तुझ्याशिवाय आता,
मन कुठेच लागत नाही.....तुझ्याशिवाय आता,मी काहीच मागत नाही.....
शोधतो बहाणे तुझ्याशी बोलायचे,माझे इशारे तुला जरा देखील कळत नाही.....
का करतो मी असे वेड्यासारखा,माझे वागणे तुला जरा दे खील समजत नाही.....
आधीन झालोय गं मी तुझा,तुझं व्यसन काही केल्या सुटत नाही.....
नेहमी तुझाच विचार करत असतो,माझे वाहणारे तुला कसे दिसत नाही.....
फिरत असतो सैरभैर आठवणीत तुझ्या,तु शोधुनही मला सापडत नाही.....
आता नाहीच सहन होत,मला एक क्षणही दुरावा तुझा.....
काय करु काय सांगु मी तुला,तुझ्याशिवाय मला खरं तर करमत नाही.....
तुझ्याशिवाय मला खरं तर करमत नाही..... :-D :-P
© सुरेश सोनावणे.....
No comments:
Post a Comment