Thursday, September 16, 2010

एकतर्फी प्रेमाचा बाजार...

प्रेम करतोस ना तिच्यावर,
मग कर फ़क्त प्रेमाचा वर्षाव
तिने ही कराव प्रेम म्हणून
आणायचा नसतो दबाव....

असेल तिचा नकार, तर
तो हि तू हसत स्विकार
तिलाही आहे ना स्वत:चा
निर्णय घेण्याचा अधिकार...

नाही म्हणाली तर तूझ्या
प्रेमाने नकाराला होकारात बदल
का नाही म्हणाली याचा विचार
करुन आधी स्वत:ला बदल...

नाही म्हणाली तर तिच्या
नकारावरही प्रेम कराव
नाही म्हणता म्हणता तिला
प्रेम करायला शिकवाव...

नको रे घेउस तूझ्या वेड्या
हट्टा पाई तिचा बळी
काय मिळणार तूला तोडून
एखादी उमलणारी कळी...

खरे प्रेम करतोस ना,
मग ठेव सच्ची निती
कशाला दाखवतोस उगाच
तिला जिवाचि भिती...

तूझे हे सच्चे रुप पाहून
कदाचित बदलेल तिचा विचार
तिलाही होईल बघ मग
तुझ्या प्रेमाचा आजार...

अखेर तरीही नसेल तिचा होकार
तर तूही घे अवश्य माघार
कशाला मांडतोस लेका असा
एकतर्फी प्रेमाचा बाजार...

Wednesday, September 1, 2010

विसरून जाव म्हटल तुला

विसरून जाव म्हटल तुला
पण विसरताच आल नाही
आज ही तुला आठवल्या शिवाय
पाउल पुढ़ जात नाही
खुप अपमान केलास
खुप तमाशा केलास
नकों तेवढ वाईट बोलून
सभ्य पणाचा आव आनलास
भातुकलीच्य खेला सारखा
खेळ तू खेळलिस
आणि
अर्ध्यावरती डाव सोडून
भांडून निघून गेलीस
खोट होत सगल
खोट तुझे बहाने
खोट्या आना बाका
आणि खोटी होती वचने
बघ खर प्रेम करून कोणावर
कलेल प्रेम काय
असत
आणि एखाद्याच्या विरहात
जगन किती कठिन असत
कितेक रात्री रडून काढल्या
कितेक रात्री उपाशी राहिलो
वाटल सोडून जाव सग्ल्यान्ना
निरोप घ्यावा जगाचा
पण कसा बसा सावरलो
निर्धार केला तुला विसरन्याचा
पण कितीही प्रयत्न केले
तरी विसरता आलच नाही
आणि तुझ्या
बरोबरच्या गोड क्षनाना
आठवल्या शिवाय दिवस
जातच नाहीत......

प्रेम हे होत नसत...

प्रेम हे होत नसत
प्रेम हे कराव लागत
आपल अस कुणिच नसत
आपलस कराव लागत


एकदा तरी स्वताहुन
वादळात झोकायच असत
नाहिच हाती आल तर
"त्याच वादळात"
मनसोक्त मरायला शिकायच असत

म्हणूनच
प्रेम हे होत नसत
प्रेम हे कराव लागत
आपल अस कुणिच नसत
आपलस कराव लागत.........!


आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका

नुकतच मी तुला

नुकतच मी तुला
समजायला लागलो होतो
नुकतच मी तुला
आपलं म्हणायला लागलो होतो
पण तु तर साधी
माझ्याशी बोलायची पण नाही..

नुकतच कुठेतरी तुला
लपुन लपुन पहात होतो
तुला हसताना पाहुन
मी ही खुश होत होतो
पण तु तर साधी
माझ्याकडे पाहत पण नव्हती

नुकतीच हिंमत आली होती
तुला काहितरी सांगण्याची
धाड धाड बोलुनच टाकायचं
नुकतच ठरवलं होतं
पण तु तर साधं
माझं कधी ऐकुनच घेतलं नाही
नव्हे मला कधी तु..
समजुनच घेतलं नाही...

नुकतच मी तुला
समजायला लागलो होतो
नुकतच मी तुला
आपलं म्हणायला लागलो होतो
पण तु तर कधी मला
समजुनच घेतलं नाही...


-- सतिश चौधरी

ऒढ मिलनाची....

ऒढ सागराची बांधही फोडीत गेली
मार्गातील सगळ्यांना आकंठ बुडवित गेली

ती आस मुरारीची व्याकूळ बनवून गेली
अवखळ राधेतील वात्सल जागवून गेली

तृषार्थ चातकाची तृष्णा शमवून गेली
ती धार मृगाची तृप्त करुन गेली

मिलनास पृथ्वीराजाच्या भारावून गेली
ती संमयुक्ता अल्लड भांबावून गेली

ऒढ दिप्तीची वेड लावून गेली
पतंगास त्या सत्वरी जाळून गेली

वर्णन दमयंतीचे, नलास मोहून गेले
हंसास बिचा-या जीवनदान देऊन गेले

आकर्षण वसुंधरेचे आभाळास नमवून गेले
दोघांना दूर क्षितिजावर भेटवून गेले

स्वप्ने तुझी रात्र जागवून गेली
आस मिलनाची कविता स्फुरवुन गेली

- सौरभ सुधीर परांजपे

असंच राहू दे ना आपलं नातं....

असंच राहू दे ना आपलं नातं
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया;
आहोत ना एकमेकांसाठी खास
मग एकमेकांना घाव नको देऊया!

द्यायचंच असेल तर देऊ
ओठांवर हसू, कधी उदास असू,
तर खुदकन हसता येईल

हृदयामध्ये थोडी अशी जागा -
जीवनाच्या वाटेवर दमलो कधी,
तुझ्या सोबतीने बसता येईल

पण ज्या छळतील आपल्याला
अशा आठवणींचा गाव नको देऊया,
असंच राहू दे ना आपलं नातं
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!!

--जय

अचानक ....

हल्ली मला अचानक काय होतं कोणास ठाऊक
पावसाच्या ढगांप्रमाणे मनात आठवणी दाटतात
समोर कोणी नसताना तुझे भास होतात

अचानक मन खूप मागे मागे जातं
निसटलेल्या क्षणांची आठवण करून देतं

तुला भेटल्यापासून असं काहीस होतंय
माझे मन तुझाभोवती सारख घुटमळतय

--शिशिर