Monday, September 23, 2013

काय म्हणावं या वेड्या प्रेमाला : Marathi Love Poem : Marathi Sad Kavita

तुझ्याशिवाय नाही जगू शकत....
.
असं कितीही म्हटलं अन वाटलंतरी तुझ्याशिवायचं जगावं लागतंय मला.
.तू नाहीस आयुष्यात, हे कितीही वास्तव असलं तरी, तू आहेस असं समजूनच जगावं लागतंय मला.
.तू आहेस दूर म्हणून काय झालं, माझ्या प्रत्येक क्षणात, तुझी जाणीव होऊन जगणं कसं विसरू मी या वास्तवाला.
.तू नाहीस माझी कधी होणारही नाही, तरी तू माझीच आहेस, असं हृदयाला वाटतं रहाणं, काय म्हणावं तुझ्या धुंदीत जगण्याला.
.असं कसं नातं उमललं मनात तूच सर्वस्व होऊन गेलीस तुझ्या शिवाय जगणंच शक्य नाही, काय म्हणावं या वेड्या प्रेमाला .


संजय एम निकुंभ , वसई

3 comments:

Anonymous said...

Chan ahe kavita....heart touching.
Vaachun kahi junya athavani jaagya jhalya

Anonymous said...

Mast ahe....athavani kadi visarta yet ahe...viraha madhech jagave lagte....

Anonymous said...

heart touching....kharach prem ved ast...