Wednesday, March 13, 2013

Marathi Kavita : वागणूक ...........

वागणूक हीच माणसाच्या
मनाचा आरसा असते
तीच त्याची स्वतःची
खरी ओळख असते

कुणी कसा वागतो
यावर त्याचं मन कळत
कुणाचा स्वभाव कसा
हे वागण्यनचं कळत

माणूस म्हटला म्हणजे
तो भिन्न असणारच
हाताची बोटे जशी
तसा वेगळा असणारच

माणूस तसा कधीच
वाईट असा नसतो
पण त्याची वृत्ती कशी
याला खूप अर्थ असतो

ज्याला म्हणतो आपण वाईट
त्याला तो चांगलाच वाटतो
आपण चुकीचं वागतोय
हे तो मानतच नसतो

मुळात चुकीचं काय अन वाईट काय
हे त्याला कधीच कळत नाही
कारण मनाच्या आरशात तो
कधीच डोकावत बसत नाही

म्हणून तर चित्र - विचित्र स्वभावाचे
माणसं नजरेस पडत असतात
ते कसेही वागले तरी
आपल्याच धुंदीत जगत असतात

मला वाटतं आपल्या वागणुकीशी
समाज , धर्म जोडलेला असतो
आपल्या एका वागण्याने
तो हि बदनाम होत असतो

म्हणून आपल्यातले दोष प्रत्येकाने
मनाच्या आरशात पाहून घ्यावे
कुणाच्याही मनात घर करू शकेल
असे आपले वागणे असावे

द्वेष , मत्सर सारे विसरून
धर्मासशी बाजूस ठेवावे
माणूस धर्म पाळून सर्वांनी 
हृदयात माणसाच्या घर करावे .

     कवी : संजय एम निकुंभ , वसई

No comments: