Wednesday, September 1, 2010

अचानक ....

हल्ली मला अचानक काय होतं कोणास ठाऊक
पावसाच्या ढगांप्रमाणे मनात आठवणी दाटतात
समोर कोणी नसताना तुझे भास होतात

अचानक मन खूप मागे मागे जातं
निसटलेल्या क्षणांची आठवण करून देतं

तुला भेटल्यापासून असं काहीस होतंय
माझे मन तुझाभोवती सारख घुटमळतय

--शिशिर

No comments: