Wednesday, March 13, 2013

रोज़.....

रोज़ तुला विसरतो , रोज़ तुला आठवतो ,
रोज़ काहीतरी ठरवतो , रोज़ काहीतरी मिटवतो ,
रोज़ स्वतःला सोपवतो ,रोज़ स्वतःला परत मागतो ,

रोज़ तुझी अपेक्षा करतो , रोज़ स्वतःची उपेक्षा करतो ,
रोज़ रात्री जागवतो , रोज़ पहाट लाम्बवतो ,
रोज़ स्वतःला थाम्बवतो , रोज़ स्वतःला सोडवतो ,
रोज़ शहानपण दाखवतो , रोज़ वेड्या सारखा वागतो ,
रोज़ बावरतो , रोज़ सावरतो ,
रोज़ तुझ्यातच हरवतो , रोज़ तुझ्यातच सापडतो ,
रोज़ स्वतःला संपवतो ,रोज़ सतःला जगवतो...

मी हे सर्व स्वप्न पाहिले.

मी दाराची बेल वाजवली
पण मी आल्याची चाहुल लागलेली तू
आधीच दारामागे लपलेली.

मग मी प्रेमाने तुला हाक मारली
कसे तरी हसने गालात दाबुन तू
दबक्या पाउलानी दारा बाहेर पडली.

मग तुझे ते उगीचच विचारने
"आज उशीर का झाला ?"
मग ,मी दहा मिनिटे आधी आलोय ,हे घड्याळ्य़ानेच दाखवने.

मग तुझे ते गालातच
हसने दार घट्ट पकडून ,
पायाच्या नखाने लाजत जमिनीला पोखरने.

मग मी केसांवरचे पानी तुझ्यावर उड़वने
मग तुझे ते गालावरचे थेम्ब
टिपत"भिजलास का?" असे रागे भरने.

नेहमी प्रमाणे मी कान पकडून सॉरी बोलणे
दारात उभे आहोत आपण ,
हे लक्षात आल्यावर,"बरा आहेस ना ?"तुझे असे बोलणे.

मग सगळे विसरून ,
तुला कडेवर उचलून ,मी तुला घरात आनणे
आणि तुही ,एखाद्या लहान बाळा प्रमाणे माज्यात स्वतहाला लपवणे.

तोच,कोणी तरी येण्याची चाहुल लागली
ह्या सर्व विचारानेच ,माझी तहान भागली
काय कळले नाही का?अहो मी हे सर्व स्वप्न पाहिले.

मी दाराबाहेराची बेल
वाजवली पण ती तिच्या घराची होती
सताड दार ठेउन ती आतल्या खोलीत गेलेली.


बाहेर आल्यावर , मला असे हरवलेला बघून ,
तिनेच विचारले "काय बरा आहेस ना?"
काय सांगणार तिला मी कोणते स्वप्न पाहिले .

वस्तुंची अदला-बदल केल्यावर
तिचे मन तिच्याकडेच ,पण माझे मन तिने हिरावून घेणे
मी जातोय हे कळल्यावर मात्र ती स्मित हास्य हसली .

त्या तिच्या हसण्या कड़े पाहून मात्र ,
मी समाधानी होउन,
परत फिरलो माझ्या घराच्या वाटेवर.....

जगावे वा मरावे

का कोणी आपल्याला इतके आवडावे,
त्याच्यासाठीच वाटावे जगावे वा मरावे?...

मला वाटते आपण नेहेमी स्वत: साठीच जगावे,
कशाला आठवणीत कुणाच्या उगीचच झुरावे?...

वाटते तसे आपल्याला कधीच जगता येत नाही,
आठवण तिची आल्यावाचुन दिवस एकही जात नाही...

हा मूर्खपणाच माझा की मी खूपच प्रेम करतो,
इच्छा नसूनही आठवनींवर रात्री सा-या जागुन काढतो...

प्रेम मनात मावेना म्हणून डोळ्यात माझ्या पाणी आलं,
तिने मात्र पटकन मला "an imotional fool" म्हटलं...

जगतो आहे मी, जगेन आयुष्य सारं,
कारण माहितीये मला माझं प्रेम आहे अगदी खरं...

फक्त तुझ्यासाठी

मला तुला भेटायच  होत
मनातल सगळ सांगायच होत
डोळे भरून तुला पहायच होत
मनसोक्त तुझ्यासमोर रडायच होत
खूप काही बोलायच होत
खूप काही ऐकायच होत
तुझ्या डोळ्यात स्वतःला पहायच होत
तुझ्या तोंडून माझ नाव ऐकायच होत
पण झाल ते ह्याहून खूप वेगळच होत
तुझ्याशिवाय मला जगाव लागल
तू रडताना मला हसाव लागल
तू थांबवताना मला जाव लागल
तुला पाहून मला लपाव लागल
जे झाल ते झेलाव लागल
ऐवढ होऊनही तुझ्यासाठी
फक्त तुझ्यासाठी
मला जगाव लागल ......

                               

Virah Marathi Kavita :: तुझ्याशिवाय...

तुझ्याशिवाय काही असेल
असे स्वप्नातही वाटले नसेल
तुझ्याशिवाय जगावे लागेल
असे कधी ठरवले नसेल
तुझ्याशिवाय मी म्हणजे
असा कुठला विचारच नसेल
तुझ्याशिवाय माझे दुसरे
अस्तित्वच नसेल
तुझ्याशिवाय माझे जीवन
जीवन नाही राहणार
तुझ्याशिवाय जगण्याला
काही अर्थ नाही उरणार...
काही अर्थ नाही उरणार..

आठवणीत ती सुद्धा झुरत आहे

एकटीला सोडून दूर निघून गेलास
आठवणी तुझ्या माझ्याचकडे ठेऊन गेलास

डोळे तरसतात तुला पाहण्यासाठी,
तुझ्या उबदार बाहूत येण्यासाठी

आता तर नजरही थकली तुला शोधून
वर्ष गेल.... नवीन वर्षही जाणार का रडून ?

ये पुन्हा सारं काही सोडून ,
पण
वेगळ नको करू तुझ्या मिठीतून

आजची रात्रही खूप मोठी वाटत आहे,
कदाचित,
तुझ्या आठवणीत ती सुद्धा झुरत आहे ......

कस सहन करणार मी

सांग , कस सहन करणार मी , तुज माझ्या जीवनातून जान
तुज ते हसन , तुज ते बोलन , मनात माझ्या काही तरी सांगून जान ....
लहाना हून तुज लहान होण, मस्ती त तुज्या ह्या बुडून जान ....
तुज ते काजळ लावण , हळूच माझ्या मनाला स्पर्श करून जान ...
तुज ते लाजन ,माझ्या जीवनात फुलांचा वर्षाव करून जान....
सांग , कस सहन करणार मी , तुज माझ्या जीवनातून जान

असा कधीच न्हवता तो

एकांतात असणारा...
लाजवट स्वभावाचा...
ध्येय जपणारा...
शांत मनाचा...
कुठे हरवला तो ?


मनावर ताबा नाही...
भावनेच्या आहेरी जातो !
विसरून गेला स्वतःच सर्व काही...
कोणाची हि सहज ओढ लाऊन घेतो !
शब्दांबरोबर किती मजेत खेळतो...
Rhyming Rhyming करत मनातलं बोलून जातो !!!
असा कधीच न्हवता तो !!!

कसा बसा जगतो मी , पाहुनि चेहरा तुझा

कसा बसा जगतो मी , पाहुनि चेहरा तुझा   
अनेक आठवण उरात आहे.. जपुनी मोरपिसा जसा   
   
वाऱ्यास बंध नाही.. जातो स्पर्शून सार्या दिशा ...   
तसा गुलाब वाऱ्यावरी.. गंध अजुनी दरवळे तुझा...   
कसा बसा जगतो मी , पाहुनि चेहरा तुझा..   
अनेक आठवण उरात आहे.. जपुनी मोरपिसा जसा ..   
   
उन्ह हे तळपते वाटेत माझ्या.. आणि काटे अनेक विषारी   
तरीही वाट काढतो मी... फुलातून भवरा जसा   
कसा बसा जगतो मी , पाहुनि चेहरा तुझा..   
अनेक आठवण ऊरात आहे.. जपुनी मोरपिसा जसा ..   
   
खिन्न वाट एकटी... मज सरता सरत नाही कधी..   
असे आयुष्य जगणे मला, प्राण वाटे नको नकोसा..   
कसा बसा जगतो मी , पाहुनि चेहरा तुझा..   
अनेक आठवण ऊरात आहे.. जपुनी मोरपिसा जसा ..   
   
असे काही झाले निखारे क्षणांचे माझ्या   
न शमले ते अश्रुंपरी, जळताना दिसे धूर जसा   
कसा बसा जगतो मी ,पाहुनि चेहरा तुझा..   
अनेक आठवण ऊरात आहे.. जपुनी मोरपिसा जसा ..

ना दुर् तू गेलीस ना दूर मी गेलो

ना दुर् तू गेलीस ना दूर मी गेलो ,
खंर तर वेडे प्रेम दूर गेलं ...

ना चूक तुझी होती ना चूक माझी होती ,
खर तर खेळी हि नियतीची होती ..

वादळ ते आल गैरसमजाच ,
उध्वस्त झाल नात सामंजस्याच ...

आठव ते दिवस ओढ ती प्रीतीची ,
हाती - हात असणाऱ्या प्रेमळ त्या स्मृती ..

कसा ग निसटला हात तो प्रीतीचा ,
आठवते मला तुझी प्रेमळ ती मिठी ..

शेवटी आपलच चुकल आसनार काहीतरी ,
नाहीतर वेळच आली नसती विरहाची ..

खर तर कारण शोधतोय या सगळ्याच
उत्तर मात्र मिळत नाही ..

कारण खर तर शुल्लक वाद-विवादांमुळे
तुटणारे नाते हे कधीच टिकत नाही .
आणि
टिकणारे नाते अशा वादांना भिक घालत नाही
| सागर बडे |

ठाऊक होत मला

ठाऊक होतं मला,

मी नसताना तू रडशील..

एकदा का होईना,

आठवण माझी काढशील..

विसरलेल्या सर्व गोष्टींना,

आठवण्याचा प्रयत्न करशील..

आठवेल जेव्हा भेटणं माझं,

तू एकदा तरी हसशील..

माझ्याबरोबर घेतलेला
निरोप,

तू शेवटचा असं म्हणशील..

तो निरोप शेवटचा नव्हताचं,

हे एकदा तरी मान्य करशील..

ठाऊक होत मला,

तू माझ्या प्रत्येक गोष्टीला
नाही म्हणशील..

नाही नाही म्हणताना,

तू एकदा तरी माझ्या प्रेमात पडशील..

ठाऊक होतं मला..

Marathi Kavita : अगदी माझ्यासारखं.......

अगदी माझ्यासारखं....... :( :(

ते बघ, ते  माळरान ,
एकट , सताड,
उदास आणि ओसाड ,
अगदी माझ्यासारखं.......

होता एके वेळी  इथे  प्रेमाचा गारवा,
चालत होता पान-फुल अन पक्ष्याचा मारवा,

होती इथे एक  अनोखी पहाट,
स्वच्छंदी मी अन तो चिवचिवाट,

पण तुझे ते शब्द झाले गोफण,
आणि सगळे निस्तब्ध,

सर्व हरवलंय, सर्व हरवलंय  ते  फक्त एका दवबिंदूसारखं ,
ते बघ, ते  माळरान ,
एकट , सताड,
उदास आणि ओसाड ,
अगदी माझ्यासारखं.......

कोरडलंय आभाळ  सारं,
भेराड्लीय धरणी,

सगळ कस निखळ आणि सुंदर होत ,
का व्हावी तुझ्याकडून करणी,

सोसतोय असहनीय  कठोरता उन्हाची ,
अन त्या घमासान  निर्दयी वाऱ्याची ,

बघ  ना ;;;;;;; बघ ना , काळ  कसा सरतो आहे,
तुझ्यासाठी चातक हा ;  कधीचा  झुरतो आहे ,

बिथरलीत  सर्व स्वप्न  ;;;;
बिथरलीत  सर्व स्वप्न एखाद्या माणिकमोत्या  सारखं,,
ते बघ, ते  माळरान ,एकट , सताड,
उदास आणि ओसाड ,अगदी माझ्यासारखं.......             
...................आनन म्हात्रे   

Marathi Kavita : त्याच जागेवर...

आजही त्याच जागेवर
 तुझी आठवण मी काढत असतो

 आजही क्षितिजावरचा मावळणारा सुर्य
 मला पाहून हसत असतो

 आता बसलो आहे शोधीत
 तुला माझ्या उरलेल्या आठवणीतच

 आजही तुझ्याच सौंदर्याची प्रतिमा
 मी माझ्या काळजावर कोरत असतो

Marathi Kavita : आठवणींचा खेळ

सरून गेली रात्र
आणि टळून गेली वेळ…
पण थांबता थांबेना
तुझ्या आठवणींचा खेळ…

Marathi Kavita : कुणासोबत करू नकोस...

आज तू नसताना
सतत तुझी आठवण येते
तुझी आठवण मला
भूतकाळात घेऊन जाते
तिथे मी होतो
तुही होतीस माझ्यासह
कुणीच नव्हते दुसरे
आपण आणि आपलेच जग
किती रमलो होतो आपण
विसरून साऱ्या जगाला
किती प्यायलो होतो
आकंठ त्या प्रेमाला
पाहता पाहता दिवस
जात आणि येत होते
काय माहित काळाच्या
पडद्यामागे काय होते
अचानक आले कुठून
वादळ एक जोराचे
वाहून गेले आपले
घरटे सुंदर प्रेमाचे
आता वास्तव हेच
फक्त उरले आहे
प्रेमाचे तर जाऊद्या
दुखही मेले आहे
आधी अश्रू होते
माझी साथ द्यायला
आता तेही नाहीत
रडून हलके करायला
तुझे कसे चाललेय
तू खुश आहेस ना??
मला अशी विसरून
तुझी तरी आहेस ना??
तू आता खुश राहा
माझा विचार करू नकोस
गेलेल्या दिवसांची
आठवण सुद्धा काढू नकोस
एकच मागणे आहे माझे
शेवटचे ते मोडू नकोस
जे माझ्यासोबत केलेस ते
कुणासोबत करू नकोस...
कुणासोबत करू नकोस...

...प्राजुन्कुश

Marathi Kavita : एकटा एकाकी रडतोय...

अशाच ह्या संध्याकाळी
तुला आणि तुलाच आठवतोय
आज तु नसताना
एकटा एकाकी रडतोय...
कधी एकाचा आनंद
दुसऱ्याला दुखही देतो
कधी कुणी दुखात तर
कुणी आनंदात रडतो
आज तुझ्या विरहात
ह्याचाच प्रत्यय येतो
आज तु नसताना
एकटा एकाकी रडतोय...
माणसे जवळ असतात
तर त्यांची किंमत नसते
जेव्हा ती दूर जातात
तेव्हाच महत्व कळते
आज तु दूर गेलीस
तर आता वाट पाहतोय
आज तु नसताना
एकटा एकाकी रडतोय...
एकटा एकाकी रडतोय...

... प्राजुन्कुश

Marathi Kavita : मनापासून बोलतोय

आयुष्यात माझ्या वाटेला खूप दुःख आली पण,
      तुझ्या वाट्याला सुख येऊ देत
                      मनापासून बोलतोय….
आयुष्यात मी तुझ्यावर एकतर्फी प्रेम केले पण,
       तू करू नकोस
                      मनापासून बोलतोय….
आयुष्यात तुझ्याशिवाय कधी कोणावर प्रेम करणार नाही पण,
       तू कर
                      मनापासून बोलतोय…. 
आयुष्यात तुझे प्रेम कधी मला मिळलेच नाही पण,
         तुला खरं प्रेम मिळावे
                       मनापासून बोलतोय….
आयुष्यात कधी कोणावर प्रेम केलेस तर त्याला खूप प्रेम दे पण,
         दुखवू नकोस
                       मनापासून बोलतोय….
आयुष्यात कधी तुझ्यासमोर जर आलोच तर ओळख दे पण,
         अनोळखी बनू नकोस
                        मनापासून बोलतोय….
आयुष्यात फक्त एकच कर की कधी कोणाला खोटी आश्वासने
         देऊ नकोस
                         मनापासून बोलतोय…. 
                                                             खरचं मनापासून बोलतोय…. 

Marathi Kavita : आठवण

नाही म्हणतानाही ते क्षण आठवतात ,
          आठवूनी ते सारे डोळे जणू बोलू लागतात,
डोळ्यातून आलेले पाणी कशाचीतरी आस लाऊन जातात ,
          परत येतील ते क्षण असे वाटुनी जातात ,
या वेड्या मनाला सांगू कसे ,
          परत येत नाही जसे डोळ्यातून वाहलेले पाणी,
तसेच कधीच परतणार नाही ते गेलेले क्षण ,
          आनंदाचे असो ,आपल्यान्सोबत घालवलेले असो ,
बनतो आठवण गेलेला प्रत्येक क्षण ,
          शिल्पात  जसे  राहतो मोती,
तसेच राहते आठवण हि मनात ,
           ठरतो जसा मोती अनमोल ,
आठवणी हि अनमोलच ठरते........................

                                                             आश्विनी  थिटे

Marathi Kavita : तुझ्या वाचून मी राहू कसा?

मना वर काबू ठेवू कसा?
तुझ्या वाचून मी राहू कसा?

जगाची बंधने जकड्ति माला
अश्या स्थितीत मी जगू कसा?

रात्र भयाण दिवस एकाकी
दुख दुराव्याचे सहन करू कसा?

तुझे डोळे पाणावलेले असताना
सांग प्रिय मी हसु तरी कसा?

तुषार खेर

Marathi Kavita : वागणूक ...........

वागणूक हीच माणसाच्या
मनाचा आरसा असते
तीच त्याची स्वतःची
खरी ओळख असते

कुणी कसा वागतो
यावर त्याचं मन कळत
कुणाचा स्वभाव कसा
हे वागण्यनचं कळत

माणूस म्हटला म्हणजे
तो भिन्न असणारच
हाताची बोटे जशी
तसा वेगळा असणारच

माणूस तसा कधीच
वाईट असा नसतो
पण त्याची वृत्ती कशी
याला खूप अर्थ असतो

ज्याला म्हणतो आपण वाईट
त्याला तो चांगलाच वाटतो
आपण चुकीचं वागतोय
हे तो मानतच नसतो

मुळात चुकीचं काय अन वाईट काय
हे त्याला कधीच कळत नाही
कारण मनाच्या आरशात तो
कधीच डोकावत बसत नाही

म्हणून तर चित्र - विचित्र स्वभावाचे
माणसं नजरेस पडत असतात
ते कसेही वागले तरी
आपल्याच धुंदीत जगत असतात

मला वाटतं आपल्या वागणुकीशी
समाज , धर्म जोडलेला असतो
आपल्या एका वागण्याने
तो हि बदनाम होत असतो

म्हणून आपल्यातले दोष प्रत्येकाने
मनाच्या आरशात पाहून घ्यावे
कुणाच्याही मनात घर करू शकेल
असे आपले वागणे असावे

द्वेष , मत्सर सारे विसरून
धर्मासशी बाजूस ठेवावे
माणूस धर्म पाळून सर्वांनी 
हृदयात माणसाच्या घर करावे .

     कवी : संजय एम निकुंभ , वसई