Wednesday, March 13, 2013

Marathi Kavita : एकटा एकाकी रडतोय...

अशाच ह्या संध्याकाळी
तुला आणि तुलाच आठवतोय
आज तु नसताना
एकटा एकाकी रडतोय...
कधी एकाचा आनंद
दुसऱ्याला दुखही देतो
कधी कुणी दुखात तर
कुणी आनंदात रडतो
आज तुझ्या विरहात
ह्याचाच प्रत्यय येतो
आज तु नसताना
एकटा एकाकी रडतोय...
माणसे जवळ असतात
तर त्यांची किंमत नसते
जेव्हा ती दूर जातात
तेव्हाच महत्व कळते
आज तु दूर गेलीस
तर आता वाट पाहतोय
आज तु नसताना
एकटा एकाकी रडतोय...
एकटा एकाकी रडतोय...

... प्राजुन्कुश

1 comment:

Anonymous said...

Heart Touching Kavita...