Saturday, February 21, 2015

का कुणास ठावूक | Marathi Virah Kavita | Dukhi Sad Prem Kavita in Marathi

का कुणास ठावूक
तू माझ्याशी कमी बोलते।
मी समोर दिसलो की
मुद्दाम दूसरी कड़े वळ ते।
का कुणास ठावूक

हसुनी तुझ ते माझ्याशी बोलन
किती ग छान असायच।
असताना माझ्या सोबत
तुला तुझच भान नसायच।
भान ही आता तुझे
तुला आहे कळ ते।
का कुणास ठावूक
तू माझ्याशी कमी बोलते।

दिवसभर वाजणारा फ़ोन
तुझेच नाव दाखवायचा।
inbox ओपन करून पहिला की
तुझाच msg असायचा।
फ़ोन ही आता असून
नसल्याचे भासते
का कुणास ठावूक
तू माझ्याशी कमी बोलते।

तू जरा सोबत असली की
जग माझ्या मुठीत असायच।
नात हे जणू आपलं
बंद एका गाठित असायचं।
नात्याची ही गाठ आता
सैल झाल्याचे वाटते।
का कुणास ठावूक
तू माझ्याशी कमी बोलते।

तुझ्या आठवांचा डोंगर
इतका उंच झालाय।
आले कित्येक वादळी
पण अजुन नहीं हाल लाय।
आठव हा तुझा येता
अश्रु डोळ्या तुनी वाहते।
का कुणास ठावूक
तू माझ्याशी कमी बोलते।
          by सनी सुभाष पगारे

प्रेमामध्ये काहीपण | Prem Kavita | Only For You Marathi Poems | Love You Marathi Poems

झालं मला प्रेम एका मुलीशी
तिला भरपूर देईन मी खुशी
तिचं पण हो होतं अन् माझं पण हो होतं
म्हणूनि नाते अतूट होते ,माझे अन् तिचे.

पाहिजे तेव्हा बोलवायची
पाहिजे तेव्हा मदत पुरवायची
तिच्यासाठी सावली ऊनामध्ये
अन् छत्री पावसाळ्यामध्ये
तिच्यासाठी पडलो मी अनेक पंग्यांमध्ये
तिच्याविना रस नाही जगण्यामध्ये.

तिच्यासाठी मी झालो हमाल
'मी कोण आहे?'मलाच पडला सवाल
कामांसाठी मीच होतो
खुप केलेस माझे हाल.

तुझ्यासाठी सोडलं ते मी घराण
मित्रांशी सततची माझी भांडण
विसरुनी टाकलं मी माझं जगणं
केलं मी तुझ्यासाठी एवढं.....
फक्त अन् फक्त तुझ्यासाठी ..!

खेळ दोन प्रेमांचा | Prem Kavita in Marathi Language | Marathi Prem Kavita in Marathi Font

मनातील दोघांच्या
एकच ती मुलगी
आवडे ती ज्याला-त्याला
अशी ती सुंदरी ..

म्हणाली मैत्रीण
करी प्रेम ती तुझ्यावर
बघता मित्राकडे
नाव तिचे त्याच्या हातावर ..

सांगे मी तिला पटवून
करी मित्राचे मिलन
म्हणे- नाही जगणार तुझविन
होई दोन्ही प्रेमात माझे मरणं ..

केला मी असा खेळ,मित्राचा न राहिला मेळ ..!!

खेळ असा तो प्रेमाचा
असे तो दोन मिलानाचा
अन्
असे विचार त्यात मित्राचा .


जाई कसा दिवस
सांगे मित्र मला
घडे ते  चांगले
दिवस तो मी ठरविला.

व्हायचं बोलणं माझं प्रियेशी
चांगले बोल तू मित्राशी
सांगे मी जसं बोले
ठेवी लुप्त प्रेम मनाशी ..

प्रेम तयांचे रंगले
त्या रंगात मी रंगवले
बस झाले आता
अन् मन मित्राचे तोडिले..


कळे ना तयां
केला जो मी विश्वासघात
सांगे मी खरं तयां
अन् पडे तो विचारात ..

निभावले मित्र प्रेम
टिकवले प्रियेचं प्रेम
काम हा बुद्धीचा
खेळ हा दोन प्रेमांचा..!!

पून्हा पून्हा | Marathi Dukhi Kavita | Lonely Sad Marathi Kavita in Marathi Font | Virah Prem Kavita in Marathi Language

पून्हा पून्हा..
का करतो मी तोच तो गून्हा?
शब्दांनी फटकारले कितीदा तरी पुन्हा
वाळूत बांधली मी घरे स्वप्नातली
का पाहतो तरीही ती स्वप्ने पुन्हा?
नात्यात गूंफले मी धागे रेशमाचे
तकलादू नाती का जोडतो मी पुन्हा?
चालून जाता ढेपाळलो कितिदातरी
वेदना ऊराशी घेऊन का चालतो पून्हा?
करता चांगले कुणाचे तोंडास काळे लागले
चांगले करण्याचा तरीही ध्यास का पून्हा?
मागे वळून पाहता भासला भकास भूत तो
सोनेरी भविष्याचा वेध का घेतो पून्हा?
पाजले क्षिर तरीही गरळ तो ओकला
दंश त्याने केला तरी भला का वाटतो पून्हा?
शोधता सूख ते दूःख किती मी भोगले
पण सुखाचा शोध का घेतो मी पून्हा?
श्री.प्रकाश साळवी

विश्वास कसा ठेऊ ?? | Marathi Kavita On Vishawas | Marathi Kavita On Trust | Truth Marathi Kavita

चेहऱ्यावरी रे ज्यांच्या, सदा गोड हसू असतं...
हसण्यावारी रे ज्यांच्या, हे  जग हि सार फसत.
एकट्यात मी अशांना, रडताना पाहिलं मी...
हे सर्व माझ्या डोळ्यांनी, घडताना पाहिलं मी...

होती जपित लोक, जी स्नेह-प्रेमधन...
जे त्यागी सारे काही, फक्त ठेवाया रे मन...
अहमात नाती त्यांना, तोडताना पाहिलं मी...
हे सर्व माझ्या डोळ्यांनी, घडताना पाहिलं मी...

वचने दिलीत ज्यांनी, साथाची अशी लोक...
येत प्रसंगी सारी, मरणारीही ही लोक...
संकटात भीतीपोटी, पळताना पाहिली मी..
हे सर्व माझ्या डोळ्यांनी, घडताना पाहिलं मी...

जगताना आयुष्यात, आधार ज्यांचा होता...
ज्यांच्याचसाठी त्याचा, रे जीव सारा होता...
त्याच्याच पाठी सुरा, घोपताना पाहिलं मी...
हे सर्व माझ्या डोळ्यांनी, घडताना पाहिलं मी...

घाबरे रे मन माझं, कुठे आता जाऊ...
विश्वासघाती सारे इथे, विश्वास कसा ठेऊ...
स्वार्थात कित्येक घात, होताना पाहिले मी...
हे सर्व माझ्या डोळ्यांनी, घडताना पाहिलं मी...

अरे माणसच माणुसकी, सोडताना पाहिली मी...
हे सर्व माझ्या डोळ्यांनी, घडताना पाहिलं मी...

                               -     प्रसाद पाटील
                                    (स्वलिखित)

Friday, February 20, 2015

तिची आठवण | Marathi Kavita on Athavani | Athavan Marathi Kavita | Miss you Marathi Poems for Whatsapp

तिच्या आठवणी च काहुर
सकाळ पासून लागल होत।
तिला जाउन हुड्काव, असच
माझ मन मला सांगत होत।    
तोच विचार मला आज
तिच्याकडे नेणार होता।
ते हरवलेल फूल माझ
मला परत देणार होता।
कुणास ठाव कशी
माझी ही हिम्मत झाली।
आणी हसतच पावले
तिच्या घरी निघाली।
रात्रीच भान नव्हत
काळ जी ही नव्हती कसली।          
आज माझ्या कनाकनात                    
तीच होती बसली।
हुड्कत होतो तिला                    
सार्या गावात विचारून।
जणू तिलाही लागावी चाहुल
आन तीनच याव समोरून।
काय होत हे
माझ मलाच नव्हत कळ ल।
पण दोन मनाच नात
तिथ पुन्हा होत जुळ ल।
पण दोन मनाच नात
तिथ पुन्हा होत जुळ ल।
                 by सनी सुभाष पगारे

परत लढायचयं मला | Marathi Motivational Kavita For Whatsapp | Small Motivational Marthi Kavita Online

परत उभ राहायचय मला..!


अस घुसमटत जगायचय कोणाला?
सैल तोडुन बंधनाची परत उडायचयमला.
दुसर्याला नमवुन जिंकायचच कशाला?
त्याला जिंकुनच हरवायचय मला.
बंधने झुगारुन सगळच मिळवायचय मला.
त्यासाठी मी भिऊ कोणाला?
स्वत:च्या भावनांना आवर घालून ,
काहीतरी बनायचय मला.
भावनेच्या वेशात आलेल्या शञुला हरवायचय मला,
त्यासाठी थोडतरी स्वार्थी बनायचय मला...

मी पाहिलं , ते तु नाही पाहिलं | Marathi Prem Kavita For Whatsapp | Marathi Poems in Marathi Font

मी पाहिलयं.....
तुझं हसणं, तुझं रडणं
तुझं रुप, तुझं मन
हरलो होतो मी या चौकटीत
या जगात जगणं नाही तुझंविन
हे तु मनामध्ये जागवलं
मी पाहिलं, ते तु नाही पाहिलं...


मी पाहिलयं.....
तुझ्या डोळ्यांत एक लूप्त आहे भावना
ती हळूच हळू करते माझ्याशी सामना
सदासुखी ठेवो तुला, देवापुढे हीच कामना
देवाशी येथेच माझं घोडं अडलं
मी पाहिलं, ते तु नाही पाहिलं...

प्रत्येक दिवस थांबलो मी
वाट क्षणाक्षणाला पाहिली मी
आता काय शिल्लक राहिलं
मी पाहिलं, ते तु नाही पाहिलं...

बोलत असतो मी हजारो मुलींशी
म्हणूनि तू घेतेस संशय माझ्यावरी
काहीच नसे त्यांच्या मनी
एकच राहिलं मैत्रीचे नाते जीवनी
आतातरी असेल तुला कळालं
मी पाहिलं, ते तु नाही पाहिलं...

प्रेम झालं तुझ्याशी म्हणूनि
कधीच न सोडणार साथ
मला काय माहिती,तूच
नाही कधी देणार साद
तुझ्यासाठी मित्रांशी बोलणं टाळलं
मी पाहिलं, ते तु नाही पाहिलं...

कामाआडे बोलते माझ्याशी
नाहीतर काहीच नसते शब्दांशी
करतेस विनवण्या माझ्यापुढे
काम तुझे ते स्वार्थासाठी
तुझे स्वार्थपण खूप घडलं
मी पाहिलं, ते तु नाही पाहिलं...

उत्सुकता असायची रोज तुला बघण्यासाठी
तु आली नाही म्हणूनि विचारतो मनासाठी
फोन करितो रोज मनमोकळा बोलण्यासाठी
साथ फिरतो तुझ्या इच्छेसाठी अन्
जगतो फक्त तुझ्यासाठी
हे गेली तु विसरुन सगळं
मी पाहिलं, ते तु नाही पाहिलं...

कदाचित तू देखील हे पहायला हवं होतसं ..!!

कवी :- वैभव यशवंत जाधव

तुला शोधतो मी | Marathi Sad Dukhi Kavita | Sad Poems For Whatsapp Facebook in Marathi

तुला शोधतो मी प्रत्येक चेहऱ्यात
दिसेल त्या ह्रुदयात ; दिसेल त्या मनात
दऱ्या खोऱ्यात ; घुटमळनाऱ्या वाऱ्यात !
निर्मळ पाण्यात ; वाहणाऱ्या झऱ्यात !
डुलणाऱ्या झाडात ; झाडाच्या पानात !
प्रत्येक क्षणात ; प्रत्येक श्वासात !
घनदाट वनात ; ओसाड रानात !

गाणाऱ्या पाखरात ; अथांग सागरात !
तुलाच बघतो ; तुलाच शोधतो !
तुलाच जाणतो ; तुलाच मानतो !
तुझ्याच प्रेमात न्हातो ; तुझेच गीत गातो !
तुझेच स्वप्ने पाहतो ; तुलाच स्मरतो !
तू कशी हसते ; तू कशी दिसते !
तू कशी चालते ; तू कशी बोलते !
मनामधे उठते काहूर ; जेंव्हा लागते तुझी चाहूल !
तू असणार चंद्रासारखी !
तेजमय ताऱ्यासारखी !
वाहणाऱ्या वाऱ्यासारखी !
माहीत आहे या मना
तू भेटणार नाही ; तू बोलणार नाही !
तू दिसणार नाही ; माझ्या  जीवनात येणार नाही !
तरीही हे वेडे मन तुलाच शोधते !
शोधतच राहते !
शेवटच्या श्वासापर्यंत !

एक अधूरी कहानी
जिच्यात धूर आहे पण आग नाही !
विस्तव आहे पण राख नाही !
रस आहे पण पाक नाही !

संजय बनसोडे

मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय ग़ | Ek Tarfi Prem Kavita | Love Poems in Marathi | Prem Kavita For Whatsapp

मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय ग़
अजुन ही तुला हे कसे कळत नाही
तू नसताना ही तुझ्या आठवणीतच असतो
तू असतेस तेव्हा ते प्रेम तुला कसे कळत नाही

कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर
माझे मलाच ठाऊक नाही
पण एवढे मात्र नक्की आहे की
आता तुझ्या शिवाय मला काहीच ठाऊक नाही

तू नसतेस पण असे कधी वाटले ही नाही
तू असतेस कायम माझ्या मनातल्या घरा
तुझा आभासच अधिक सुखावतो मला
तुझ्या असण्याहून ही प्रिय आहे जरा

मनातले बोल ओठांवर येत नाही कधी
तुझ्या दुरावण्याची भीती उगीच मनी असते
तू असतेस तेव्हा बरेच काही बोलायचे असते
ते तसेच राहते आणि वेडे मन स्वत:शीच हसते

तुझी प्रतिमाच अधिक बोलते माझ्याशी
निदान माझे प्रेम तिला जाणवते तरी
पण मन पुन्हा स्वप्नातच रमते जागेपनी
प्रेम कळेल माझे तुला ही अन होशील माझी कधी तरी

स्पर्श होता तुझा | Marathi Prem Kavita in Marathi Font | Small Marathi Kavita | Marathi Kavita For Whatsapp

स्पर्श होता तुझा
आंतस्वर झंकारुन येते
मधुचंद्राच्या या राती
माझे रोम रोम फुलून येते

ओलावून जाताना या राती
प्रीत मनी गाऊ लागते
एकांत हा सोबतीचा
अन् तन भिजू लागते

भेटीस मिलनाच्या उत्स्फुर्त होते
श्वासात श्वास मग विरु लागते
बिलगुनी राहते ह्रुदयासी ह्रुदय
फुलत बाग रात्र ही मग सरु लागते....
®ऐश्वर्या सोनवणे..
मुंबई  (Aishu..) 

Monday, February 9, 2015

पण, वेळच गेली निघून | Missng You | Marathi Love Feeling Poems | Propose Poem for Girlfriend

प्रेम सांगुन होत नाही.
ते नकळत होत.
जरी नजरेतून समजत असले तरी ते शब्दातून सांगावच लागत.
बोलायचे होते मनातील बरेच काही पण , वेळच गेली निघून ....................

जेव्हा तू माझ्यापासून दूर जाणार हे मनाला जाणवलं तेव्हा
हे हसणार मन दू:खात बुडून गेल . पहिलेल स्वप्न हे स्वप्नच राहून गेल.
बोलायचे होते मनातील बरेच काही पण , वेळच गेली निघून .......................

दिली होतीस लग्नाची पत्रिका हसत तू
पण मला माहित होते तू मनातून होतीस
रडत कदाचित दोघानाही सांगायचे होते काही बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून .......................

जे जमले नाही मला या जन्मी कदाचित मिळविण मी तुला पुढच्या जन्मी
आवडत होतीस खुप मला .पुढच्या जन्मी भेटलीस मला तर सांगेन तुला खुप खुप आवडतेस मला ,
बोलायचे होते मनातील बरेच काही पण , वेळच गेली निघून .............

कितिहि सुंदर मुलगी दिसली तरी | Still Single Marathi Poems | Can't Understand Love | Marathi Prem Kavita for Her

कितिहि सुंदर मुलगी दिसली तरी,
तीचि स्तुति करुन तिला हरबरयाच्या
झाडावर चढ्वायला मला कधि जमलेच नाहि
म्हणुन मला प्रेम ...

कोणाच्या मागे शिट्ट्यामारत फिरन
माझ्या तत्वात कधि बसलेच नाहि
म्हणुन मला प्रेम..


कोणिजर आवड्लिच तर स्वतः हुन
गप्पांना सुरवात करायला मला कधि जमलेच नाहि
म्हणुन मला प्रेम..  



कधि हिंमत करुन कोणाला जर विचारलेच
तर मी तुला त्या द्रुषटिनि कधि बघितलेच नाहि यावेतिरिक्त दुसरे काहि ऎकायलाच मिळाले नाहि
  म्हणुन मला प्रेम..   .

प्रेमात नाहिचा अर्थ हो असतो हे गणित कधि समजलेच नाहि
म्हणुन मला प्रेम.. करायला अजुन जमलेच नाहि..

Saturday, February 7, 2015

अपेक्षा तर काहीच ठेवल्या नव्हत्या | Waiting For For Love Poems Marathi | Marathi One Sided Love Poems | Love You So Much Marathi Kavita

अपेक्षा तर काहीच ठेवल्या नव्हत्या,
माहीत होत त्या कधीच पुर्ण होणार नव्हत्या ,
म्हणून त्यांच्या मागेही
कधी वेडी सारखी धावली नाही ...
पण चूक शेवटी झालीच माझ्या हातून,
नाही म्हणता म्हणता शेवटी ,
एक म्ह्त्वाकांश्या मनाशी बाळगलीच,
आणि जे नाही व्हयाच तेच झाल ...
दूर असूनही जितकं तुला आठवलं नसेल,
तितकं तू जवळ आल्यावर तुला शोधलं ..
एक वेडी अशा व्हती तुझ्या बद्दलची,
 जी आता हळूहळू पुसटशी होत आहे..
सगळच तर विरळ होत आहे,
तुज भेटणं, मला शोधणारी तुझी प्रेमळ नजर
आणि कदाचित आता तुज माझ्यावरच प्रेमही......................
पण, मी हे सगळ नाही विसरू शकत
तू कधी भेटलास नाही तरी ही
आणि तुझी प्रेमळ नजरही
 तुझ्या आणि माझ्या पहिल्या नजरेवर च माझ पूर्ण जीवन अपर्ण आहे...

आहेच ती अशी | Marathi Pem Kavita | Love Poems In Marathi | Marathi Kavita for Her | Kavita For GirlFirend

आहेच ती अशी...
 चेहर्यावर नेहमीच हसू,
 पण मनात खूप काही साठलेलं...
 आले जरी डोळे भरून,
 ते कोणालाही न दिसलेलं...
 आहेच ती अशी...
 सगळ्यांच्या सुख-दुखत, नेहमीच असणारी...
 स्वतःलाच विसरून,
 सगळ्यानसाठी झटणारी ..
 स्वतःच दुखः, कोणालाही न दाखवणारी,
 अन कोणीही काहीही विचारल,
 तरी नेहमीच...
 हसून उत्तर देणारी...
 आहेच ती अशी...
 फक्त त्याच्याच आठवणीत झुरणारी,
 तो आहे दूर कुठे तरी..
 फक्त त्याच्या येण्याचीच वाट पाहणारी...
 नाही तो तिझा, हे जाणून नहि....
 फक्त त्याच्याचसाठी जगणारी...
 अन दिलेल्या त्या प्रेमाच्या वाचनानं,
 आजून हि पाळणारी...
 आहेच ती अशी...
 कोणालाही न कळलेली,
 अन कोणालाहि न कळणारी...
 चंद्राची..............चांदणी जशी....
 आहेच ती अशी...
 आहेच ती अशी


फक्त तुझ्यासाठीच ........... :)

असा का शेवट दिला | Marathi Break Up Kavita | Broken Heart Marathi Poems in Marathi Font

BREAK UP नंतर पहिल्यांदाच त्यांची भेट झाली,
ती पण अचानक घडून आली....
त्याला पाहून तिचे डोळे पाणावले,
पण ते अश्रू डोळ्यातून खालीनाही ओघळले.
बर झाल तू भेटलीस खूप दिवसापासून काही सांगायचे होते,
त्याच्या या बोलण्याने तिलाआपले पणा वाटला होता.
माझ आता लग्न ठरलय हे तुला सांगायचे होते,
त्याच्या या शब्दांने तिला क्षणात परक केल होते.
जड अंतकरणाने त्याला अभिनंदन केल,
नक्की येईल लग्नाला हे वचन पण दिल.
निरोप घेऊन तो निघून गेला
इथे अश्रूंचा पूर आला,
कस विसरला हा प्रेमाला हाच प्रश्न वारंवार निर्माण झाला.
कस विसरू शकला
कस पत्थर दिल झाला
सुंदर अशा प्रेमाला
असा का शेवट दिला
असा का शेवट दिला....

पण पुढच्या जन्मी माझा होशील ना रे | Marathi Sad Heart Touching Kavita | Be With me Marathi Poems

असं वाटतंय, तू मला विसरून
जाणार...!
मग कधीतरी कुणाच्या तोंडून नाव
ऐकायला मिळालं,
काय करते आता ती? कुठे आहे
सध्या?
मग लक्षात आलं,
अरे! आपण तर पुरतेच
विसरलो तिला...
खिशातून मोबाईल काढला,
तिचा नंबर शोधायला,
पण तिचा नंबरच लागला नाही...
कदाचित बदललेला नंबर माझ्याकडे
नव्हता.
मग आणखी कुणाकडे तिचा नंबर
भेटतोय का?
कारण तिची मनापासूनच आठवण
येत होती,
न सांगता एकमेकांच्या मनातलं
ओळखणारे,
असं नातं होतं आमचं,
कुणाचीही नझर लागण्यासारखं...
पण असं काहीतरी घडलं,
आणि............ ....
आता कशी असेल ती? कुठे असेल
ती?
असे अनेकानेक प्रश्न डोक्यात येत
राहीले...
आपणच सांगितलेलं तिला कि,
नेहमी तुझ्या सोबत असेन,
पण ती गोष्ट आपणच विसरलो...
मग तिच्या घरी सहजच फोन केला,
कसे आहेत सगळे, अशी विचारपूस
करायला?
खरं तर फक्त
तिच्यविषयी विचारायचं होतं,
विचारलं मग, कसे आहेत सगळे?
थोडं थांबून मग उत्तर आलं,
कि सगळे ठीक आहेत...,
माझी मैत्रीण काय म्हणते?
ती आता काय बोलणार?
आणि ती काही बोलू शकते
का आता?
थोड्या शांततेनं मग मी विचारलं...
असं का म्हणताय?
अरे, ती काही बोलायला,
ती या जगात
असायला तरी पाहिजे ना?
तुझी खूप रे वाट पाहिली तिनं,
अगदी शेवटच्या क्षणापर्यंत,
पण तू मात्र आला नाहीस....
तिला काहीतरी झालं होतं...
मी फक्त ऐकतच राहिलो,
शब्द तर बाहेर पडायलाच तयार
नव्हते,
अश्रू मात्र भळाभळा वाहत होते....
मग आवाज आला, ऐकतोयस ना!!!
तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस,
आणि दु:खीही होऊ नकोस,
असं तिनंच मला सांगितलंय
तुला सांगायला...
आणि हो तुझ्यासाठी काहीतरी लिहून
तिनं ठेवलंय,
ती म्हणालेली, माझी आठवण
त्याला नक्की येईल,
आणि तो इथे फोन करेल,
तेव्हा त्याला दे...
तुला जमेल तसं ये आणि घेऊन जा,
आणि मी फोन ठेवला....
तिनं घरीही सांगून ठेवलेलं,
मी गेल्यावर कुणीही रडायचं
नाही,
नाहीतर तिही रडत राहणार,
दु:खी राहणार,
म्हणून तिच्या घरातले रडत नव्हते,
फक्त तिच्यासाठीच.... ..... !!!
मग मी तिच्या घरी जाऊन
ती चिट्टी घेऊन आलो...
असं वाटतंय कि तू मला विसरलास
मला...
अशीच सुरुवात होती...
कसा आहेस...?
मला माहित होतं...
तुला माझी आठवण
कधी ना कधी नक्की येईल,
पण तू दु:खी होऊ नकोस,
स्व:ताची काळजी घे,
खूप मोठा हो,
स्व:ताची स्वप्नं पूर्ण कर,
तशी केली असशीलही...
खरं सांगू जाता जाता तुझी खूप
आठवण येत होती,
कदाचित तू येशील म्हणून जीव
तुझ्यात अडकून राहिला होता,
पण तू नाही आलास,
मग विचार केला,
तुझ्यासाठी जाता जाता काहीतरी बोलून
जावं,
मला खात्री होती,
तू हे नक्की वाचशील !!!
या जन्मात मी तुझी होऊ
शकली नाही.......
पण पुढच्या जन्मी माझा होशील
ना रे?????

आशी का वागतात हो माणसे ? | Marathi Poems | Selfish People Poems | Swarthi Manse Marathi Kavita

सरडयाला ही लाज वाटावी इतक्या
पटकन रंग बदलतात हो माणसे
क्षणात शब्द देवून
क्षणात शब्द मोडतात हो माणसे
आधाराला हात देताना ही
नखेच टोचतात हो माणसे
उठवाता उठावता ही
दोन चारदा पडतातच हो माणसे
जखमेवर फुंकर मारताना ही
मिठ्च फवारतात हो माणसे
आपला आपला म्हणत
पाठित घाव घालतात हो माणसे
साधु बनुण ही वासनानाच
कवटाळतात हो माणसे
रामाच रूप घेवून ही रावणाचीच
पुजा करतात हो माणसे
संत्वनाला आल्यावर ही
काटेच पेरतात हो माणसे
मी नाही त्यातला म्हणत
तशीच वागतात हो माणसे
थोड्या फार स्वार्थासाठी
जात बदलतात हो माणसे
केलेल्या उपकराना क्षणात
विसरतात हो माणसे
प्रश्न पडतो मला खरच
आशी का वागतात हो माणसे ?
स्वाभिमान शून्य आयुष्य
कशी जगतात हो माणसे ?