Tuesday, January 22, 2013

Marathi Sad Kavita : असे का होतं जे आपल्याला आवडतं ते दुसर्यालाच मिळून जातं?

प्रेम तर सारेच करतात काहींचे प्रेम
पूर्ण होतं जे एकमेकांना मिळून
जातात सुखाचा संसार होतो तर
काहींचा प्रेम अधुरे राहतं जसे माझे
माझेही प्रेम अधुरेच राहिले .
ह्या अधुरे राहिलेले प्रेम म्हणजे
खूपच आठवणीने भरलेलं समुद्र
आणि त्या समुद्रात
आपली भरकटलेली होडी ,पण
त्या होडीला किनारा च सापडत
नाही तसेच आठवण खूप येते पण
ती मिळतच नाही .
माझे हि प्रेम असेच झाले ते
कधी झाले कळलेच नाही पण
मला कळले तेव्हा उशीर
झाला होता . ती खूप
चांगली होती तिला मी आवडायचो
पण माझा स्वभाव मस्तीखोर
त्या मुले तिचे
प्रेमही मी मस्ती मध्ये नेले जे
मला नंतर जाणवले
मी केवढी मोठी चुकी केली , पण
काय करू आता ते पूर्ण होणार
नाही . तिच्या प्रेमापुढे मी शून्य
ठरलो मी समजूच
शकलो नाही तिच्या प्रेमाला कारण
ती वेळ
होती शाळेची मी आणि ती सोबतच
शिकायचो आठवी इयत्ते पासून
आम्ही एकाच क्लास मध्ये होतो .
ती आमच्या सरांची ची भाची होती आमचे
सर म्हणजे तिचे
मामा त्यांना काहीही बोललो आर
तिला राग यायचा आणि मी मुद्दाम
बोलून तिची मजा घ्यायचो .. ते
दिवस मला आज हि आठवतात ..
एक दिवस होता शिक्षक
दिनाचा आम्ही सगळ्यांनी साजरा करायचे
ठरवले आमचा क्लास
सकाळचा असायचा आम्ही मुले
सकाळीच
जायचो सर्वांच्या अगोदर मस्त
मजा करायचो एक तास आणि नंतर
मुली यायच्या तसेच
त्याही दिवशी आम्ही लवकर
गेलो आणि क्लास ची सजावट
केली आम्ही केलेली सजावट पाहून
आमच्या वर्गातल्या मुली खूपच
खुश झाल्या , का नाही होणार
आम्ही केलेच तसे होते साफसफाई
पासून बोर्ड पर्यंत सगळेच सजले
होते आणि खायला पण आणून
ठेवले होते हे तर मुलींनाही माहित
नव्हते आम्ही साजरा करणार आहोत
म्हणून त्यांनी विचार
केला होता पण आम्ही ते साक्षात
केले होते आणि जसे आमचे सर आले
ते तर पाहून चकितच झाले कारण
आम्ही जेवढी सजावट
आणि जो कार्यक्रम
ठेवला होता तो खरच खूप चांगला
होता आणि आमच्या सरांना आवडला हि त्या
दिवशी मुली हि खूप सुंदर दिसत
होत्या .
सरांनी हि आम्हाला शाबाशकी दिली आणि
आम्ही त्या दिवशी तोडके मोडके
भाषण केले ..खूप मजेदार होते ते
दिवस
आम्ही त्या आमच्या शाळेच्या दिवसात
मजा तर केली तेवढाच अभ्यास
हि केला .. पण
माझ्या मित्रांनी प्रेमाकडे
जरा जास्तच लक्ष दिले
आणि मी अभ्यासाकडे
आणि मस्ती कडे त्या मुळे मी पास
झालो आणि माझे सर्व मित्र नापास
झाले .. आणि ते नापास झाले म्हणून
आम्ही पार्टी हि केली, हे होते
आमचे शाळेत
असतानाची मस्ती धमाल .
पण तिच्या विषयी तर
सांगायचे तर राहूनच गेले,
हा ..तर ती खूप चांगली होती मी जे
करायचो ते तिला खूप आवडायचे
माझी मस्ती तर तिला खूप
आवडायची सर्वांचा लाडका होतो मी क्लास
मध्ये त्या मुळे माझी काळजी सारेच
घ्यायचे ,पण ती जरा जास्तच
घ्यायची ती माझ्या सोबत शेवट
पर्यंत एकही शब्द बोलली नाही पण
तिच्या मनात जे काही होते ते
मैत्रिणी कडे सांगायची आणि ते
मला हि समजायचे मला हसू यायचे
तेव्हा कारण मला माहित होते जर
प्रेम केले तर मी नापास होईल
माझ्या मित्रांसारखे .. पण
मला कळले
मी चुकी केली ती माझ्यावर खरच
प्रेम करत होती .
ती माझ्या कडे
पहायची मी तिच्या कडे पहायची
मला माहित होते ती माझ्या कडे
पहायची पण मी तिला पाहताच
ती दुसरीकडेच नझर
फिरवायची हा खेळ खूप छान
वाटायचा ,ती हसताना खूप सुंदर
दिसायची तिचा राग म्हणजे मध
तो राग म्हणजे गोड
असायचा म्हणजे मना पासून
नव्हताच कारण ती माझ्या वर प्रेम
करत होती .
ती माझ्यासाठी झुरली पण
मला कळलेच
नाही तिला रात्री झोपही यायची नाही
सारखा विचार करायची
माझ्याशी बोलायचे पण ते
तिला हि जमले
नाही आणि मला हि जमले
नाही ,तिला भीती होती तिच्या मामाची आणि
तिच्या घरच्यांची पण तिने जर
मला तसा इशारा दिला असता तर
मी तिच्यासाठी सारे काही केले
असते पण ते तिने मला जानउ दिले
नाही . तिने हे सारे तिच्या मनात
ठेवले आणि माझे तर सारेच मनात
राहिले मी तर माझ्या मनातले
कधी बोलूच शकलो नाही ..
शेवट असा झाला कि आमचे शाळेचे
दिवस संपायला आले
असताना मी खूप हिम्मत करून
तिला विचारले तेही मित्रांना सोबत
घेऊन कारण
माझी ह्यासाठी हिम्मत झालीच
नाही
त्या दिवशी ती आली आणि मी तिला
विचारले हि तुझे माझ्यावर प्रेम
आहे का ? कदाचित हे मी चुकीचे
बोललो मी जर '' माझे तुझ्यावर
प्रेम आहे मला तू आवडतेस असे
बोललो असतो तर
ती मला मिळाली असती "
पण ते जमलेच नाही आणि ती रडू
लागली तिचे रडू माझ्या कडून पाहून
गलेले नाही म्हणून मी तिथून निघून
गेलो पण त्या वेळेस मी तिथे
थांबलो असतो तर तिचे उत्तर
मला मिळाले असते ..
पण ते मला जमलेच नाही .... असे हे
माझे पहिले प्रेम जे आज
हि मला आठवतं
आणी मी आजही दु:खी होतो .
कारण पहिले प्रेम म्हणजे एक लाट
जी भरती येते तशी सारे जुने दिवस
आठवण देऊन जाते ..
पण आजही मला वाटतं हे
माझ्याशीच का होतं...?
त्यानंतर मला कुणी आवडे पण
आता कून इतरी आवडायला लागले
आहे पण कदाचित
दुसर्या साठी आहे , पण असे
का होतं जे आपल्याला आवडतं ते
दुसर्यालाच मिळून जातं?

No comments: