Tuesday, January 22, 2013

Marathi Prem Kavita : प्रेम कथा..

अश्विन ज्या चाळीत राहतो तिथे आज एक
नवीन सासणे कुटुंब
राहायला आलंय.त्यांच्या परीवारात ते तिघे
म्हणजे काका काकु
आणि त्यांची 20वर्षांची मुलगी मृणाल.ते
जेव्हा चाळीत येत होते.तेव्हा चाळीतली सर्व
मुले फक्त त्या मृणालकडेच बघत होते.कारण
ती खुपच सुंदर होती.
अश्विनलाही बघताक्षणीच
ती भावली.त्या दिवशी चाळीतल्या सर्व
मुलांच्यात फक्त मृणालचीच
चर्चा होती.सर्वांनाच जवळजवळ first sight
love ज्याला म्हणतात तेच झालं
होतं,अश्विनलाही त्यापेक्षा काही वेगळं झालं
नव्हतं.
अश्विनचे आईवडील
एका दिवसासाठी बाहेरगावी गेले
होते.तो घरी एकटाच होता.रात्रीची झोप येत
नव्हती.त्याच्या मनात उशीरापर्यँत फक्त
मृणालचेच विचार येत होते,त्याला खुपच
उशीराने झोप लागली.
त्याला स्वप्नामध्येही तिच दिसत
होती.एका शुभ्र सलवारमध्ये ती माझ्याकडेच
स्लो मोशनमध्ये धावत येताना अश्विन
अशी हाक मारतीये असं त्याला वाटत होतं.
तेवढ्यात दरवाजावरची बेल वाजली,त्याला जाग
आली.डोळे चोळत त्याने घड्याळाकडे
पाहीलं,सात वाजले होते.त्याने दार उघडलं,बाहेर
पाहताच तो दचकलाच.कारण बाहेर मृणालच
उभी होती,थोडावेळ त्याला वाटलं आपण अजुन
स्वप्नातच आहोतच की काय?
तेवढ्यात ती म्हणाली,hi माझं नाव
मृणाल,आम्ही कालच चाळीत नवीन
राहायला आलोय,गडबडित
साखरेचा डबा आणायचा विसरुन
गेलो,चहाला थोडी साखर हवी होती.वाण्यानेही
अजुन दुकान उघडलेलं नाहीये म्हणुनच
म्हणतीये.
त्याने
तिच्या हातातली वाटी घेतली आणि तिचा मोहक
स्पर्शत्याच्या हाताला झाला.तो त्याला खुपच
आवडला.त्याने साखर आणुन
दिली.ती म्हणाली,थँक्स।बाय द वे तुझं नाव कळु
शकेल का मला? मिहीर....
नाही अशोक....नाही.माझं नाव काय आहे?
हां आठवलं अश्विन...तो तिला बघुन त्याचं
नावही थोडावेळ विसरुन गेला होता.
ती हसली व म्हणाली ok tnx ashwin
by...ती जाताना तो सारखा तिच्याकडेच बघत
होता.या गोष्टीनंतर त्यांची ओळख वाढत गेली.
दोघेही कॉलेजच्या एकाच वर्षात असल्याने तर
त्यांची चांगलीच मैत्री जमली.दोघांच्याह
ी परीवारांना त्यांच्या या मैत्रीबद्दल
काहीही आपत्ती नव्हती.हळुहळु एकमेकांचे
स्वभावत्यांना खुपच आवडु
लागले.तिला अश्विन खुपच आवडु
लागला होता.ती कधीकधी त्याला चोरुन
बघायची आणि तोही....
दोघांच्याही नजरेची धडक झाली की ते लगेच
नजर दुसरीकडे वळवायचे.दोघांना
ही एकमेकांच्या प्रेमाची जाणीव
झाली होती पण पहीला बोलण्याची हिंमत
कोणीही करत नव्हतं.
एक दिवस अश्विनने तिला संध्याकाळी पाच
वाजता बागेत भेटण्यासाठी बोलावलं.तिलामाह
ीत होतं की आज तो तिला नक्कीच प्रपोझ
करणार.त्यादिवशी ती अर्धा तास आधीच तिथे
पोहोचली.इकडे अश्विनही जायला बाहेर पडणार
तेवढ्यात,त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ
लागला,त्याच्या छातीत खुपच दुःखु लागलं
तो तडफडत त्याच्या घराच्या दाराशी पडला.
त्याच्या आई वडीलांनी हे पाहीलं
आणि त्याला फॅमिली डॉक्टरांकडे
घेऊनगेले,त्यांनी याला city hospital मध्ये
हालवण्यास सांगितलं.बँकेतील
होती नव्हती ती रक्कम त्यांनी काढुन
त्याला city hospital मध्ये
हालवलं.त्याला व्हेँटिलिटरवर ठेवण्यात
आलं.तिथे केलेल्या tests मध्ये सिद्ध झालं
की त्याच्या हृदयातील दोन व्हॉल्व्स
बदलाव्या लागतील.आणि त्यासाठी जवळजवळ
दोन लाख रुप ये खर्च येईल.
ही रक्कम ऐकुन
अश्विनच्या वडिलांच्या काळजात धस्स
झालं.महीना सात हजारावर कुटुंब
चालवणारा मी गिरणी कामगार दोन लाख रुपये
12तासात कसं उभं करणार? ठीक आहे डॉक्टर
मी काहातरी करतो.असं ते
म्हणाले.आणि आपल्या नातलगांना ते कॉल करु
लागले.बाहेर चालणारं वडील आणि डॉक्टरांचं हे
संभाषण अश्विनने ऐकलं होतं.
तोँडावर लावलेला मास्क
आणि पप्पांची चाललेली ती धडपड पाहुन त्याचे
डोळे पाण्याने
भरले,अशी त्याची अवस्था झाली होती.
.
इकडे रात्रीचे साडेआठ वाजले तरी मृणाल
त्याची वाटच बघत होती.कदाचित
काही कारणाने तो अडकला असेल असं
तिला आत्तापर्यँत वाटत होतं.पण तीही नंतर
खुपच निराश होऊन घरी निघुन गेली.तिथे
गेल्यावर तिला कळलं कीअश्विनला city
hospital मध्ये नेलंय ती लगेच तिकडे
जाण्यासाठी निघते.तीच्या छातीची धकधक
वाढलेली असते.खुपच काळजी वाटत असते
अश्विनची
.city hospital मध्ये पोहोचताच.तिथे
झालेली गर्दी आणि पोलीस पाहुन तिचा जीव
घाबरतो,त्या गर्दीत वाट काढत ती आत
पोहोचते समोरचं दृश्य पाहुन तर तिचा श्वासच
थांबतो,छातीचा ठोका चुकतो,हातापायाच
ा थरकाप होतो.......
एक तासापुर्वी(ONE HOUR AGO)
पप्पांची अश्विनला वाचवण्याची धडपड
त्याला स्पष्ट दिसत
होती.त्याला स्वतःला त्याच्याविषयी खुपच
दोषी वाटत होतं.माझ्या उपचारासाठी न पेलणारे
कर्ज
पेलण्याचा प्रयत्नकरताना माझ्या वडीलांची झुकणारीपाठ,एकेक
पैशासाठी नातेवाईकांकडे त्यांना पसरावे
लागणारे त्यांचे हात.हे त्याला बघवत नव्हते....
त्यांनी जरी हवी तेवढी रक्कम
उभी केली,माझा जीव वाचला तर ते कर्जाचे
डोंगर फेडताफेडता रोज त्यांचा मृत्यु होईल
त्याचं काय?हाच विचार अश्विनने
केला आणि तोंडाला लावलेला मास्क काढुन
ड्रेसिँगट्रे मध्ये पडलेल्या चाकुने स्वतःचा हात
कापला आणि सर्वाँची साथ सोडुन निघुन गेला.
त्याच्या हाताची नस कापली गेल्याने
रक्तस्त्राव होऊलागला.आणि त्यातच
त्याचा मृत्यु झाला.
...
जेव्हा मृणाल तिथे
पोहोचली तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात
पडलेल्या अश्विनच्या मृतदेहाला कवटाळुन
त्याचे आईवडील रडत होते.हेच दृश्य पाहुन
तिचा थरकापउडालेला असतो.ती दोन तीन
पावले मागे सरकते.सर्वांच्य
़्या नजरा त्या आपल्या मुलांसाठी रडणार्या आई
वडीलांवर खिळलेल्या असतात.
तेवढ्यात जोरात बंदुकीच्या गोळीचा आवाज
येतो.सर्वजण मागे वळुन पाहतात.तरत्यांन
ा दिसते की,एका मुलगीने(मृणाल)
इन्सपेक्टरच्या रिव्हॉल्वर पॉकेट मधील बंदुक
हिसकावुन स्वतःवर गोळी झाडुन
घेतलेली असते.जमीनीवर पडलेली ती मृणाल
आपला प्राण त्याच्यासाठी देऊन जाते
ज्याच्यावर तिने भरपुर प्रेम केलं......
अश्विनने आपल्या कर्तव्या पोटी जीव
दिला आणि मृणालने प्रेमापोटी कदाचित ते
आपापल्याजागी बरोबर हो...

Marathi Friendship Kavita : साले हे मित्र असतात बाकी मस्त...

साले हे मित्र असतात बाकी मस्त
"काय मस्त मुलगी चाली आहे यार बघ......!!!!!!!
!"
"व...हीणी आहे तुझी साल्या,दुसरीकडे बघ...."
हजार पोरी बघून पण यांचे मन काही भरत नसतं
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त
"नडला कि फोडला"असे ह्यांचे ब्रीदवाक्य
असतं
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त
पास झाल्यावर पार्टीचे निमंत्रण
त्यांना द्यायचं नसतं
निर्लज्ज असतात ते,त्यांनी ते आधीच ग्राह्य
धरलं असतं,
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त
शाळेचा result असो या प्रेमाचा,ह्यांच ाच
धिंगाना जास्त
तुमचे प्रेमप्रकरण अख्या कॉलेजमध्ये
ह्यांच्यामुळेच गाजतं
पण काहीही म्हणा,
साले हे मित्र असतात बाकी मस्त
प्रत्तेक दु:खात त्याचं तुम्हाला पाठबळ असतं
उन्हात उभे तुम्ही,तरी ह्यांच्याच
पायाला भाजतं.
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त.
शेवटच्या बेन्चवरच्या कमेंटला दाद देणे हे
त्यांच्या हक्काचं काम असतं
breakup नंतर"अशाच असतात रे पोरी......
"हे ठरलेले वाक्य असतं,
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त.
प्रेमाचे नाही वाजले तरी मत्रीचे नाणं
नक्की वाजतं,
तोंडावर नाही केली स्तुती त्यांनी तरी
दुसर्यासमोर त्यांच्या तोंडून तुमचच नाव गाजतं
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त.
मित्रांनो,जीवाल ा जीव देणारे मित्र खूप
नशिबाने भेटतात,
खरे मित्र ओळखा आणि आयुष्यभर
त्यांची मैत्री जपून ठेवा

Marathi Prem Kavita : एक प्रेम कि एक मैत्री..

एक प्रेम कि एक मैत्रीः♥♥
आम्ही एकाच कॉलनीत
राहतो.ती आणि मी.मी तिच्यापेक्षा तीन वर्षाने
मोठा आहे.मी जेव्हा जेव्हा तिच्या घरासमोरुन
जात असतो,तेव्हा तेव्हा ती माझ्याकडे बघत
असते.मला वाटतं तिचं माझ्यावर प्रेम आहे।
ती दिसायला सुंदर आणि स्वभावाने तर खुपच
चांगली आहे,मलाही ती खुपच आवडते
पण,सर्वात मोठा प्रोब्लम काय आहे माहीतीये
she is my bst frnds sistar.ती माझ्या बेस्ट
फ्रेंडची सख्खी बहीण आहे।पण मी तिला खुप
आवडतो,जेव्हामी माझी आंघोळ वगैरे आवरुन
बाहेरयेतो,तोपर्यंत ती मला पाहण्यासाठी दारात
उभी असते.आणि जोपर्यंत मी बाहेर येत
नाही,मला एकदा बघत नाही तोपर्यंत
ती कॉलेजला जात नाही,तिथेच उभी असते।
कॉलेजला जातानाही पुन्हा पुन्हा वळून मागे
पाहत असते।मग मी संध्याकाळी निवांत
जेव्हा बाल्कनीत येतो तेव्हा ती बाहेर उभी राहुन
माझी वाटच बघत असते कि,कधी मी एकदा येईन
आणि तिच्याकडे माझी एक नजर वळवुन
पाहीन,आणि मी तिच्याकडे पाहील्यावर मग
ती दुसरीकडे बघत असल्याचं नाटक करायची।
गेली ६महीने मी तिला टाळत आलोय तिच्याकडे
न बघणं,तिच्यापासु न लांबलांब पळणं माझं
चालुच होतं.कारण मी ठरवलं होतं की काही झालं
तरी मित्राच्या बहीणीशी मी कसंकाय प्रेम करु
शकतो,मी मित्राला कसंकाय धोका देऊ शकतो?
नाही नाही हे कधीच होऊ शकत नाही.माझेच
सिद्धांत मला याची अजिबात परवानगी देत
नव्हते।म्हणुनच मी तिला अशा प्रकारे
टाळाटाळ करत होतो।पण तरीही ती न
डगमगता माझ्यावर अशीचप्रेम करत होती।
माझ्याकडे सतत
पाहायची आमच्या घरी येण्याची सतत बहाणे
शोधायची,आमच्या घरच्यांची आणि त्यांच्याघरच्या
ंची चांगली ओळख होती ना म्हणुन।तिच्या याच
प्रेमासमोर माझे सिद्धांत विरघळले गेले,हळुहळु
खुपच प्रेम करु लागलो होतो मीही तिच्यावर.मग
मी तिच्या त्या घायाळ करणार्या नजरेत
इतका बुडालो कि मी ही तिच्याकडे
सारखासारखा बघु
लागलो,आणि तिला कसंही करुन प्रपोझ
करायचं ठरवलं,मी एक चिट्ठी लिहुन
पुस्तकातल्या एका पानात घडी घालुन ते
पुस्तक(थोडं घाबरतच) तिच्याकडे एका लहान
मुलगीद्वारे पाठवुन दिलं पण ते तसंच परत आलं
ती लहान मुलगी म्हणाली की ती दीदी म्हणतीये
हे पुस्तक तिचं नाही।मी ते पुस्तक परत घेतलं।
कदाचित तिला कळलं नसावं कि यात
मी तिच्यासाठी चिठ्ठी ठेवलीये ते।मग यानंतर
अशीच दोन वर्षे गेली मी त्यानंतरफेस टु फेस
तिला प्रपोझ करायचं ठरवलं,पण मी खरोखरच
याआधी कोणत्याही मुलगीशी कधीच
बोललो नव्हतं,फारच कमी।मग मला हे जमेल
कसं।कारण माझ्यात फारच कमी कॉन्फीडंट
होतो,त्यामुळे मी सोबत प्रेमपत्रही लिहुन
घेतलं,आणि ते खिशात ठेवलं जर
मी तिला बघितल्यावर जर काहीच बोलु
शकलो नाहीतर किमान हे पत्रतर तिच्या हातात
देईन,ठरल्याप्रम ाणे मी तिच्या घरात
कोणीही नसताना गेलो,माझ्या मित्राचं एक
गाण्याचं कॅसेट माझ्याकडे होतं ते
देण्याचा बहाणा करुन।मी तिच्या घरात
गेलो ती एकटीच होती,मला पाहुन
ती थोडी दचकलीच,मी तिला हे कॅसेट
दिलं,आणि म्हणालो हे आशिषचं(तिचाभाऊ,
माझा मित्र)कॅसेट ते द्यायलाआलोय।ते तिनं
घेतलं.मी थोडावेळ तिच्याकडे तसंच पाहत
राहीलो,माझं शरीर थरथरंत होतं भीतीने,तिने
माझ्याकडे पाहीलं
आणि म्हणाली तुला काही बोलायचंय,
मीःनाहि नाही मला काय बोलायचं असेल।असं
मी म्हणालो आणि तिथुन लगबगीने
निघालो.खुपच
घाबरलो होतो मी खुपकाही सांगायचं होतं,शब्द
ओठापर्यँत येत होते पण बाहेरच पडले
नाहीत.मी आरशासमोर उभा राहिलो.मीमाझ्या
आत्तापर्यंतच्या
घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेण्याचं
ठरवलं,सर्व गोष्टींचा सर्वबाजुंनी विचार
करण्याचं मी ठरवलं.तिला प्रपोझ केल्यावर
तिने जरी माझं प्रेम स्विकारलं तर,आमचं
भविष्य काय असेल?काय तिचा भाऊ म्हणचेच
माझा मित्र मलातिचा नवरा म्हणुन
स्वीकारेल,तर उत्तर येत होतं नाही?
तो मला स्वीकारणार नाही.
उलट तो मला धोकेबाज
म्हणेल.मी तिच्या मनाचाही विचार
केला मी तिला नाहीम्हटलं तर काय होईल?
तिला दुःख नक्कीच होईल पण ते तात्पुरतं
असेल,पण नंतर ती मला कदाचित
विसरेल.आणि तिचं लग्न झाल्यावर
तिच्या घरी ती नक्कीच सुखी राहील. तीन
तासांनी मी एका निर्णयावर येऊन
पोहोचलो.मी तिला विसरण्याचा निर्णय
घेतला,मला या निर्णयाने खुप रडु
आले,मी गपचुप बाथरुमध्ये जाऊन रडु
लागलो,तोंडावर रुमाल धरुन हूंदके देऊन रडत
होतो मी।काही दिवसांनी तिचं लग्न
झालं.नवरा मुलाची खुपच मोठि शेती,गडगंज
पगाराची नोकरी होती।त्याने मनातएक
समाधान होतं आणि एक दुःखही,डोळ्याती ल
आसवांप्रमाणे मनातील
आठवणी पुसता आल्या असत्या तर किती बरं
झालं असतं नाही....आज ती तिच्या संसारात
सुखी आहे आणि तिच्या सुखात
मी हि.....शेवटी मैत्री जिँकली आणि प्रेम हारलं
सुखी राहावं तिने,जिथे असेल ती, ही एकच
ईच्छा माझ्या मनी आहे,
ती दुर जाताना माझ्यापासुन आज,चेहर्यावर
हसु आणि डोळ्यात पाणी आहे।।
आनंदी आहेस,आनंदी राहा तुझा नवरातुला सुखी ठेवतो ही बातमी माझ्याकानी आहे,
ती दूर जाताना माझ्यापासुन आज,चेहर्यावर
हसु आणि डोळ्यात पाणी आहे।।
जाताना एकच सांगतो,सांभाळ स्वतःला गं
या वासनेने भरलेल्या जगात,इथे
कोणासाठी ना डकोणी आहे,तुम्हाला कथा सांगणार्या एका प्रियकराची ही प्रेमकहानी आहे।।
ती दुर जाताना माझ्यापासुन आज चेहर्यावर
हसु आणि डोळ्यात पाणी आहे,चेहर्यावर हसु
अन डोळ्यात........ ....पाणी आहे,डोळ्यात
पाणी आहे.........Wri tten by तुमचा मित्र एक
प्रियकर...

Marathi Virah Kavita : सात वर्षाचे प्रेम ..अंत सात मिनिटात

सात वर्षाचे प्रेम ..अंत सात मिनिटात
सात वर्षाचे प्रेम ..अंत सात मिनिटात
हि कथा आहे शितल आणि संजयची.....
आज सात वर्षांनी शितलच्या चेहऱ्यावर
आनंदओसंडूनवाहत होता.
किती दिवसाची प्रतीक्षा आज
संपल्यासारखी तिला वाटत होती.
आधी:
तीच संजयवर एकतर्फी प्रेम होत ते
क्लासमध्ये नववीत असल्यापासून,
तिला तो खूप आवडायचा पण तिने कधीच
त्याला तेसांगायची हिम्मत केली नव्हती.
तो तिला फक्त क्लासच्या वेळेतच समोर
दिसायचा. तिला बाकी काहीच
माहिती नव्हती त्याच्याबद्दल.
आणि स्वभावाने खूप
लाजाळू ...असल्यामुळेति ने त्याच्या बद्दल
कधी तिच्या मैत्रिणींकडे सुद्धा विषय
काढला नाही. पण तिने शेवटी ठरवले
कि क्लासच्या शेवटच्या दिवशी त्याला
सांगायचं कि माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे
आणि तू मला आवडतोस. पण
नियतीच्या मनात काही वेगळ होत.
क्लासचा शेवटचा दिवस होता २५ मार्च पण
त्या आधीच एक आठवडा संजयचा अपघात
झाला आणि तो त्या अपघातामुळे
ती शेवटची परीक्षा पण देवू शकला नाही.
त्यामुळेच त्याच क्लासला येनच काय
घरातून बाहेर पडण पणबंद झाल. तिने खूप
प्रयत्न केला त्याला contact
करण्याचा पत्ता शोधून
ती त्याला भेटायला त्याच्या घरीपण गेली.
पण आता तिला ते विचारण शक्यच नव्हत.
तिने विचार केला कि हा यातून पूर्ण
बाराझाला कि नक्की विचारू. पण त्याच
वर्षी संजय ते शहर सोडून दुसरीकडे शिफ्ट
झाला. आणि शितलच्या सर्व अशा-
आकांशधुळीत मिळाल्या. ती खूप रडली जमेल
तितका प्रयत्न
केला त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा. पण
एकाहीमैत्रिणीला तिने हे न सांगितल्यामुळे
तिला कुणाची मदत पण नाही मिळाली.
आता त्या गोष्टीला सात
वर्षझाली होती अजूनही तिने मनातून
संजयलाच आपला life partner म्हणून
निवडलं होत. तिने Facebook वर account
बनवल होत. तिला मैत्रिणींकडून कळालहोत
कि आपले सर्व शाळेतले मित्र-
मैत्रिणी facebook वरआहेत. म्हणून
तिनेहीसर्च केल आणितिला आजसंजयचं
profile दिसल.तिने त्याला request
पाठवली. आणि बरोबर message करून
आपली ओळख करून दिली. त्याच
दिवशी संजयने requestaccept केली. तिने
संजय कडे त्याचा नंबर
मागितला होता तो त्याने तिला दिला. मग तिने
त्याला कॉल करून खूप गप्पा मारल्या क्लास
मधल्या गमती जमतींच्या. आणि तिने
संजयला भेटायला बोलावल संजयने
तिला सांगितल कि तो आज खूप buzy आहे
तर आपण उद्या भेटू.
भेटीचा दिवस
"मी तुला ओळखलंच नाही कशी दिसायचीस
तू क्लासमध्ये असताना आणि आता totally
different"
"हो रे थोडा बदल झालाय खरा, पण तू मात्र
अजूनही तसाच दिसतोयस, कस चाललाय?"
"माझ एकदम मजेत, अजूनकोणी आहे
का तुझ्या contact मध्येक्लास मधले"
"हो रे त्या क्लास मधल्या सर्व
मैत्रिणी आहेत संपर्कात. पण तू तर अचानक
गायब झालास"
"हो ग नवीन घर घेतल होत
आणि आम्ही शिफ्टहोणारच
होतो त्यावर्षी...so झालो एकदम अचानक"
"लग्न कधी करतेयस? का झालपण?"
"नाही रे अजून नाही......कुणाच ीतरी वाट
बघतेय म्हणून अजूनथांबलेय
लग्नासाठी....पण आता विचार सुरु आहे बघू
कदाचित लवकरच.....ये पणतुझ झाल
का लग्न?"
"मागच्याच वर्षी झाल'LOVE
MARRIGE'जरा लवकरच झाल पण
जो होता हैं वो अच्हे के लिये होता हैं.......अस
विचार केला आणि केल लग्न"
बस
त्यानंतर शितल फक्त रडायची बाकी होती....
.तिने कसातरी पटापट तिथून
निघण्याचा प्रयत्न केला....संजयला पण
थोड विचित्र वाटल पण त्यालाही घाई
असल्यामुळे तोही निरोप घेवून तिथून
निघाला. त्यानंतर अक्खी रात्र तिने रडून
रडून घालवली. आता हाच
मोठा प्रश्नतिच्यासमो र
उभा राहिला ज्या प्रेमाची सात वर्ष वाट
बघितली त्याचाअंत अस सात मिनिटात
का झाला....
सात वर्षाचे प्रेम ...हो प्रेम का ते
ना बोलला सारखे न उमजणारे असे
किती तरी प्रेम करतात
पण हा भावना कोणालाही नाही कळत फक्त
त्या कळणारच कळत फक्त ती ओळख
पाहिजे दोघानाही आतून ..
ना उम्जालाणारे प्रेम कधी तरी उमलते पण..
असेच काही प्रसंग घडतात आणि शेवट
होतो..येथे तर असे होते..
पण आजकाल तर वेगळेच होत आहे प्रेम
होते ..२-३ वर्ष एकत्र राहतात
हि आणि एका दिवशी लगेच ब्रेअक up करून
मोकळे होतात हि?
का ? इतका लवकर संपते का? सर्व तेच दोघे
अनोळखी होतात हि? ..जसे
कधी एकमेकांना भेटले हि नाही का..असे
वागतात ..!!!
नंतर त्यांना कळते हे प्रेम नाही फक्त एक
attraction होते ..खूप नावे मिळतात
हा नात्याला?
..त्यातातल्या त्यात काही तरी एक होतात
आणि काही महिनानी - वर्षांनी विभक्त
हि होतात, का तर?
कारणे वेगवेगळी जसे तु लग्नादी तु
असा नाव्तास?तु अशी नवतीस ? माझे
स्वप्न ?माझे आयुष?काय मिळाले हे
प्रश्न? पडतात ? किती असते हे
स्वार्थी प्रेम ?फक्त त्यात पुरते मग
आमच्या गरजा आमच्या इच्छा अन्कांक्षा..
खूप काही येते मग ?? खूप odd झालीत
हो सर्व उदाहरणे.....बस
ज्याला मिळाला तो असा ..नाही तर
तो तसा ..आम्ही बोलून मोकळे
हि होतो ..असो .....
तुम्ही काहीही म्हणाल पण खरे प्रेम मिळणारे
नशीबवान असतात आणि ते टिकवणारे
त्य्हून नशीबवान असतात ...
ज्याला हे मिळत नाही असे ते म्हणतात
आमच्या नशिबात प्रेम च नाही ....प्रेम
नाही ...!!!!
माझ्या आठवणींना
तुझ्या सोबतीची जोड आहे...
अन् तु सोबत असली की
प्रत्येक आठवण गोड आहे...!! ♥

Marathi Sad Kavita : असे का होतं जे आपल्याला आवडतं ते दुसर्यालाच मिळून जातं?

प्रेम तर सारेच करतात काहींचे प्रेम
पूर्ण होतं जे एकमेकांना मिळून
जातात सुखाचा संसार होतो तर
काहींचा प्रेम अधुरे राहतं जसे माझे
माझेही प्रेम अधुरेच राहिले .
ह्या अधुरे राहिलेले प्रेम म्हणजे
खूपच आठवणीने भरलेलं समुद्र
आणि त्या समुद्रात
आपली भरकटलेली होडी ,पण
त्या होडीला किनारा च सापडत
नाही तसेच आठवण खूप येते पण
ती मिळतच नाही .
माझे हि प्रेम असेच झाले ते
कधी झाले कळलेच नाही पण
मला कळले तेव्हा उशीर
झाला होता . ती खूप
चांगली होती तिला मी आवडायचो
पण माझा स्वभाव मस्तीखोर
त्या मुले तिचे
प्रेमही मी मस्ती मध्ये नेले जे
मला नंतर जाणवले
मी केवढी मोठी चुकी केली , पण
काय करू आता ते पूर्ण होणार
नाही . तिच्या प्रेमापुढे मी शून्य
ठरलो मी समजूच
शकलो नाही तिच्या प्रेमाला कारण
ती वेळ
होती शाळेची मी आणि ती सोबतच
शिकायचो आठवी इयत्ते पासून
आम्ही एकाच क्लास मध्ये होतो .
ती आमच्या सरांची ची भाची होती आमचे
सर म्हणजे तिचे
मामा त्यांना काहीही बोललो आर
तिला राग यायचा आणि मी मुद्दाम
बोलून तिची मजा घ्यायचो .. ते
दिवस मला आज हि आठवतात ..
एक दिवस होता शिक्षक
दिनाचा आम्ही सगळ्यांनी साजरा करायचे
ठरवले आमचा क्लास
सकाळचा असायचा आम्ही मुले
सकाळीच
जायचो सर्वांच्या अगोदर मस्त
मजा करायचो एक तास आणि नंतर
मुली यायच्या तसेच
त्याही दिवशी आम्ही लवकर
गेलो आणि क्लास ची सजावट
केली आम्ही केलेली सजावट पाहून
आमच्या वर्गातल्या मुली खूपच
खुश झाल्या , का नाही होणार
आम्ही केलेच तसे होते साफसफाई
पासून बोर्ड पर्यंत सगळेच सजले
होते आणि खायला पण आणून
ठेवले होते हे तर मुलींनाही माहित
नव्हते आम्ही साजरा करणार आहोत
म्हणून त्यांनी विचार
केला होता पण आम्ही ते साक्षात
केले होते आणि जसे आमचे सर आले
ते तर पाहून चकितच झाले कारण
आम्ही जेवढी सजावट
आणि जो कार्यक्रम
ठेवला होता तो खरच खूप चांगला
होता आणि आमच्या सरांना आवडला हि त्या
दिवशी मुली हि खूप सुंदर दिसत
होत्या .
सरांनी हि आम्हाला शाबाशकी दिली आणि
आम्ही त्या दिवशी तोडके मोडके
भाषण केले ..खूप मजेदार होते ते
दिवस
आम्ही त्या आमच्या शाळेच्या दिवसात
मजा तर केली तेवढाच अभ्यास
हि केला .. पण
माझ्या मित्रांनी प्रेमाकडे
जरा जास्तच लक्ष दिले
आणि मी अभ्यासाकडे
आणि मस्ती कडे त्या मुळे मी पास
झालो आणि माझे सर्व मित्र नापास
झाले .. आणि ते नापास झाले म्हणून
आम्ही पार्टी हि केली, हे होते
आमचे शाळेत
असतानाची मस्ती धमाल .
पण तिच्या विषयी तर
सांगायचे तर राहूनच गेले,
हा ..तर ती खूप चांगली होती मी जे
करायचो ते तिला खूप आवडायचे
माझी मस्ती तर तिला खूप
आवडायची सर्वांचा लाडका होतो मी क्लास
मध्ये त्या मुळे माझी काळजी सारेच
घ्यायचे ,पण ती जरा जास्तच
घ्यायची ती माझ्या सोबत शेवट
पर्यंत एकही शब्द बोलली नाही पण
तिच्या मनात जे काही होते ते
मैत्रिणी कडे सांगायची आणि ते
मला हि समजायचे मला हसू यायचे
तेव्हा कारण मला माहित होते जर
प्रेम केले तर मी नापास होईल
माझ्या मित्रांसारखे .. पण
मला कळले
मी चुकी केली ती माझ्यावर खरच
प्रेम करत होती .
ती माझ्या कडे
पहायची मी तिच्या कडे पहायची
मला माहित होते ती माझ्या कडे
पहायची पण मी तिला पाहताच
ती दुसरीकडेच नझर
फिरवायची हा खेळ खूप छान
वाटायचा ,ती हसताना खूप सुंदर
दिसायची तिचा राग म्हणजे मध
तो राग म्हणजे गोड
असायचा म्हणजे मना पासून
नव्हताच कारण ती माझ्या वर प्रेम
करत होती .
ती माझ्यासाठी झुरली पण
मला कळलेच
नाही तिला रात्री झोपही यायची नाही
सारखा विचार करायची
माझ्याशी बोलायचे पण ते
तिला हि जमले
नाही आणि मला हि जमले
नाही ,तिला भीती होती तिच्या मामाची आणि
तिच्या घरच्यांची पण तिने जर
मला तसा इशारा दिला असता तर
मी तिच्यासाठी सारे काही केले
असते पण ते तिने मला जानउ दिले
नाही . तिने हे सारे तिच्या मनात
ठेवले आणि माझे तर सारेच मनात
राहिले मी तर माझ्या मनातले
कधी बोलूच शकलो नाही ..
शेवट असा झाला कि आमचे शाळेचे
दिवस संपायला आले
असताना मी खूप हिम्मत करून
तिला विचारले तेही मित्रांना सोबत
घेऊन कारण
माझी ह्यासाठी हिम्मत झालीच
नाही
त्या दिवशी ती आली आणि मी तिला
विचारले हि तुझे माझ्यावर प्रेम
आहे का ? कदाचित हे मी चुकीचे
बोललो मी जर '' माझे तुझ्यावर
प्रेम आहे मला तू आवडतेस असे
बोललो असतो तर
ती मला मिळाली असती "
पण ते जमलेच नाही आणि ती रडू
लागली तिचे रडू माझ्या कडून पाहून
गलेले नाही म्हणून मी तिथून निघून
गेलो पण त्या वेळेस मी तिथे
थांबलो असतो तर तिचे उत्तर
मला मिळाले असते ..
पण ते मला जमलेच नाही .... असे हे
माझे पहिले प्रेम जे आज
हि मला आठवतं
आणी मी आजही दु:खी होतो .
कारण पहिले प्रेम म्हणजे एक लाट
जी भरती येते तशी सारे जुने दिवस
आठवण देऊन जाते ..
पण आजही मला वाटतं हे
माझ्याशीच का होतं...?
त्यानंतर मला कुणी आवडे पण
आता कून इतरी आवडायला लागले
आहे पण कदाचित
दुसर्या साठी आहे , पण असे
का होतं जे आपल्याला आवडतं ते
दुसर्यालाच मिळून जातं?

Marathi Story : स्टोरी तशी जुनीच आहे...

स्टोरी तशी जुनीच आहे...
माझा एक मित्र आहे. कॉलेजमध्ये सर्व जण
करतात तसे त्यानंही बरेच उद्योग केले.
पोरींना भरपूर त्रास दिला. सरांची नक्कल केली.
कॅंटीनचे पैसे बुडवले.
"फर्स्ट डे फर्स्ट शो' पाहिले. दर
महिन्याला त्याच्या अंगावर
नवा शर्टअसायचा.
तो नेहमी म्हणायचा. "जन्माला आलोयतर
फुल्ल ऐष करणार, प्रेमाबिमात नाही पडणार'.
त्यानं त्याच्या बाईकरवही "आय हेट गर्ल्स'
असंच लिहिलं होतं.
आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा.
त्यामुळंलाडातच मोठा झालेला.
शिवाय त्याच्या सोसायटीत भरपूर मुली.
त्यामुळे मुलींचं त्याला तसं काही सोयरसुतक
नव्हतंच.
पोरींशी बिनधास्त बोलायचा. अभ्यासातहुशार
नव्हता; पण
खेळाचीकमालीची आवडहोती त्याला.
कायम खिदळत असायचा. पण... पण आज
त्याच्या चेहऱ्यावरचं हसू कुठल्या कुठं पळून
गेलंय.
तो एका मुलीच्या प्रेमात पडला होता. गोरीपान
आणि देखणी मुलगी होती ती.
कसलाही विचार न करता त्यानं तिला बिनधास्त
प्रपोज केलं होतं. ती होस्टेलला राहायला होती.
सहा महिने तो तिच्या मागं लागला होता.
खरं प्रेम केलं होतं त्यानं. त्यामुळं
त्या मुलीनंही होकार दिला. त्याचा स्वभाव
निर्मळ होता.
पण तो आई-बाबांना खूप घाबरायचा. लाडात
वाढला असला, तरी त्याच्यावर आई-
बाबांचाधाक होता.
त्यामुळं त्यानं
प्रेमाविषयी त्यांना काही सांगितलं नव्हतं.
त्याची हिंमतच होत नव्हती.
तो तिच्यासोबत नेहमी फिरायला
जायचा. पुढे रस्त्याशेजारी एका ठिकाणी ते
गप्पा मारत बसायचे.
एकदा ते असेच फिरायला निघाले
तेव्हा त्याच्या प्रेयसीनं एका कॅरीबॅगमध्ये
छोटंसं रोपटं घेतलं होतं.
आपण बसतो ना, तिथं मी हे रोप लावणार,
अशी तिची कल्पना ऐकून तो पोट धरून
हसला होता.
त्याच्या हसण्यानं ती रुसूनही बसली होती.
कसंबसं तिचा रुसवा घालवत दोघं
त्या ठिकाणी गेले.
दोघांनी तिथं रोपटं लावलं. सोबत
पाण्याची बाटली होती.
त्या रोपट्याला पाणीही घातलं.
आठवड्यात एकदा तरी त्यांची तिथं चक्कर
व्हायचीच. दर वेळी ते दोघं त्यारोपट्याशेजा
री गप्पा मारत बसायचे.
एके दिवशी ती गावी निघाली. तो आईसोबत
मावशीकडे गेला होता. त्यामुळं
त्या दोघांना भेटता आलंनाही.
शिवाय ती दोन दिवसांनी परत येणार
होतीच.त्यामुळं नको येऊ भेटायला, असं तिनंच
सांगितलं होतं.
घरी पोचल्यावर फोन कर असं सांगून त्यानं
फोन ठेवला. तिचा फोन आला नाही, म्हणून
त्यानं फोन केला; पण कुणीच उचललानाही.
घरी गेल्यानं मला विसरली वाटतं,
असा रागमनात धरून त्यानंही परत तिला फोन
केला नाही.
दुर्दैवानं दुसऱ्या दिवशी मला समजलं,
तिचा अपघातात मृत्यू झाल्याचं.
त्याला ही बातमी कशी सांगायची तेच सुचत
नव्हतं.
खूप धाडस करून मी त्याला सांगितलं.
हळव्या मनाचा होता तो. जागेवरच
खाली बसला अन् मोठमोठ्यानं रडायला लागला.
आवरणार तरी कसं त्याला? माझ्या गळ्यात
पडून रडू लागला.
आवरणार तरी कसं त्याला? माझ्या गळ्यात
पडून रडू लागला. क्षणाचाही विचार न
करतात्यानं गाडी काढली.
मला पाठीमागं बसवलं अन्
आम्ही तिच्या गावाकडं गेलो; पण काही उपयोग
नाही. सर्व काही उरकलेलं होतं.
तिथं त्यानं स्वत:ला सावरलं. तो तिथं
रडला असता, तर तिथल्या लोकांना संशय
आलाअसता.
आम्ही तिच्या बाबांना भेटलो अन्अर्ध्या तासात
माघारी फिरलो.
मला वाटलं, आम्ही घरी येतोय. पण
आमची गाडी निघाली होती.
मी काही बोललो नाही. रस्त्याशेजारी त्यानं
गाडी थांबवली.
अन् एका झाडाला पकडून तो मोठ्यानं रडू
लागला. त्यानंतर दररोज तो तिथं जात होता.
अन् झाडापाशी बसून मुसूमुसू रडत होता.
आठ महिन्यांपूर्वी त्याच्यावर दु:खाचा डोंगर
कोसळला होता. पण आता तो हळूहळू सावरतोय.
आता त्याचा स्वभावही बदलला आहे.
एखाद्या शांत मुलाप्रमाणं तो वागतोय.
त्याच्या आई-बाबांना याविषयी काहीच माहित
नाही. तो घरात काही बोलतही नाही.
फक्त रात्रीच्या वेळी तिनं त्याला दिलेली लेटर
वाचतो. तिनं दिलेलं गुलाबाचं फूल आता सुकलंय.
ते एकटक बघतो.
अन् उशीत तोंड खुपसून रडतो. तो म्हणतो,"ते
झाडच आता माझं सर्वस्वआहे.
त्या झाडाच्या पानाफुलांत मी तिला शोधतो.
लोक झाडावर प्रेम करा असं म्हणतात; पण
मी प्रेम
करणाऱ्या प्रत्येकाला सांगीन,की तुम्ही हीअसं
एखादं रोपटं लावा.
तुमची "लव्ह स्टोरी' माझ्यासारखी अर्धवट
राहणार नाही. खरं प्रेम असेल, तर
ही निःस्वार्थी रोपं खूपकाही देतात.
मी स्वत: हे अनुभवतोय.''

Marathi Kavita : कित्येकदा गोष्टी वरपांगी वाटतात तशा प्रत्यक्षात नसतात

एकदा एका विमानतळावर एक मुलगी वाट पाहत
बसली होती. थोड्या वेळाने तिने तिथल्याच
स्टोअरमधून एक पुस्तक
आणि बिस्कीटपुडा खरेदी केला. कुणाचा त्रास
होऊ नये म्हणून ती “व्हीआयपी वेटिंग एरिया’त
जाऊन पुस्तक वाचत बसली.
तिच्या शेजारी दुसरे एक गृहस्थ वर्त
मानपत्र वाचत बसले होते.
शेजारी बिस्किटाचा पुडा होता. तिने एक
बिस्कीट खाताच त्यांनीही त्याच पुड्यातून एक
बिस्कीट घेऊन खाल्ले.
त्या गृहस्थाचा निर्लज्जपणा पाहून त
िचा पारा चढला. “काय निर्लज्ज मनुष्य आहे
हा! माझ्या अंगी थोडी हिंमत असती, तर
याला इथल्या इथे चांगलंच सरळ केलं असतं!’
ती मनात विचार करत होती.
दोघांचेही एक-एक बिस्कीट खाणे सुरूच होते.
आता शेवटचे बिस्कीट उरले.
“आता हा हावरट मनुष्य ते बिस्कीट स्वत:
खाईल, का मला अर्धे
देण्याचा आगाऊपणा करेल?’ ती विचार करत
होती. “”आता हे अतिच झालं,” असे म्हणत
ती दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसली.
थोड्या वेळाने राग शांत झाल्यावर पुस्तक
ठेवायला तिने पर्स उघडली. पाहते तर काय,
तिचा बिस्कीटपुडा पर्समध्येच होता.
आपण कुणा दुसऱ्याची बिस्किटे खाल्ली,
याची तिला खूप लाज वाटली. एका शब्दानेही न
बोलता त्या व्यक्तीने आपली बिस्किटे
तिच्यासोबत वाटली होती. तिने नजर टाकली,
तर शेवटचे बिस्कीटही त्याने तिच्यासाठी ठेवले
होते.
निष्कर्ष – आयुष्यात कितीतरी वेळा आपण
दुसऱ्याच्या वाट्याचे खाल्ले आहे; पण
आपल्याला त्याची जाणीवच नसते.
दुसऱ्यांविषयी मत बनवताना किंवा वाईट
बोलताना आपण सर्व
गोष्टींचा आढावा घेतलाय का?
कित्येकदा गोष्टी वरपांगी वाटतात
तशा प्रत्यक्षात नसतात.

Marathi Sad Kavita : एकटेपणा

एकटेपणा तेव्हा वाटत नाही, 
जेव्हा आपण एकटे असतो..
तर तो तेव्हा वाटतो, 

जेव्हा आपल्याबरोबर सर्वजण असतात पण ती व्यक्ती नसते, 
जी आपल्याला आपल्यासोबत हवी असते..