Wednesday, March 13, 2013

ना दुर् तू गेलीस ना दूर मी गेलो

ना दुर् तू गेलीस ना दूर मी गेलो ,
खंर तर वेडे प्रेम दूर गेलं ...

ना चूक तुझी होती ना चूक माझी होती ,
खर तर खेळी हि नियतीची होती ..

वादळ ते आल गैरसमजाच ,
उध्वस्त झाल नात सामंजस्याच ...

आठव ते दिवस ओढ ती प्रीतीची ,
हाती - हात असणाऱ्या प्रेमळ त्या स्मृती ..

कसा ग निसटला हात तो प्रीतीचा ,
आठवते मला तुझी प्रेमळ ती मिठी ..

शेवटी आपलच चुकल आसनार काहीतरी ,
नाहीतर वेळच आली नसती विरहाची ..

खर तर कारण शोधतोय या सगळ्याच
उत्तर मात्र मिळत नाही ..

कारण खर तर शुल्लक वाद-विवादांमुळे
तुटणारे नाते हे कधीच टिकत नाही .
आणि
टिकणारे नाते अशा वादांना भिक घालत नाही
| सागर बडे |

No comments: