर,
करमत नाही मला,
येई आठवण तुझी,प्रत्येक
क्षणाक्षणाला,
कसं कळेना हे
सारं,तुझ्या येड्या मनाला..
खुप प्रेम करतो गं तुझ्यावरं..,
नाही दिसलीस जर तु,जीव खुप
घाबरत..
वाट पाहत तुझ्या येण्याची, मन
इकडे तिकडे वावरत,
खुप प्रेम करतो गं तुझ्यावर....!!
पाहताना तुला नाही,
सावरलो स्वतःला,जुळले हे नयन,
मनी प्रीतिचे तार छेडलो....!!
स्वयं लिखीत:-स्वप्नील चटगे

प्रेम आयुष्यात आल्यावर :: Marathi Kavita - मराठी कविता Prem Kavita | प्रेम कविता

====================
जशी कणीक चांगली मळल्यावर
चपाती फुगून वर येते
पाटावरच्या वाटलेल्या मसाल्याची
चव भारीच वेगळी असते

तसचं प्रेमही आयुष्यात आल्यावर
ते एकजीव व्हावे लागते
अपेक्षा अन स्वार्थ दूर सारून
प्रेमाचे होऊन जगावे लागते

तेव्हाच एक घट्ट नाते
मनात तयार होत जाते
दोन जीव एक झाले की
प्रेम फुलत बहरत जाते

मग कितीही येवोत वादळे
त्यास हसत हसत सामोरे जाते
जरी आला कधी दुरावा
मन धुंदीतच जगत रहाते

पण असे प्रेम करणे
खूपच कठीण असते
पण एकदा असे प्रेम झाल्यावर
जगणे सुंदर होत असते .
=======================
संजय एम निकुंभ , वसई
दि. ३० .  १ १ . १३  वेळ : ६ . ४५  स.   

मला ही वाटायच, माझं कोणीतरी असायला हवं होतं...:: Marathi Kavita - मराठी कविता Virah Kavita | विरह कविता

मला ही वाटायच,
माझं कोणीतरी असायला हवं होतं,
माझ्यात गुंतणारं,
माझ्यात हरवणारं.....

मला ही वाटायच,
माझं कोणीतरी असायला हवं होतं,
मला आपलं मानणारं,
मला हक्काने भांडणारं.....

मला ही वाटायच,
माझं कोणीतरी असायला हवं होतं,
मला खळखळून हसवणारं,
माझ्या दुःखात सोबत रडणारं.....

मला ही वाटायच,
माझं कोणीतरी असायला हवं होतं,
माझ्या स्वप्नात येणारं,
माझी वाट पाहणारं.....

मला ही वाटायच,
माझं कोणीतरी असायला हवं होतं,
मला सुखात ठेवणारं,
मला फुलासारखं जपणारं.....

मला ही वाटायच,
माझं कोणीतरी असायला हवं होतं,
मला i love बोलून लाजवणारं,
माझे गालगुच्चे घेणारं.....

मला ही वाटायच,
माझं कोणीतरी असायला हवं होतं,
माझ्याशी बोलताना हरवणारं,
डोळ्यात पुन्हा मला शोधणारं.....

मला ही वाटायच,
माझं कोणीतरी असायला हवं होतं,
मला प्रेमाने शोना बोलणारं,
जवळ घेऊन मिठीत सामावणारं.....

मला ही वाटायच,
माझं कोणीतरी असायला हवं होतं,
माझ्या सोबत जगणारं,
मला समजुन घेणारं.....
:'(     :'(     :'(

स्वलिखित -
दिनांक ०१-१२-२०१३...
दुपारी १२,००...
© सुरेश सोनावणे.....