एकटीला सोडून दूर निघून गेलास
आठवणी तुझ्या माझ्याचकडे ठेऊन गेलास
डोळे तरसतात तुला पाहण्यासाठी,
तुझ्या उबदार बाहूत येण्यासाठी
आता तर नजरही थकली तुला शोधून
वर्ष गेल.... नवीन वर्षही जाणार का रडून ?
ये पुन्हा सारं काही सोडून ,
पण
वेगळ नको करू तुझ्या मिठीतून
आजची रात्रही खूप मोठी वाटत आहे,
कदाचित,
तुझ्या आठवणीत ती सुद्धा झुरत आहे ......
No comments:
Post a Comment