Saturday, February 21, 2015

खेळ दोन प्रेमांचा | Prem Kavita in Marathi Language | Marathi Prem Kavita in Marathi Font

मनातील दोघांच्या
एकच ती मुलगी
आवडे ती ज्याला-त्याला
अशी ती सुंदरी ..

म्हणाली मैत्रीण
करी प्रेम ती तुझ्यावर
बघता मित्राकडे
नाव तिचे त्याच्या हातावर ..

सांगे मी तिला पटवून
करी मित्राचे मिलन
म्हणे- नाही जगणार तुझविन
होई दोन्ही प्रेमात माझे मरणं ..

केला मी असा खेळ,मित्राचा न राहिला मेळ ..!!

खेळ असा तो प्रेमाचा
असे तो दोन मिलानाचा
अन्
असे विचार त्यात मित्राचा .


जाई कसा दिवस
सांगे मित्र मला
घडे ते  चांगले
दिवस तो मी ठरविला.

व्हायचं बोलणं माझं प्रियेशी
चांगले बोल तू मित्राशी
सांगे मी जसं बोले
ठेवी लुप्त प्रेम मनाशी ..

प्रेम तयांचे रंगले
त्या रंगात मी रंगवले
बस झाले आता
अन् मन मित्राचे तोडिले..


कळे ना तयां
केला जो मी विश्वासघात
सांगे मी खरं तयां
अन् पडे तो विचारात ..

निभावले मित्र प्रेम
टिकवले प्रियेचं प्रेम
काम हा बुद्धीचा
खेळ हा दोन प्रेमांचा..!!

No comments: