Wednesday, September 1, 2010

नुकतच मी तुला

नुकतच मी तुला
समजायला लागलो होतो
नुकतच मी तुला
आपलं म्हणायला लागलो होतो
पण तु तर साधी
माझ्याशी बोलायची पण नाही..

नुकतच कुठेतरी तुला
लपुन लपुन पहात होतो
तुला हसताना पाहुन
मी ही खुश होत होतो
पण तु तर साधी
माझ्याकडे पाहत पण नव्हती

नुकतीच हिंमत आली होती
तुला काहितरी सांगण्याची
धाड धाड बोलुनच टाकायचं
नुकतच ठरवलं होतं
पण तु तर साधं
माझं कधी ऐकुनच घेतलं नाही
नव्हे मला कधी तु..
समजुनच घेतलं नाही...

नुकतच मी तुला
समजायला लागलो होतो
नुकतच मी तुला
आपलं म्हणायला लागलो होतो
पण तु तर कधी मला
समजुनच घेतलं नाही...


-- सतिश चौधरी

No comments: