Saturday, February 7, 2015

आहेच ती अशी | Marathi Pem Kavita | Love Poems In Marathi | Marathi Kavita for Her | Kavita For GirlFirend

आहेच ती अशी...
 चेहर्यावर नेहमीच हसू,
 पण मनात खूप काही साठलेलं...
 आले जरी डोळे भरून,
 ते कोणालाही न दिसलेलं...
 आहेच ती अशी...
 सगळ्यांच्या सुख-दुखत, नेहमीच असणारी...
 स्वतःलाच विसरून,
 सगळ्यानसाठी झटणारी ..
 स्वतःच दुखः, कोणालाही न दाखवणारी,
 अन कोणीही काहीही विचारल,
 तरी नेहमीच...
 हसून उत्तर देणारी...
 आहेच ती अशी...
 फक्त त्याच्याच आठवणीत झुरणारी,
 तो आहे दूर कुठे तरी..
 फक्त त्याच्या येण्याचीच वाट पाहणारी...
 नाही तो तिझा, हे जाणून नहि....
 फक्त त्याच्याचसाठी जगणारी...
 अन दिलेल्या त्या प्रेमाच्या वाचनानं,
 आजून हि पाळणारी...
 आहेच ती अशी...
 कोणालाही न कळलेली,
 अन कोणालाहि न कळणारी...
 चंद्राची..............चांदणी जशी....
 आहेच ती अशी...
 आहेच ती अशी


फक्त तुझ्यासाठीच ........... :)

No comments: